Posts

Showing posts from December, 2019
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com
*राजीव सातव यांना दिल्लीत मोठी जबाबदारी; ठरविणार विधानसभेची उमेदवारी* झारखंड निवडणूक पार पडताच प्रमुख राजकीय पक्षांना दिल्ली विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. दिल्लीतील काँग्रेसच्या छाणणी समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्रातील नेते माजी खासदार राजीव सातव यांची निवड झाली आहे. *पुढील वर्षी 15 फेब्रुवारीमध्ये दिल्ली विधानसभेचा कालावधी संपत आहे. त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. आता काँग्रेसकडून तिकीट वाटपाची जबाबदारी राजीव सातव यांच्यावर आली आहे. दिल्ली विधानसभेत 70 जागा असून गेल्या वेळी काँग्रेसला येथून खातंही उघडता आलं नव्हतं. तर आपने 67 आणि भाजपने तीन जागा जिंकल्या होत्या. यावेळी काँग्रेसला चांगले यश मिळवून देण्याची जबाबदारी सातव यांच्यावर आली आहे.* *_जाहिरातीसाठी संपर्क - 8308375118*
Image
*अवकाळी आलेल्या पावसामुळे शेतमालाचे नुकसान*  *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट 9923937033*  वड्णेर :- आज अवकाळी झालेल्या पावसामुळे शेतामधील कापूस , तूर , गहू आणि चना या पिकांचे नुकसान झाले आहेत . सतत शेतकऱ्यांवर निर्सग आणि सरकार कोपत असल्यामुळे जगावे कि मारावे हाच प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा असल्याचे दिसून येते . मागील 4 ते 5 वर्षापासून सतत दुष्काळाच्या यातना शेतकऱ्यांना सहन कराव्या लागत आहेत. हाती येते असलेले पिक निर्सगामुळे गमवावे लागत असल्यामुळे शेती करावी का नाही अशीच नाराजी शेतकऱ्यामध्ये आहेत . आणि पिक पिकवून मालाला योग्य भाव मिळत नाही , शेतीत खूप कष्ठ करून केलेल्या मेहनतीचे फळ मिळत नसल्याने मोठया प्रमाणात आत्महत्या वाढत आहेत. म्हणून अश्या होणाऱ्या अवकाळी पावसाची पाहणी स्थानीय लोकप्रतिनिधींनी आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी करून शेतकऱ्यांना शासन दरबारी योग्य न्याय मिळून द्यावा असे मत वडणेर परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहेत . *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट 9923937033*
Image
ओबीसी संघटनेची बैठक आंध्र भवन न्यू दिल्ली25 डिसेंम्बर2019 बैठक संपन्न झाली या बैठकीत दिनांक 31 आगस्ट 2018 ला माजी गृहमंत्री राजनाथसिंह यांनी ओबीसी समाजाची जातिगत जनगणना कारणानं असे म्हटले परंतु निवडणुकी नंतर तो निर्णय मागे घेतला म्हणून 2021 ओबीसी समाजाची जातिगत जनगणना नाही तर 2024 ला भाजपला वोट नाही,  दिनांक6 जानेवारीला 2020 ला निवेदन देने, 20 जानेवारीला 2020 संपूर्ण राज्यात जिल्हा कचेरीवर ,ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यासाठी धरणे आंदोलन असे निर्णय बैठीक घेण्यात आले. या बैठकीला राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे पूर्व अध्यक्ष जस्टीस वि ईश्वरैया , राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सचिन राजूरकर, हंसराज जागिड,अमिरिकेतून हरी इपन्नपली, क्रीसन्यया आणि बिहार, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश,तेलंगणा, आंध्रप्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र, जम्मू, छत्तीगड, केरला, तामिळनाडू व इतर राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते
Image
*शासकीय औ. प्र. संस्था, राजुरा येथे जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेचे आयोजन !* """""""""""""""""""""""""""""""""'''''''''''''''''''''''''''''''""""""""""'""""""""""  दिनांक 24 डिसेंम्बर 2019 ला शासकीय औधोगिक प्रशिक्षण संस्थेत जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेचे उदघाटन *मा. श्री. अविनाश जाधव, सचिव, आदर्श शिक्षक प्रसारक मंडळ, राजुरा* यांच्या शुभहस्ते करण्यात आले, या प्रसंगी प्रमुख पाहुणे *मा. श्री. एस. एम. वारकड, प्राचार्य, श्री. शिवाजी महाविद्याल, राजुरा* हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष *मा. श्री. वैभव एम. बोनगिरवार, प्राचार्य, शासकीय औ. प्र. संस्था, राजुरा* हे होते. या प्रसंगी बोलताना प्राचार्य ब...
Image
उद्या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त इगतपुरी तहसील कार्यलयात बैठक। इगतपुरी तालुका प्रतिनिधी (निवृत्ती मेदडे)  उद्या दिनांक २४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून इगतपुरी तहसील कार्यालयात ग्राहकाची बैठक घेण्यात येणार आहे. दरम्यान प्रलंबित कामे संदर्भात सर्व सर्व ग्राहकांनी दस्त ऐवज ,अर्ज,सर्व कागद पत्रासाहित उपस्थित राहावे असे आव्हान ग्राहक मंचसचे संघटक व पत्रकार गोपाळ शिंदे यांनी केले आहे. सर्व प्रलंबित कामाचा खातेनिहाय निपटारा बैठकीच्या ठिकाणीच करण्यात येणार आहे.सर्व शासकीय अधिकारी यांना बैठकीच्या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आव्हान इगतपुरी तहसीलदार अर्चना पागीरे यांनी केले आहे. इगतपुरी प्रतिनिधी निवृत्ती मेदडे ९८२२५०२१५७
Image
*आर . टी .आय .कंप्यूटर अँड टेक्निकल इन्स्टिट्यूट वड्णेर येथे भारतरत्न डॉ . ए .पी . जे अब्दुल कलाम गुणवत्ता स्पर्धा परीक्षाचे आयोजन*  *तालुका प्रतिनिधी राहुल दूरतकर ,  हिंगणघाट 9923937033* . स्थानीय , युवा प्रेरणा विद्यार्थी सेवा संस्था अंतर्गत आर . टी .आय .कंप्यूटर अँड टेक्निकल इन्स्टिट्यूट वड्णेर येथे भारतरत्न डॉ . ए .पी . जे अब्दुल कलाम गुणवत्ता स्पर्धा परीक्षाचे आयोजन करण्यात आले . यामध्ये वड्णेर परिसरातील ऐकून 140 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. आधुनिक काळातील शिक्षणातील स्पर्धा लक्षात घेऊन ग्रामिण भागातील विद्यार्थीना स्पर्धा परीक्षेचे महत्व लक्षात यावे आणि विद्यार्थिनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घ्यावे हा संस्थेचा मुख उद्देश आहेत . यामुळे संस्था दरवर्षी प्रत्येक महीन्यातून एकदा ही स्पर्धा घेऊन ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांच्या मनामधे स्पर्धे बद्द्ल भावना निर्माण करण्याचे मोलाचे कार्य करीत आहेत . यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दूरतकर, कार्यक्रम अधिकारी विकास तिजारे , शिक्षिका कु . विभा गुरनुले , सौ . कल्याणी उरकुडे आदीची उपस्थिती होती. *तालुका प्रतिनिधी राहुल द...
