सत्तेचे वारकरी--- दर्जेदार लेख नक्की वाचा !!!
सत्तेचे वारकरी सत्तेच्या पालखीचा वृत्तान्त- दि.१९ जून सर्व वारकरी ठाणे येथील महापौर बंगल्यामध्ये जमा झाले. सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतला.'धर्मवीर' महाराजांनी या सोहळ्याचे नियम समजून सांगितले. मधून कुणालाही परत येता येणार नाही, हेही सांगितले. तेथून उत्साहात सोहळा सुरू झाला. पालखीचा पहिलाच मुक्काम सुरत येथे झाला. स्वागतासाठी कंबोज आणि कुटे यांनी कंबर कसली. सर्व वारकऱ्यांची राहण्याची, जेवणाची आणि मनोरंजनाची व्यवस्था केली होती. सुरत येथे पहिले रिंगण सुरू असतानाच, उस्मानाबाद येथील एक वारकरी घराच्या आठवणीने व्याकुळ झाला. लघुशंकेचे निमित्त करून तेथून सटकला. मिळेल त्या वाहनाने घरी परतला. हे समजताच वारकऱ्यांमध्ये ठराव झाला. आता कुणालाच परतू द्यायचे नाही. एवढ्यात अकोला येथील दुसरा वारकरी मी घरी जाणारच म्हणून हट्ट करू लागला. त्याला जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये नेऊन झोपेचे इंजेक्शन देऊन झोपवला. घरून फोन आल्यावर हार्ट अटॅक आल्याचा निरोप दिला. दुसऱ्या दिवशी आसाम येथील गुवाहाटी येथे जाण्यास पालखी सोहळा निघाला. सकाळी सकाळी सुरुवातीलाच 'धर्मवीर' म...