Posts

Showing posts from May, 2020
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

सोशल मीडिया वर पसरणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन :---जिल्हाअधिकारी डॉ.बिपीन

Image
*जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये ;नमूद दुकाने, बाजारपेठा सकाळी 9 ते सायं. 5 पर्यंत सुरु राहणार  – जिल्हाधिकारी डॉ. विपीन* *सोशल मीडिया वर पसरणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन* *नांदेड नायगाव प्रतिनिधी कानोले साईनाथ मो,9604500201  दि. 29* :- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रशासनातर्फे योग्य प्रतिबंधात्‍मक उपायोजना केल्या असून सामान्य जनजीवन सुरळीत रहावे यादृष्टिने जिल्ह्यातील नमूद दुकाने व बाजारपेठा सकाळी 9 ते सायं 5 यावेळेत सुरु राहणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले आहे. काही सोशल मिडियावर यासंदर्भात येणाऱ्या अफवांवर नागरिकांनी विश्वास न ठेवता योग्य ती सुरक्षीतता घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा प्रशासनाने नमूद दुकाने, बाजारपेठा सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. परंतु नमूद दुकाने, बाजारपेठच्या ठिकाणी गर्दी वाढल्यास किंवा सामाजिक अंतराचे व वेळोवेळी निर्गमीत आदेशाचे पालन न झाल्यास दंडात्मक व कायदेशीर कार्यवाही करुन दिलेली मुभा रद्द करण्यात येईल. प्रतिबंधीत क्षेत्रात (कंटेनमेंट झोन) मध्ये केवळ जीवना...

*नागठणा येथे शिवाचार्य महाराज यांच्या खुणाचा शोध करून त्याला अटक करा*

Image
*नागठणा येथे शिवाचार्य महाराज यांच्या खुणाचा शोध करून त्याला अटक करा* नांदेड नायगाव प्रतिनिधी कानोले साईनाथ मो,9604500201 नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील मौजे नागठणा बु तालुका उमरी येथील श्री 1008 निर्वाण रुद्र पशुपती शिवाचार्य महाराज यांच्या मारेकऱ्याकऱ्याची सि आय डी चोकशी करून आरोपीस त्वरित शिक्षा करण्याची मागणी नमो फौंडेशनच्या उमरी तालुका कार्यकारणी कडून करण्यात आली आहे त्वरित कार्यवाही न केल्यास नमो ग्रुप कडून आंदोलन करण्याचा इशारा ही देण्यात आला आहे सदरील निवेदन तहसीलदार उमरी, पोलीस निरीक्षक उमरी यांना देण्यात आले असून सदरील निवेदनावर नमो महिला जिल्हा कार्याध्यक्ष विद्द्याताई अग्रवाल , तालुका अध्यक्ष दत्ताहरी पाटील पवार,हातणीकर मारोती पाटील, उपाध्यक्ष. विठ्ठल पाटील पवार बोरजुनीकर रुस्तुम बेलकर सह आदी पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत अशी माहिती सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज दिली सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज नांदेड नायगाव

रूग्ण सेवेसाठी ममतेच्या त्यागकरून रुग्ण सेवा देणारा मातेला लातूर कराच्या सलाम.

Image
रूग्ण सेवेसाठी ममतेच्या त्यागकरून रुग्ण सेवा देणारा मातेला लातूर कराच्या सलाम.                          लातूर प्रतिनिधी-आज राज्यासह संपूर्ण जगभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे.आज या संकटाच्या काळात आरोग्य,पोलीस कर्मचारी धीरोदात्तपणे लढत लोकांना सेवा देत आहेत.  लातुर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकिय संस्थेत परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या सौ निशा अतुल देशमुख (जाधव) या मातृत्व व सेवावृती जपत सोबत दोन वर्षाच्या मुलापासुन दुर राहुन कोरोनाग्रस्त रुग्नाची सेवा करत आहेत.सौ निशा अतुल देशमुख (जाधव) यांचे पती व कुटुंबीय नेहमी त्यांचे आत्मबल वाढवत त्यांना कामासाठी प्रेरित करत आहेत.रुग्णसेवेसाठी ममतेचा त्याग करून सेवा देणाऱ्या या मातेला लातूर करानी सलाम करून प्रोत्साहन दिले.सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज. दहिवडकर बी.आर.9766427052