Image
*काल महाराष्ट्राचे दैवत छत्रपति शिवाजी*  वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :- महाराज यांच्या स्मृति अभिवादन करुण येथे *शिवनेरी क्रीड़ा मंडळ नांनबर्डी (डोंगरगांव) तालुका सेलु* च्या वतीने घेण्यात आलेल्या *भव्य ५५ किलो वजन गटातील* सामन्याचे उद्घाटन समारंभ पार पडले. कार्यक्रमचा पहिला टप्पा म्हणजे राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद व शिवाजी महाराज प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्या समारोहाला पाहुने म्हणून मि तसेच माझ्या सोबत कार्यक्रमाचे उद्घाटक *मा.वरुणभाऊ दफ्तरी,* कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून *मा.रविंद्रभाऊ कोटम्बकर,* तसेच प्रमुख पाहुने म्हणून *मा.राणाभाऊ रणनवरे* *मा.गोलूभाऊ शेख* *रोशनभाऊ दुदकोहळे* व गावातील नागरिक उपस्तित होते. तसेच मान्यवराणी आयोजकाना व खेळाडूना सुभेच्या देऊन आपले मनोगत व्यक्त केले.
Image
*पोलिस स्टे पुलगाव अपक्र :-750/19कलम* 379 भा.द.वि  वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :- आरोपी :- अभिजित राजेश्वर जिचकार, वय 26 वर्ष, रा. सोरटा, ता. आर्वी, जि, वर्धा *जप्त मुद्देमाल* :-1) CRI कंपनीची दिड हॉर्स पॉवरची पाणबुडी मोटर, 2) इलेक्टिक केबल 2.5 mm वायर 27 ft 9 inch 3) 44 ft 10 inch र्हास पाईप असा जुमला किंमत 5000 रू. चा मुद्देमाल. *हकीकत*:- या प्रमाणे आहे की, रामभाऊ हरिभाऊ बागडे, रा. गौरक्षन वार्ड, पुलगाव यांनी तक्रार दिली की, त्यांचे शेतातील पणबुडी मोटर पम्प टीएसएसआय/इसीआरआय कंपनीची दीड एचपीची व तिला लागून असलेली होसपाईप जुनी वापरती एक वर्षापूर्वी घराचे समोर आवारात आणून ठेवली होती ती पाणबुडी मोटर व हॉर्स पाईप कोणीतरी घराचे समोरील आवारातून चोरून नेली आहे अशी तक्रार पो. स्टे. पुलगाव येथे दिल्याने अप क्र 750/19 कलम 379 भादवी नुसार गुन्हा दाखल झाला. सदर गुन्ह्याबाबत गुप्त माहिती की आरोपी नामे अभिजित राजेश्वर जिचकार, वय 26 वर्ष, रा. सोरटा हा त्याचे घराजवळ असलेल्या विहिरीत पाणबुडी मोटर लावून वापरत आहे त्यावरून त्यास ताब्यात घेऊन विचारपूस करून आरोपी कडून गुन्ह्यात चोरी ...
Image
*माझ्या पुतळ्याला जोडे मारा; पण गरिबांची वाहनं जाळू नका; मोदींचं आवाहन*  वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार माझ्या पुतळ्याला जोडे मारा. मला हव्या तितक्या शिव्या द्या. पण देशातील गरिबांच्या गाड्या जाळू नका. त्यामधून तुम्हाला काय मिळणार, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन आंदोलन करणाऱ्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन देशात सुरू असलेल्या आंदोलनांवर मोदींनी दिल्लीतील रामलीला मैदानातून भाष्य केलं. नवा कायदा कोणाचं नागरिकत्व रद्द करण्यासाठी नव्हे, तर नागरिकत्व देण्यासाठी आणला गेला आहे, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर शरसंधान साधलं.  *सुधारित नागरिकत्व कायद्याच्या माध्यमातून पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील अल्पसंख्यांकांना नवं आयुष्य मिळेल, असं मोदी म्हणाले. सुधारित नागरिकत्व कायद्याची  अंमलबजावणी करून पाकिस्तानला संपूर्ण जगासमोर उघडं पाडण्याची संधी आपल्या हातात होती. त्यांच्या देशात अल्पसंख्यांकावर सुरू असलेले अत्याचार जगासमोर नेण्याची संधी होती. मात्र विरोधकांनी ती वाया घालवली. कारण त्या...
Image
*'या' पोलिसामुळे लागला ७०० बेपत्ता व्यक्तींचा छडा * वर्धा जिल्हा प्रतिनिधी:पवन चंबुलवार :- शत्रूच्या गोटात जाऊन वेश बदलून त्यांच्यातला एक बनून माहिती काढणारे शिवरायांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या चातुर्याच्या, शौर्याच्या कथा आपण ऐकल्या असतील. असाच एक बहिर्जी नाईक मुंबई पोलीसदलात कार्यरत आहे. हेड कॉन्स्टेबल *राजेश पांडेय असं यांचं नाव आहे. स्वत: चा वेश बदलून पांडेय यांनी आजवर 'मिसिंग'ची तक्रार आलेली तब्बल ७०० प्रकरणं निकाली काढली आहेत.* राजेश पांडेय यांनी भारतभर फिरून बेपत्ता झालेल्या अनेकांचा शोध लावलाय. मिसिंग'ची तक्रार आलेल्या अनेकांचा शोध घेण्यासाठी त्यांनी दिल्लीपासून थेट दार्जिलिंग गाठलंय. 'एखाद्या गुन्ह्याचा तपास करण्यापेक्षा मला बेपत्ता लोकांना शोधून काढून त्यांची आपल्या कुटुंबीयांशी भेट घडवून देणं मला अधिक महत्त्वाचं काम वाटतं. त्यातही बेपत्ता झालेल्या लहान मुला-मुलींना आपल्या आई-वडिलांकडे सुखरुप पोहोचवण्यासारखं समाधानाचं काम नाही असं मला वाटतं' असं ५२ वर्षांचे राजेश पांडेय सांगतात. *असं आहे 'पांडेय मॉड्यूल'...* ब...
