अजय नागरे यांची भाजपा युवा मोर्चाच्या फुलंब्री तालुका संघटन सरचिटणीस पदी निवड
अजय नागरे यांची भाजपा युवा मोर्चाच्या फुलंब्री तालुका संघटन सरचिटणीस पदी निवड भारतीय जनता पार्टी फुलंब्री ची कार्यकारणी जाहीर झाली असून, अजय नागरे यांची युवा मोर्च्यांच्या तालुका संघटक सरचिटणीस पदी निवड झाली आहे.नागरे यांची वय केवळ 19 वर्षे आहे इतक्या कमी वयामध्ये संघटन कौशल्य यांना चांगलेच जमले आहे... 2019 ला लोकसभेत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवडणुकीच्या सोशल मीडिया वार रूम मध्ये अजय नागरे आणि चांगलीच कामगिरी केली आहे. माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार माननीय हरिभाऊ बागडे यांच्या निवडणूक प्रचारात सोशल मीडियाची जबाबदारी ही यांच्यावर सोपवली होती. त्यांच्या संघटन कौशल्य मुळे त्यांच्यावर पक्षाने एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. नागरे यांचं फुलंब्री तालुक्याभर तसेच युवकांमध्ये मोठी ओळख आहे. भाजपा तालुकाध्यक्ष सुहास शिरसाट यांच्या नेतृत्वात फुलंब्री तालुक्यामध्ये पक्षासाठी उत्तम कामगिरी करून तरुणांची एक फळी नागरे यांनी निर्माण केली आहे. त्यांचं संघटन कौशल्य बघून पक्षाने त्यांना एक चांगली संधी दिली आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दान...