कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेने केले बांधावर जाऊन वृक्षलागवड.*
*कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेने केले बांधावर जाऊन वृक्षलागवड.*
प्रतिनिधी शिवप्रसाद येळकर
लातूर :-
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे आग्रदुत स्व. वसंतराव नाईक यांची जयंती, राज्यात 'कृषि दिन' म्हणून साजरी केली जाते. शेतकऱ्यांसाठी असलेला हा कृषि दिन केवळ शासकीय कार्यालयात साजरा होण्यापर्यंत मर्यादित न राहता तो शेतकऱ्यांच्या बांधावर साजरा व्हावा या विचाराने कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या वतीने, लातूर जिल्ह्यात 'वृक्षरोपण व संगोपन' कार्यक्रमाचे आयोजन प्रा. रणजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यातील विविध ठिकाणी कृषी पदवीधरांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कागदी लिंबाच्या सुधारित कलमाचे वाटप व लागवड केली साक्षी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली युवती पदवीधरांनी देखील मोठया प्रमाणात सहभाग घेतला. व वृक्ष संगोपनाची जबाबदारी शेतकऱ्यांवर देण्यात आली.
काळ्या मातीत घाम गाळुन सोने पिकवणाऱ्या बळीराजाचा कृषि दिनानिमित्त उत्साह वाढवण्यासाठी व त्याला जोमाने काम करण्याची प्रेरणा देण्यासाठी सामाजिक जान ठेवत व शासनाच्या फिजिकल डिस्टंसींगच्या नियमांचे पालन करत कृषि पदवीधरांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
जाहिरात व बातमी करिता संपर्क 7030704553