Image
डॉक्टर सुभानाली अकाब यांना पीएचडी मध्ये गोल्ड मेडल प्रदान    डॉक्टर सुभानाली अकाब यांच्या उत्कृष्ट कार्याची व आयुर्वेद मध्ये करण्यात आलेल्या संशोधनाची नोंद घेत  त्यांना ना पीएचडी मध्ये गोल्ड मेडल प्रदान करण्यात आले .  हे त्यांच्या आयुष्यामध्ये चौथा मेडल आहे व त्यांच्या उत्कृष्ट आयुर्वेदामध्ये संशोधन व अभ्यास, प्रबंधक  ह्या स्वभावामुळे त्यांना गोल्ड मेडल प्रदान करण्यात आलं.        महाराष्ट्रातले आयुर्वेदचे चांगले अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वांना ते  सुपरिचित आहे. सुवर्ण पदक मिळाल्यामुळे त्यांचा मित्रपरिवारने अभिनंदन केले.
Image
*हैदराबाद येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय*  वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :-  लंगडी 18 वर्षा आतील स्पर्धेमध्ये महाराष्ट्र मुलींचा संघ फायनल सामन्यांमध्ये विजता महाराष्ट्र संघामध्ये लंगडी असोशिएशन ऑफ वर्धाची उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या खेळायचे प्रदर्शन दाखवले लंगडी स्पर्धेमध्ये कु. सुहानी नेहारे हिला उत्कृष्ट प्लेयर म्हणून सन्मानित करण्यात आले विजेता खेळाडूंचे नाव.कु तनश्री प्रकाश मेश्रे. कु अंकिता बळवंत नेहारे कु.भाग्यश्री दशरथ चौधरी कु. दर्शना अनिल कावरे .कु वैष्णवी अरुण वानखेडे .कु. अनिशा सुनील चलाख कु .प्रीती पद्माकर कुमरे महाराष्ट्र प्रशिक्षक. श्री प्रमोद नागोसे सागर राऊत संघ व्यवस्थापक म्हणून श्री रविंद्र वानखेडे यांनी आपल्या यशाचे श्रेय लंगडी असोशिएशन ऑफ वर्धाचे सचिव श्री अनंत भाकरे यांना दिले व आपल्या आई-वडिलांना दिले लंगडी 18 वर्षा आतील स्पर्धेमध्ये महाराष्ट्र मुलींचा संघ फायनल सामन्यांमध्ये विजता महाराष्ट्र संघामध्ये लंगडी असोशिएशन ऑफ वर्धाची उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या खेळायचे प्रदर्शन दाखवले लंगडी स्पर्धेमध्ये कु. सुहानी नेहारे हिला उत्कृष्ट प्लेयर म...
Image
*दोंदुडा या परिसरात शिवपांदन रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट  .* *राहुल दूरतकर, तालुका प्रतिनिधी हिंगणघाट 9923937033* वडनेर वार्ताहर:-दि 21/12/2019 परिसरातील दोंदुडा या परिसरात शिवपांदन रस्त्याची अवस्था अत्यन्त बिकट आहे शेतकऱ्यांना या रस्त्यावर मोठे मोठे गड्डे तसेच कच्या प्रकारचा रस्ता असल्यामुळे शेतकऱ्यांना फार त्रास सहन करावा लागतो म्हणून या पांदण रस्त्याची मजबुतीकरण करणे. जि.प.व पंचायत समिती फंड देने, तसेच प्रधानमंत्री आवासयोजनेअंतर्गत वर्गवारीचे OBC टार्गेट वाढविणे बाबत आज नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्याचे महसूलमंत्री श्री बाळासाहेब थोरात यांना संजय शिंदे जी.प.गटनेते, मिलिंदभाऊ कोपुलवार जि. प.सदस्य,सरपंच घवघवें,सरपंच राजू मंगेकर, प्रमोद महाजन,आशिष पोतुरकर पंचायत समिती सदस्य, कुमुदिनी अ. बोबडे पंचायत समिती सदस्य यांनी निवेदन दिले. *राहुल दूरतकर, तालुका प्रतिनिधी हिंगणघाट 9923937033*
Image
आज दि ,२०-१२-१९ वैराग्यमूर्ती *गाडगे बाबांच्या पुण्यतिथी* चे औचित्य साधत भुकेल्याना अन्न तहानलेल्याना पानी अशा गाडगेबाबांच्या म्हणीप्रमाणे निरास्रित निराधारांना फळे बिस्किट व *ब्लँकेट* बसस्थानक ,रेल्वे स्टेशन ,मंदिर ,मस्जिद अश्या ठिकठिकाणी *ब्लँकेट वाटप* *भूमिपुत्र संस्थेचा* दरवर्षी प्रमाणे याही वर्षी केला उपक्रम  , नीराधारांना माणुसकीचे दर्शन घडवून जपली माणुसकी जे आभाळालाच छत समजुन उघड्यावर राहतात त्यांचे काय ?याच विचाराने प्रेरीत सदस्यांनी त्यांच्या साठी ही थंडी जीवघेणी ठरते , अश्या निराधारांना ब्लँकेट भेट देउन *भूमिपुत्र संस्थेने* माणुसकी जपली ,त्यावेळी संस्थेचे सर्व सन्माननिय सदस्य उपस्तीथ होते .
Image
**वेणी येथे माता सभेचे आयोजन * *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी ,  हिंगणघाट 9923937033* हिंगणघाट तालुक्यातील वेणी या गावात प्रथम संस्थे मार्फत विविध उपक्रम घेण्यात येतो. यात मुलांना हसत खेळत शिक्षण, विविध विषयाचे मेळावे असो किवा शारीरिक करीता स्पोर्ट ईवेंट अशे विविध उपक्रम या सामाजिक संस्थे मार्फत राभविन्यात येतो. यातच मुलांच्या शिक्षणात पालकचा सहभाग वाडविन्या करिता आज वेणी येथे माता सभा घेण्यात आली. 1 ते 2 री तील मुले हे सतत आई च्या सांनिध्यत राहत असतो. पण ग्रामीण भागातील माताना मुलांचा अभ्यास घेण्या करिता पुरेसा वेळ नसतो. परंतु प्रथम संस्थे चे अमोल इटेकार सर यांनी आज मातांना सोप्या व घरघुती काम करीत असताना सुध्दा आपण मुलांचा अभ्यास घेऊ शकतो हे त्यांनी प्रत्यक्ष डोमो स्वरुपात माताना करुण दाखविले. आपले मुले हे पुढील आधार स्तंभ आहे. त्याचा पाया मजबूत करुण, त्याना योग्य संस्कार देणे गरचेचे आहे. असे या वेळी अमोल ईटेकर यांनी सांगितले.मातांशी चर्चा करीत असतांना या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. मुलांशी कश्याप्रकारे चर्चा साधावी.मुलांचे साहित्य व गृह कार्य कशे सोडून घ्यावे.मुलां...
