इगतपुरीच्या एकलव्य कोविड १९ केंद्राला जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याची भेट
इगतपुरीच्या एकलव्य कोविड १९ केंद्राला जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याची भेट इगतपुरी तालुक्यातील भाऊली येथे एकलव्य आश्रम शाळेला कोविड१९ म्हणून मान्यता मिळाली आहे. येथे संभाव्य कोविड रुग्णांचे घश्यातील स्वाब घेतले जातात व पॉझिटिव्ह रुग्णांना येथे कोरोंटाइन करून औषधोपचार केला जातो .बरे झालेले रुग्ण घरी सोडले जातात तसेच एमर्जनशी रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवले जातात. दरम्यान काल नाशिक जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर सर यांनी भेट देऊन एकंदरीत आंतररुग्ण व बाह्यरुग्णाची विचारपूस करून कामाबद्दल समाधान विकत केले. यावेळी इगतपुरी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.देशमुख,डॉ.दिनेश पाटील डॉ. हेमलता देशमुख,डॉ.खतेले,आरोग्य सहायक शेळके नाना आदी उपस्थित होते.महाराष्ट्र फास्ट न्यूज इगतपुरी तालुका प्रतिनिधी निवृत्ती मेदडे ९८२२६०२१५७