इगतपुरी तालुक्यातील घोटी खुद॔ बापलेकाची निघृत हत्या
इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द बापलेकाची निर्घु हत्या? काल रात्री दीडच्या सुमारास फोकने बाप लोकांची त्यांचे राहत्या मळ्यात निर्घृण हत्या करण्यात आली आहे।या बाबत वाडीवरे पोलीसा समोर हत्यारे शोधण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. घटनेविषयी समजलेली हकीकत अशी ,कांशीराम वामन फोकने (65) ज्ञानेश्वर कांशीराम फोकने( 48) हे दोघे बाप लेक इगतपुरी तालुक्यातील घोटीखुर्द येथे त्यांच्या मळ्यात राहतात.मुलगा ज्ञानेश्वर फोकने याचे धामणगाव एस एम बी टी मेडिकल कॉलेज जवळ हॉटेल आहे, तसेच ज्ञानेश्वर कांशीराम फोकने हे जिल्हा राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी होते. शुक्रवारी रात्री 10च्या सुमारास मुलगा ज्ञानेश्वर हा मळ्यात राहत असलेल्या आपल्या वडिलांना जेवणाचा डबा घेऊन गेला होता परंतु नियतीने क्रूर डाव आखल्याची दोघांनाही कल्पना नव्हती. दरम्यान रात्री दीड च्या दरम्यान त्याची हत्या झाली या घटनेचा तपास वाडीवरे पोलीस करीत आहेत. सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी निवृत्ती मेदडे 9822502157