Image
लासुर स्टेशन येथे सुधारित नागरिकत्व कायदा विरोधात शांततेत मोर्चा  सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी फिरोज मंन्सुरी शेख  लासूर स्टेशन येथे N R C व ‌C A B. कायदा विरोधात सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने रॅलीय काढण्यात आली महा मानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतल्या समोर N R C वC A B‌ च्या विरोधात जाहीर निषेध करण्यात आले पि आय सय्यद साहेब तहसील प्रतिनिधी यांना निवेदन देण्यात आले यावेली मोबीन मौलाना संपत शेठ छाजेड़ अनिल जाधव संतोष जाधव विश्वनाथ बारसे तानाजी बन्सोडे अजित जाधव राजेक सय्यद जूनेद शेख योगेश साळवे नजीर शेख ‌जाफरशेठ रईस भाई ‌वसिम शेख अनवर शेख व सर्व मित्र मंडल  सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ प्रतिनिधी फिरोज मंन्सुरी शेख 
Image
*राज्यातील शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा*  वर्धा जिल्हा प्रतिनिधी:पवन चंबुलवार :-  दुष्काळ, अवकाळी पाऊस अशा नैसर्गिक आपत्तींनी पिचलेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे 30 सप्टेंबर 2019 पर्यंतचे बिना अटी सरसकट कर्ज माफ केले आहे. तसेच यावेळी राज्य सरकारने नियमित कर्जाचे हफ्ते भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील लवकरच मोठी घोषणा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ही इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी असणार असल्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. गोरगरीब शेतकऱ्यांना ज्यांचे कर्ज ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत आहे, ते सर्व थकीत कर्ज २ लाखापर्यंत हे सरकार त्या कर्जातून त्याला मुक्ती देत आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही आज मी या सभागृहात जाहीर करतो आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अटी शर्ती घालण्यात आलेल्या नाही. कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठे...
Image
*दारोडा येथे हिंगणघाट धानोरा मार्गाच्या बसचा अपघात* *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट / वर्धा 9923937033*  स्थानीय दारोडा येथील हिंगणघाट धानोरा मार्गाची बस दारुडा इथे थांबली असता बस मधून शाळेचे विद्यार्थी उतरत असताना थांबलेल्या बस ला मागून येणाऱ्या ट्रक नी जोरदार धडक दिली. त्यामुळे बसमधील मागच्या सीट वर बसून असणारे धानोरा येथील विद्यार्थी व वडणेर येथील एक विद्यार्थी आणि चार लेडिच यात जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामिण रुग्णालय वड्णेर येथे उपचार करण्यात आला . आणि बस मधिल बाक्की सर्व प्रवासी सुरक्षित असून पुढील तपास वड्णेर पोलिस करीत आहेत . *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट / वर्धा 9923937033*
Image
*राष्ट्रीय ओबीसी महासंघाची विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत बैठक संपन्न* चंद्रपूर (का.प्र.) : राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या विविध मागण्यांना घेवुन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि.20) ला दुपारी 3 वाजता नागपुर येथील विधानभवनात बैठक संपन्न झाली.  या बैठकीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे, महासचिव सचिन राजुरकर, राष्ट्रीय कर्मचारी-अधिकारी महासंघाचे अध्यक्ष शामभाऊ लेडे, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या अध्यक्षा सुषमा भड, कल्पनाताई मानकर, उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, उपाध्यक्ष शरदराव वानखेडे, रमेश ताजने, ओमदास तुराणकार आदी उपस्थीत होते. या बैठकीत, पुढील महिन्यातील पहील्या आठवड्यात राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक लावून मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे सभापती नाना पटोले यांनी आश्वासन दीले. बैठकीत 2021 मधे होणा-या राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींची जनगणना करावी, राज्याप्रमाणेच केंद्रामधे ओबीसी मंत्रालयाची स्थापणा करण्यात यावी, देशात व राज्यात 27% ओबीस...
Image
*उन्नाव बलात्कार प्रकरण- माजी भाजपा आमदार कुलदीप सेंगरला जन्मठेपेची शिक्षा*  वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार  उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपाचा निलंबित आमदार कुलदीप सिंह सेंगर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्लीमधील तीस हजारी न्यायालयाने हा निर्णय सुनावला आहे. *यावेळी न्यायालयाने कुलदीप सिंह सेंगरला पीडितेला २५ लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला आहे. संपूर्ण देशभरात गाजलेल्या उन्नाव बलात्कार प्रकरणात कुलदीप सिंह सेंगरला न्यायालयाने १६ डिसेंबर रोजी दोषी ठरवलं होतं. यावेळी १९ डिसेंबरला शिक्षेवर सुनावणी करणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. त्यानुसार न्यायालयाने कुलदीप सिंह सेंगरला जन्मठेपेची शिक्षक सुनावली आहे. * _जाहिरातीसाठी संपर्क - 8308375118_*
Image
जय हिंद *राहुल प्रियंका गांधी सेना (कॉग्रेस )* हिंगणघाट तालुका पदाधिकाऱ्यांची निवड वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :- आज दिनांक 19/12/19 रोजी हिंगणघाट येथे राहुल प्रियंका गांधी सेना (कॉग्रेस ) च्या वतीने हिंगणघाट तालुका जय हिंद *राहुल प्रियंका गांधी सेना (कॉग्रेस )* हिंगणघाट तालुका पदाधिकाऱ्यांची निवड वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :- आज दिनांक 19/12/19 रोजी हिंगणघाट येथे राहुल प्रियंका गांधी सेना (कॉग्रेस ) च्या वतीने हिंगणघाट तालुका पदाधिकारी पदग्रहण समारंभ हरिओम मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राहुल प्रियंका ग़ांधी सेना प्रदेशाध्यक्ष अभिजीत पाटील फाळके, प्रदेश उपाध्यक्षा तेजस्वी बारबद्वे, वर्धा जिल्हा अध्यक्ष माजी सैनिक प्रवीण पेठे, योगेश घोगरे, पंकज इंगोले, पंढरीनाथ कापसे, ज्वलन्त मून, मंगला ठक आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीत हिंगणघाट तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी काशीराम गुळघाणे तर वर्धा जिल्हा उपाध्यक्ष हरीश ढगे, हिंगणघाट तालुका उपाध्यक्ष निखिल जौंजाळ, सचिव आरिफ शेख, तालुका संघटक रविकिरण कुटे, सहसचिव मोहन तुमराम यांना र...