जालना जिल्हा तिन दिवस संचारबंदी

Image
जालना जिल्हा तिन दिवस संचारबंदी च्या पार्श्वभूमीवर आज दिनांक, 29,05,20 रोजी अंबड शहरात अमलबजावणी करण्यासाठी प्रत्यक्षात संचारबंदीची पाहणी करताना उपविभागीय अधिकारी श्री शशिकांत हदगल,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शेवगन,अंबड चे तहसीलदार श्री राजीव शिन्दे, मंडळ अधिकारी एस, ए, गाडेकर तलाठी श्रीपाद देशपांडे व इतर पोलीस कर्मचारी दिसत आहे                               सुपरफास्ट महाराष्ट्रन्युज बातम्या साठी अंबड तालुका प्रतिनिधी गणेश पाटोळे

रोज अडीच हजार शेतक-यांचा कापूस खरेदी करण्याचे नियोजन

Image
रोज अडीच हजार शेतक-यांचा कापूस खरेदी करण्याचे नियोजन पालकमंत्री आणि जिल्हाधिका-यांचे विशेष लक्ष  रोज अडीच हजार शेतक-यांचा कापूस खरेदी करण्याचे नियोजन  पालकमंत्री आणि जिल्हाधिका-यांचे विशेष लक्ष  बोगस नोंदणी आणि उत्पनापेक्षा जास्त विक्री आढळल्यास कारवाई यवतमाळ, दि. 28 : शेतक-यांच्या कापसाला चांगला भाव मिळावा, त्याच्या हातात दोन पैसे जास्त यावे, या उद्देशाने शासन हमी भावाप्रमाणे शेतक-यांकडून कापूस खरेदी करते. मात्र जिल्ह्यातील शेतक-यांचा कापूस घरातच असल्याचे निदर्शनास आल्यामुळे शेतक-यांकडील कापूस त्वरीत खरेदी करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रशासनाला दिले. त्यानुसार आता रोज अडीच हजार शेतक-यांचा कापूस खरेदी करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. यावर्षीचा खरीप हंगाम तोंडावर आला आहे. मात्र अजूनही जिल्ह्यातील शेतक-यांचा कापूस घरात आहे. यावर पालकमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच शेतक-यांना दिलासा देण्यासाठी घरात असलेला कापूस त्वरीत खरेदी करा, असे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनासह सहकार विभागाला दिले होते. यावर नियोजन करीत जिल्हाधिकारी एम....

कंत्राटी कर्मचाऱ्या नी रक्त दान करून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.

Image
~  *राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्या ना शासनाच्या नियमित सेवेतील पदांवर बिनशर्त समायोजन करावे --- कंत्राटी कामगार  कंत्राटी कर्मचाऱ्या नी रक्त दान करून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.         राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत १५ वर्षांपासून विविध प्रकारची विविध स्तरावर संपूर्ण महाराष्ट्रात कंत्राटी पदे कार्यरत आहे.  काही वर्षांपासून शासन सेवेत नियमित पदावर नियुक्त्या व्हाव्या या मागणीसाठी गेल्या काही वर्षापासून अधिकृत संघटनेमार्फत विविध पातळीवर विविध प्रकारचे आंदोलन छेडले गेले आहे. त्याचेच यश म्हणून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांच्या समायोजनासाठी राज्य शासनामार्फत कॅबिनेट मंत्र्यांच्या अखत्यारीत त्रिस्तरीय सदस्य समिति गठित करण्यात आलेली होती. पण प्रत्यक्षात त्या समिति तर्फे आजतागायत फक्त बैठका घेऊन कंत्राटी कर्मचाऱ्या च्या पदरी निराशा  आली.  तसेच शासनाने असे आश्वासित केले की जो पर्यन्त तुमचे समायोजन होत नाही तोपर्यंत सरळ सेवे द्वारे कोणतीही नियमित भरती केली जाणार नाही परंतु शासनाने तो शब्द...

