सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com
*उन्नाव बलात्कार प्रकरण- माजी भाजपा आमदार कुलदीप सेंगरला जन्मठेपेची शिक्षा*

 वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार 


उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपाचा निलंबित आमदार कुलदीप सिंह सेंगर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्लीमधील तीस हजारी न्यायालयाने हा निर्णय सुनावला आहे. *यावेळी न्यायालयाने कुलदीप सिंह सेंगरला पीडितेला २५ लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला आहे. संपूर्ण देशभरात गाजलेल्या उन्नाव बलात्कार प्रकरणात कुलदीप सिंह सेंगरला न्यायालयाने १६ डिसेंबर रोजी दोषी ठरवलं होतं. यावेळी १९ डिसेंबरला शिक्षेवर सुनावणी करणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. त्यानुसार न्यायालयाने कुलदीप सिंह सेंगरला जन्मठेपेची शिक्षक सुनावली आहे. *

_जाहिरातीसाठी संपर्क - 8308375118_*
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com