Image
*वर्धा नगरपालिकेच्या हाकेच्या अंतरावर* वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार दि.१९.१२.२०१९ :- असलेले वर्धा नागपूर अतिरहदारीच्या महामार्गावर केसरीमल कन्या विद्यालयासमोरील शाळेच्या चारही प्रवेशद्वारा समोर वाढत्या अतिक्रमणामुळे  शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवितेला तसेच सर्व सामान्य नागरिकांना व इतर वाहन चालकांना दररोज अपघाताला सामोरे जावे लागत असल्यामुळे शाळेच्या चारही प्रवेशद्वारा समोरील वाढत्या अतिक्रमनावर कायमस्वरूपी कारवाई करावी व न्याय द्यावा तसेच बजाज चौक येथील हॉलिडे रिसॉर्ट चे प्रवेशद्वारासमोर तेथील किरकोळ दुकानदारांनी व हाथठेले चारचाकी बंडी व प्रवासी ऑटो वाहनांनी अतिक्रमण केल्यामुळे दररोज अपघाताच्या घटना घडत आहे वरील प्रमाणे दोन्ही अतिमहत्वाच्या विषयावर नगरसेविका सौ रंजना सुरेश पट्टेवार व सामाजिक कार्यकर्ते सुरेश पट्टेवार यांनी निवेदन दिले व त्वरित अतिक्रमण काढून मार्ग मोकळा करण्यात आला।
Image
*थेट सरपंच निवड रद्द; विधानसभेत विधेयक बहुमताने मंजूर* !!!! नागपूर  सन २०१४ मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर प्रभाग पध्दत सुरू झाली. तसेच नगराध्यक्ष, सरपंच थेट जनतेतून निवडण्याची पध्दत लागू केली होती.  भाजपच्या या सर्व पध्दतींवर अंकूश आणण्यासाठी ठाकरे सरकारने आज अधिवेशनामध्ये ही पद्धत रद्द करण्याचे विधेयक बहुमताने मंजूर करून फडणवीस सरकारच्या या निर्णयला लगाम घातला आहे. फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी २०१६ साली नगरपालिका आणि ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये नवीन पद्धत सुरु केली होती. फेब्रुवारी २०१४ साली देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकांसाठी दोन महत्वाचे निर्णय घेतले होते. यामध्ये चार प्रभागांचा मिळून एक प्रभाग पद्धत. पूर्वी नगरसेवक एकाच प्रभागातून निवडून येत होता. मात्र, नवीन पद्धतीनुसार चार प्रभागांचा मिळून एक प्रभाग झाल्याने त्याला आपल्या प्रभागाव्यतिरिक्त अन्य तीन प्रभागामध्येही निवडून यावे लागत होते. तर, दुसरा निर्णय म्हणजे नगराध्यक्ष आणि सरपंच *थेट जनतेतून निवडण्याची पद्धत. हे दोन्ही निर्णय रद्द करण्यासाठी ठाकरे सरकारने हालचाली सुरू केल्...
Image
घोटी येथे गर्जुना ब्लॅंकेट व स्वेटर चे वाटप। घोटी ग्रामपालिके चे सदस्य  व श्रीकृष्ण मित्र मंडळ चे वतीने गरीब लोकांना स्वेटर व ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले ,दरम्यान घोटी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे कौतुक करण्यात येत आहे...इगतपुरी प्रतिनिधी निवृत्ती मेदडे ९८२२५०२१५७
Image
आज पिशोर येथे जावेद भाई शेख यांच्या वाढदिवसा निमीत्त.जिल्हा.परीषद केंद्रिय प्राथमीक शाळा शफिपुर पिशोर येथे  दिनाक.14/12/2019 वार शनिवार रोजी शाळेतील विद्यार्थांना 🥛🥛🥛बासुंदी वाटपाचा कार्यक्रम 12:00: वाजता करण्यात आला आहे या निमीत्त जावेद भाई यांचा वाढदीवस साजरा करण्या साठी गांवातील प्रतिष्ठित नागरीक कन्नड पंचायत समिति सभापति बाळासाहेब मोकासे तंटामुक्ती समिती अध्यक्ष पिशोर सुर्यकांत भाऊ मोकासे मा.सरपंच जनार्धन (बापु) मोकासे सामाजिक कार्यकर्ते योगेश आप्पा मोकासे सुर्यभान दहेतकर सर उपसरपंच अरुण सोनवणे रवि भाऊ वाघ राजेंद्र मोकासे सर रवी भाऊ परदेशी विजय जाधव गणेश जाधव बापु खड़खड़ जाकेर भाई शेख सोना जी बापू दिनेश जाधव बंन्डु आण्णा जाधव पाशु पेंटर फैज भाई डॉक्टर मुख्तार मीस्तरी शायरियां समिति अध्यक्ष काकासाहेब भाऊ जाधव दत्तु भाऊ जाधव समाधान डाहके व शाळेतील सर्व शिक्षक मुख्यध्यापक केंद्र प्रमुख व गांवातील नागरीक उपस्थित होते
Image
*आज सावंगी (मेघे), वर्धा येथे* *खासदार सुप्रियाताई सुळे* वर्धा जिल्हा प्रतिनिधी पवन चंबुलवार :-  यांच्या उपस्तितित अखिल भारतीय माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे व  वर्धा जिल्हा माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व्दारा आयोजीत *”59 वे मुख्याध्यापकाचे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन”* पार पडले कार्यक्रमास उपस्थित *माजी आमदार प्रा.राजु तिमांडे.*
Image
*स्थानिक गुन्हे शाखा वर्धा*  वर्धा जिल्हा प्रतिनिधी:पवन चंबुलवार :- मोटरसायकल चोरीत 2 विधि संघर्षित बालका कडून 5 मोटारसायकली जप्त केल्या दी. 13.12.2019 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक वर्धा हिंगणघाट जाम परिसरात मोटर सायकल चोरीचे गुन्हया संबंधाने गस्तीवर असताना गोपनीय प्राप्त माहितीआधारे 2 विधि संघर्षित बालक यांना तब्येत घेऊन त्यांच्याकडील 2 मोटर सायकल बाबत विचारपूस केली असता त्याच्या ताब्यातील 2 ही मोटारसायकल चोरीच्या असल्याची माहिती पंचा समक्ष देऊन विधि संघर्षित बालक यांनी देऊन त्यांच्या सथिदार सह आणखी मोटरसायकल चोरी केल्याचे निवेदन दिले. त्या निवेदनाप्रमाणे पथकाने हिंगणघाट परिसरातून 3 मोटारसायकली जप्ती मेमोरंडम पंचनामा प्रमाणे जप्त करून एकूण जूमला किंमती. 1,20,000/- रुपयाचा माल जप्त केला असून वरील विधि संघर्षित बालक याचेकडून जप्त करण्यात आलेल्या मोटर सायकला बाबत पोलिस स्टेशनला चौकशी केली पोलिस स्टेशन समुद्रपूर येथील 01 एक गुन्हा व पोलीस स्टेशन हिंगणघाट चार गुन्हे दाखल असून असे पाच गुन्हे उघड झालेले आहे. सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली सा. मा. अप्पर पोलीस अधीक...
