अजय नागरे यांची भाजपा युवा मोर्चाच्या फुलंब्री तालुका संघटन सरचिटणीस पदी निवड
अजय नागरे यांची भाजपा युवा मोर्चाच्या फुलंब्री तालुका संघटन सरचिटणीस पदी निवड
भारतीय जनता पार्टी फुलंब्री ची कार्यकारणी जाहीर झाली असून, अजय नागरे यांची युवा मोर्च्यांच्या तालुका संघटक सरचिटणीस पदी निवड झाली आहे.नागरे यांची वय केवळ 19 वर्षे आहे इतक्या कमी वयामध्ये संघटन कौशल्य यांना चांगलेच जमले आहे... 2019 ला लोकसभेत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवडणुकीच्या सोशल मीडिया वार रूम मध्ये अजय नागरे आणि चांगलीच कामगिरी केली आहे. माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार माननीय हरिभाऊ बागडे यांच्या निवडणूक प्रचारात सोशल मीडियाची जबाबदारी ही यांच्यावर सोपवली होती. त्यांच्या संघटन कौशल्य मुळे त्यांच्यावर पक्षाने एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. नागरे यांचं फुलंब्री तालुक्याभर तसेच युवकांमध्ये मोठी ओळख आहे. भाजपा तालुकाध्यक्ष सुहास शिरसाट यांच्या नेतृत्वात फुलंब्री तालुक्यामध्ये पक्षासाठी उत्तम कामगिरी करून तरुणांची एक फळी नागरे यांनी निर्माण केली आहे. त्यांचं संघटन कौशल्य बघून पक्षाने त्यांना एक चांगली संधी दिली आहे.
केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जिल्हाध्यक्ष विजय औताडे ,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरज लोळगे, तालुकाध्यक्ष भाजपा तथा नगराध्यक्ष सुहास शिरसाट, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बाळासाहेब तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
पक्षात काम केल्याने नक्कीच त्याच फळ मिळतं हे यावेळी पहावयास मिळाले. यावेळी भाजपा फुलंब्री तालुक्याचे सर्व पदाधिकारी उपस्थितीत होते..
या निवडीबद्दल जि प महिला व बालकल्याण सभापती अनुराधाताई चव्हाण, जिप गटनेते शिवाजी पथ्रिकर, जिप सदस्य जितेंद्र जयस्वाल, पंचायत समिती सभापती सविताताई फुके, मा सभापती सर्जेराव मेटे, भाजपा ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष राम बनसोड, ऐश्वर्या गाडेकर, राजू तुपे, सोमीनाथ भालेराव, फारुक शेख, भाजपा सरचिटणीस गोपाल वाघ, सुचित बोरसे, उपनगराध्यक्ष गजानन नागरे, शहराध्यक्ष योगेश मिसाळ , वाल्मिक जाधव, नगरसेवक अजय शेरकर, गणेश राऊत, सुमित प्रधान आकाश गोरवने, कैलास सोनवणे, संदीप बनसोड, पवन घोडके यांनी अभिनंदन केले