Image
*एका जागृत नागरीकाने सापडलेला मोबाईल सायबर पोलीस स्टेsशनला* वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवा :-  आणुन देवून मानुसकीचा परिचय दिला. दिनांक १३-१२-२०१९ रोजी श्री अन्नाजी कोठेवार, रा. स्वागत कॉलनी, वर्धा यांचा मोबाईल त्यांचे घराजवळच्याच परिसरात हरविला होता. सदर मोबाईल हा श्री राजेश पिसुड्डे यांना सापडला त्यांनी तो मोबाईल विलंब न करता सायबर पोलीस स्टेशन,  पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा येथे आणुन दिला व श्री अन्नाजी कोठेवार यांना तो मोबाईल सुपूर्द केला. श्री राजेश पिसुड्डे यांनी मानुसकीचा व दक्ष नागरीकतेचा परिचय दिल्याने त्यांचे मा. पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा श्री निलेश ब्राम्हणे यांचे हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे सर्वांना आवाहन करण्यात येते की, कुणालाही कोणताही हरविलेला मोबाईल सापडल्यास क्षणाचाही विलंब न करता तो सायबर पोलीस स्टेशन आणुन दयावा.
Image
*सेलू पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक* वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :-  सुनील विठ्ठलराव गाडे यांचा 43 वा वाढदिवस पोलीस स्टेशन सेलू येथे साजरा करण्यात आला त्या वेळेस पोलीस उपनिरक्षक घरडे सफो मोतीलाल धावणे सुधाकर पचारे सुरेश शिरोडे जवादे अमोल राऊत राजेश पचारे धनराज सयाम अमोल नगराळे कपिल मेश्राम माणिक राऊत घनशाम ढोणे निखिल काळे थिमसिंग पंचभाई पवार तुरक अर्चना इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
Image
*मी पक्ष सोडणार नाही, पक्षाला मला सोडायचं असेल तर निर्णय घ्यावा : पंकजा मुंडे* भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज (12 डिसेंबर) जयंती आहे. या निमित्ताने त्यांची कन्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आज गोपीनाथ गडावर खास मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता यांच्यासह नेते, पदाधिकारी आणि पंकजा मुंडे यांचे समर्थक उपस्थित होते. *यावेळी केलेल्या भाषणादरम्यान पंकजा मुंडे यांनी भारतीय जनता पक्षातील काही नेत्यांवर, प्रामुख्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. पंकजा मुंडे म्हणाल्या की, कोणताही पक्ष एका व्यक्तीच्या मालकीचा नसतो. असे म्हणत पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले.* वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :- पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी फेसबुकवर पोस्ट लिहून या मेळाव्यासाठी आव्हान केले. त्याच्या दोन दिवसांनंतर मी पक्ष सोडणार, मी पक्षाविरोधात बंडखोरी करणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या. परंतु आज मी या व्यासपीठावरुन सांगू इच्छिते की, मी पक्ष सोडणार नाह...
Image
आज दि.12।12।2019 ला माननीय *अनंतरावजी गुडे* (संपर्क प्रमुख जिल्हा वर्धा), वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार  *प्रशांतभाऊ शहागडकर(* जिल्हा प्रमुख वर्धा) यांच्या नेतृत्वाखाली आर्वी *_शिवसेना_* तालुका प्रमुख *गणेश आजने* शिवसैनिकाणी जन्मदिवस हा त्यांच्या शिवसैनिकानि आगळ्या वेगळा पद्धतीने साजरा केला सरकारी ऑफिस विषयी जनतेची असलेली जबाबदारी त्यांच्या या पद्धतीतुन दिसून आली त्यांनी आज महाराष्ट्र राज्याचे *मुखमंत्री* _माननीय_ *उद्धव साहेब ठाकरे*_ यांची प्रतिमा आर्वी तहसीलदार माननीय *चव्हाण सर* यांच्या कडे भेट म्हणून तेहशील कार्यालयात लावायला दिली या वेळी शिवशेनेच आर्वी तालुक्यातील *चंद्रशेखर नेहारे* (आष्टी तालुका प्रमुख)शेख मोहशीम,पिंटूभाऊ छागाणी,मिथुनभाऊ कोरडे प्रफुल सोनोने, प्रमोद सोनटक्के अजय आगासे संदीप नेमाडे,विनोदशिंग राजपुरोहित,गोवर्धन मेश्राम व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
Image
*यवतमाळ जिल्ह्यातील सामान्य परिवारातील रुग्णांचा मदतीकरिता सदैव धावपळ करनारा महेश हनुमंते यांचा प्रयत्नाला आणखी एकदा यश .* *म्हणतात ना देव तारी, त्याला कोण मारी* *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट 9923937033*  वड्णेर :- खैरी येथील प्रदीपभाऊ ठमके यांचा काही दिवसांपूर्वी महेश हनुमंते यांना कॉल आला, की चंद्रपुर जिल्ह्यातील भद्रावती जवळील कोंडेगाव येथील प्रदीपभाऊचे नातेवाईक असलेले अनुप चौधरी हे डोक्याचा आजाराने त्रस्त असुन घरची परिस्थिती हालाकीची आहे हे एकताच महेश हनुमंते यांनी तात्काळ प्रहार जनशक्ती पक्षाचे विदर्भ प्रमुख तसेच बच्चुभाऊ कडू यांचे समर्पित कार्यकर्ते रुग्णमित्र- गजुभाऊ कुबडे यांचेशी संपर्क साधला असता रुग्णमित्र- गजुभाऊ कुबडे यांनी तात्काळ सेवाग्राम येथील रुग्णालयात अनुप चौधरीला भरती करण्याचा सल्ला दिला , वेळ ना घालविता दुसरेच दिवशी प्रदीपभाऊ ठमके सह अनुपला घेऊन सेवाग्राम रुग्णालय गाठले अनुपचा सर्व तपासण्या केल्या असता अनुप चौधरीला ब्रेन मध्ये डाव्या बाजूला हाइमाटोमा झाला असल्याचे डॉक्टरयांनी सांगितले ( डोक्यातिल डाव्या बाजूचा रक्ताचा नसे मधून ब्रेनला रक्त पु...
Image
*बँक ऑफ इंडिया च्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार .* *ग्राहकांना बँकेच्या कामाकरिता कराव्या लागतात येरजारा .* *राहुल दूरतकर , हिंगणघाट तालुका प्रतिनिधी 9923937033* * स्थानीय वड्णेर येथील बँक ऑफ इंडिया च्या कर्मचाऱ्यांमुळे बँकेतील खातेदारांना , विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठांना बँक मध्ये आतोनात त्रास सहन करावा लागत आहेत. वारंवार करणे ऐकून कर्मचाऱ्यां बदल चा असंतोष वड्णेर परिसरातील शेतकरी , विद्यार्थी आणि जेष्ठ नागरिकांमध्ये वाढत आहेत . नागरिकांना अरेराव्ही करून एकाच कामाकरीता वारंवार बोलून सुध्दा काम होत नाही त्यामुळे वड्णेर परिसरातील लोकांची येथील बँक कर्मचाऱ्यांच्या बाबत नाराजी दिसून येते . वड्णेर परिसरातील 25 ते 30 गावातील नागरिकांना याच बँक मधून आपलं आर्थिक व्यवहार करावा लागतो . आता शेतकरी व विद्यार्थी वर्गाना नेहमी बँक मध्ये शाळेच्या आणि शेतीच्या कामा करिता रोज बँक मध्ये यावे लागते , परंतु येथील कर्मचारी एकाच व्यक्ती ला एका कामासाठी दहा वेळा चकरा मरायला लावतात . लिंक नाही , कर्मचारी सूट्टी वर आहेत अश्या प्रकारचे रोज कारण सांगून काम टाळतात , या सर्व प्रसंगामुळे नागरिकांना बाहेर ...
माध्यमिक शाळा तऱ्हाळे येथे कला,क्रीडा,व सौस्कृतीक स्पर्धेचे उद्धाटन संपन्न। इगतपुरी तालुक्यातील बेलगाव तऱ्हाळे येथे कला,क्रीडा व सौंस्कृतीक कार्यक्रमाचे उदघाटन माजी उपसभापती पंचायत समिती इगतपुरीचे पांडुरंग वारुगसे याचे शुभहस्ते पार पडले.याप्रसंगी सुखदेव आव्हाड,सरपंच अशोक मोरे,विजय कर्डक,साहेबराव आव्हाड,अंबादास आव्हाड,कचरू आव्हाड,चंदू आव्हाड,अशोक मोरे,शाळेचे मुख्याध्यापक श्री.अलगद,बाजीराव वाकचौरे व सौ.गायकर आदी मण्यार उपस्थित होते. (इगतपुरी तालुका प्रतिनिधी) (निवृती मेदडे ),सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज ९८२२५०२१५७

गुजराती व्यवसाय मध्येयामळे असतात पुढे

Image
सत्तरच्या दशकातील ही गोष्ट आहे जेव्हा दलपत भाई पटेलांनी अमेरिकेच्या भूमीत प्रवेश केला होता. आपल्या पत्नी आणि मुलांसोबत अंकल सॅमच्या देशात उभे राहिले होते. बाहेरच्यांना फक्त ऐश्वर्य दिसतं पण प्रत्यक्षात मात्र जिथले लोक रात्रंदिवस मेहनत करून आपले साम्राज्य निर्माण करतात त्या देशात भारतातून गेलेल्या आणि कृष्णवर्णीय म्हणून हिणवले गेलेल्या व्यक्तीने आपले मॉटेलचे साम्राज्य निर्माण करावं ही निश्चितच साधारण गोष्ट नाही! एक मोडकळीस आलेलं आठ खोल्यांचं मॉटेल त्यांनी स्थानिक व्यक्तीकडून विकत घेतलं. सर्वात पहिली गोष्ट त्यांनी केली ती म्हणजे त्यांनी मॉटेल समोरचा बोर्ड उपटून टाकला. त्या बोर्डवर लिहिलेले ‘रात्री बंद राहील’ चे शब्द त्यांना बोचत होते. आता याचा अर्थ होता दलपतभाई ते मॉटेल चोवीस तास उघडे ठेवणार होते. दिवसभर ते एका स्थानिक कंपनीत नोकरी करायचे आणि त्यांच्या पत्नी त्यावेळी मॉटेलचे व्यवस्थापन सांभाळायच्या. नोकरीहून परतल्यानंतर दलपतभाई स्वतः रात्रभर नोकरीचा फॉर्मल ड्रेस घालूनच मॉटेल सांभाळायचे! हीच ती गोष्ट आहे जी गुजरात्यांना त्यांच्या धंद्याच्या बाबतीत इतरांपेक्षा भिन्न बनवते. व्यवसायाच्या यशा...

बाजीराव मस्तानी यांच्या पुत्राचा पराक्रम !!

Image
आई वडिलांच्या मृत्यूनंतर समशेर बहाद्दरला कुणी सांभाळले ? पेशव्यांनी त्याला बाजीरावांचा मुलगा म्हणून राज्यात स्थान दिले कि नाही ? मराठ्यांचे ६वे पेशवा बाजीराव यांच्याबद्दल माहित नसेल असा माणूस सहसा सापडणार नाही. कदाचित बाजीरावांनी काय पराक्रम केला या पेक्षा माणसांच्या तोंडावर बाजीराव मस्तानी हेच नाव जास्त फिरत असावे. याचबद्दल आपण काही जाणून घेऊया. मस्तानी हि बाजीरावांची दुसरी पत्नी, पहिली पत्नी काशीबाई यांच्यापासून बाजीरावांना बाळाजी बाजीराव, रघुनाथराव व जनार्दनराव अशी अपत्ये झाली. मस्तानी आणि बाजीराव यांना मात्र एकच अपत्य होते. त्याचे नाव होते समशेरबहाद्दर, त्यांना कृष्ण राव असे सुद्धा म्हंटले जाते. त्यांनीही मराठ्यांच्या इतिहासात आपले अमूल्य योगदान दिले आहे. आज आपण समशेरबहाद्दर यांच्याबद्दल जाणून घेऊया. bajirao mastani vanshaj, bajirao mastani son, बाजीराव मस्तानी (Source – Patrika) ओळख राजपूत राजा छत्रसाल आणि त्याची बायको रुहानी बाई बेगम यांची मुलगी होती मस्तानी, बाजीरावांनी छत्रसालला शत्रूपासून सुरक्षित ठेवल्यामुळे खुश होऊन छत्रसालने मस्तानीचा विवाह बाजीरावांशी केला. बाजीराव, मस्तान...
Image
*मानवाधिकार संघटने तर्फे लक्ष्मीकांत धानोरकर यांचा सत्कार* आताराष्ट्रीय मानवाधिकार दिवसाचे औचित्य साधून केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्ली यांच्या मार्फत नागपूर येथे राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमात सामाजिक दायित्व निभावणार्या अवलीयांचा सत्कार करण्यात आला . यात दारू व्यसनमुक्ती साठी ग्रामीण भागात अविरत कार्य करणाऱ्या लक्ष्मीकांत धानोरकर यांचा सत्कार या वेळी करण्यात आला धानोरकर हे अंबुजा कंपनीत कार्यरत असून सोबतच दारू व्यसन मुक्ती साठी नेहमी झटत असतात. त्यांनी परिसरातील हजारो युवकांना आतापर्यंत दारू मुक्त केले आहे. या साठी त्यांना अनेक सामाजिक संघटनांकडून पुरस्कार देखील मिळाले असून महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार देखील त्यांना मिळाला आहे. विविध सामाजिक संघटना मध्ये धानोरकर सक्रिय पदाधिकारी असून कित्येक समजउपयोगी उपक्रम त्यांनी राबविले आहेत. व्यसनी लोकांसाठी अनेक शिबीर त्यांनी आयोजित केलेली आहे. जनजागृती सोबतच मार्गदर्शनाचे कार्यक्रम घेऊन एक वेगळा आदर्श समाजा पुढे उभा केला आहे . याचीच दखल घेत दिनांक 10 डिसेंम...
Image
*श्री साई सेवा संकल्प प्रतिष्ठान तर्फे दंत तपासणी शिबिर* श्री साई सेवा संकल्प प्रतिष्ठान चंद्रपूर मार्फत नेहमी नवनवीन उपक्रम घेतले जातात. प्रतिष्ठान चे प्रत्येक उपक्रम हे त्याचे ब्रीद वाक्य *सेवा मे साई* नुसार पार पाडल्या जाते . दिनांक ८ डिसेंबर २०१९ रोजी रविवारला स्थानिक मूक बधीर निवासी शाळा बाबूपेठ चंद्रपूर येथे दंत तपासणी शिबिर घेण्यात आले. सदर शिबिराला *डॉक्टर श्री सूरज करवाडे व डॉक्टर श्री शशिकांत बेरशेट्टिवार* शाळेच्या मुखयाध्यापिका सौ माधुरी शास्त्रकार यांचे सहकार्य लाभले. सदर उपक्रम करिता श्री साई सेवा संकल्प प्रतिष्ठान चे अध्यक्ष सचिन गाटकिणे, सचिव नवीन कपूर, उपसचिव विनोद गोवारदिपे, कोष्याधक्ष प्रमोद वरभे, सदस्य कृणाल खनके, प्रतिक लाड, रुपेश महाडोळे, सचिन बरबटकर, सुरेश सातपुते, भागवत खटी, दिघराज पेंढारकर, भूषण कल्लुरवार,जयंत आगलावे, पुनम नवले, सुरेखा संतोषवार, मंजुषा धाईत, रिंकी कपूर, रश्मी कल्लूरवार यांनी परिश्रम घेतले.
Image
लहान आर्वीच्या प्रीतम गायकीने भारद्वाज पक्ष्याला दिले जीवदान *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट 9923937033**  प्रतिनिधी/10 डिसेंबर लहान आर्वी : प्रीतम हा घरून आष्टी ला जाण्याकरिता निघाला असता त्याला रस्त्या मद्ये एक घायाळ पक्षी दिसला त्या पक्ष्याला जबर मार लागला होता त्यामुळे त्या पक्ष्याला उळता येत नव्हते प्रीतम यांनी आपली गाडी उभी करून त्या पक्ष्याला हातावर घेतले आणि त्या पक्ष्याला उपचारा करिता घरी आणले आणि त्या पक्ष्याला पाणी पाजून उपच्यार केला आणि त्या पक्ष्याला जगला मद्ये सोडण्यात आले प्रीतम हा लहान आर्वी येथिल वार्ड क्र,1 चा रहीवाशी आहे त्याच बरोबर तो सामाजिक कार्यकर्ता सुद्दा आहे त्याच्या या पक्षी प्रेमच्या कार्य मूळे एका घायाळ पक्ष्याला जीवदान मिळाले या कार्या मुळे प्रीतम चे सोशल मीडियावर चांगलेच कैवतुक होत आहे. **राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट 9923937033**
Image
*पिंपरी गावांनी अंगिकारली गाव तेथे प्रहार ची संकल्पना .* *रुग्णमित्र गजूभाऊ कुबडे यांच्या उपस्थितीत पिंपरी येथे प्रहार जनशक्ती पक्षाची स्थापना .* *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट 9923937033* वड्णेर :- हिंगणघाट तालुक्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत असलेल्या पिपरी (पोहणा) येथे शेतकरी नेते अपंगाचे कैवारी आदरणीय आमदार बच्चुभाऊ कडू यांचा विचारांना प्रेरित होऊन प्रहार जनशक्ती पक्षाची सभा पक्षाचे विदर्भ प्रमुख रुग्णमित्र- गजुभाऊ कुबडे यांचा प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली या वेळी पिपरी येथे प्रहार जनशक्ती पक्षाची शाखेची स्थापना करण्यात आली या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे विदर्भ प्रमुख रुग्णमित्र- गजुभाऊ कुबडे यांनी पक्षाचा ध्येय धोरणासंदर्भात माहिती दिली तसेच आदरणीय आमदार बच्चुभाऊ कडू तसेच सर्व प्रहार सदैव आपल्या पाठीशी खंबीर पणे उभी असल्याची ग्वाही दिली या वेळी पिपरी येथील सरपंच सौ. मडावीताई, उपसरपंच श्री.बरडेजी, दादाराव चरडे, बालू रेंडे, प्रहारचे पोहणा सर्कल प्रमुख महेंद्र बोरकर, ग्राम पंचायत सदस्य शुभम वाढई, ग्राम पंचायत सदस्य सौ.केसूरकर, नितीन केसूरकर,सूरज काळे राकेश भोयर, अमोल...
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com