कोरोना कोविड-19 या वायरस ला देणार. आर्सेनिक अल्बमची गोळी टक्कर

Image
कोरोना कोविड-19 या वायरस ला देणार. आर्सेनिक अल्बमची गोळी टक्कर ??? **सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज** प्रतिनिधी. जिल्हा अमरावती. सुबोध यु मोहोड. मो.नं.9510136946... कोरोना कोविड-19 या व्हायरस चा वाढता प्रदुषणामुळे राज्यातील अणेक जिल्हे रेड-झोन मध्ये आल्यानंतर. कोरोना ची एकप्रकारे दहशत निर्माण झाली.त्यामुळे कोरोना ची दहशत .नष्ट करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात लाँकडाऊन. तसेच डॉक्टर. पोलीस. प्रशासन यांनी आपल्या जिवाची पर्वा न करीता.कोरोनासी रात्र दिवस संघर्ष केला.व करीत आहेत. तेव्हा या गोळीमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते जी मानसांना  कोरोना व्हायरस पासून वाचविण्यास मदत करते. या गोळ्या सामाजिक कार्यकर्ते योगेश सुभाष बण वंचित. बहुजन आघाडीचे पालघर जिल्हा आदिवासी समन्वय समिती प्रमुख संजय ढोके आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी आज दिनांक 28/5/2020 रोजी ठिक 5:00. वाजता  सर्वप्रथम पालघर जिल्ह्यात वाटप कल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.  Ārsēnika albamacyā

बायको आणि चिमुकल्या मुलाची हत्या*

Image
*बायको आणि चिमुकल्या मुलाची हत्या* नांदेड नायगाव प्रतिनिधी कानोले साईनाथ मो.9604500201 नांदेड मुखेड तालुक्यातील मंडलापूर येथे पतीने सासरवाडीला येऊन पत्नी व एक वर्षीय मुलाची गळ्यावर चाकूने वार करून क्रूर हत्या केल्याची घटना समोर आली , याबाबत सविस्तर वृत्त असे की तानाजी भुताळे वय अंदाजे 30 वर्षे हा येडुर ता, देगलूर जिल्हा, नांदेड येथील असून तो मंडलापूर येथे सासरवाडीला आला होता त्याच्या पत्नीस गावी येण्यासाठी तिच्याकडे तगादा लावला , तो दारूच्या नशेत मुखेड ते देगलूर रोडवर आसलेल्या मंडलापूर येथे शिवारात पत्नीच्या राहत्या घरी रागात येऊन पत्नी सह एक वर्षे मुलाचा गळ्यावर चाकूने वार करून क्रूर हत्या केली. आरोपी पळून जात असताना गावातील नागरिकांनी त्यास पकडून झाडास बांधून ठेवले. व पोलिसांना माहिती दिली,  तातडीने पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब मगर हे घटनास्थळी दाखल झालेले, सदर घटना कळताच आजूबाजूच्या गावातील गावकऱ्या मध्ये खळबळजनक गर्दी केली , मयत वैशाली तानाजी भुताळे वय अंदाजे 24 ते 25 दरम्यान मुलाचे वय 1 वर्षे  त्याचे नाव आदेश तानाजी भुताळे असे असून सदरील तपास चालू आहे स...

बायको आणि चिमुकल्या मुलाची हत्या करण्यात आली

Image
                                   ब्रेकिंग न्यूज  तालुका मुखेड घटनास्थळ *मंडलापुर* येथे आज सकाळी झालेली बायको आणि  चिमुकल्या मुलाची हत्या करण्यात आली आहे

घरकुल लाभार्थ्यांचा थकित हप्ता तात्काळ खात्यात जमा करण्यात यावे अंन्यथा रस्तावर ऊतरू..... गजानन पा चव्हाण*

Image
*घरकुल लाभार्थ्यांचा थकित हप्ता तात्काळ खात्यात जमा करण्यात यावे अंन्यथा रस्तावर ऊतरू.....                     गजानन पा चव्हाण*  --------------------------------------------------------------------  नांदेड नायगाव प्रतिनिधी : कानोले साईनाथ मो,9604500201 नायगाव शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर झालेल्या लाभार्थ्यांचा थकीत अर्धवट व पहिला हप्ता तात्काळ लाभधारकांच्या खात्यातत जमा करण्यात यावी अशी मागणी भाजपाच्या नगरसेविका सौ.पार्वतीबाई शंकराव चव्हाण,नगरसेवक देवेदास पा.बोमनाळे,नगरसेविका सौ.आशाताई कल्याण  गजानन शंकरराव  पाटील चव्हाण शेख तबस्सुम फातेमा आरिफ व इतर कार्यकर्त्यांनी नायगाव नगरपंचायत चे मुख्याधिकारी यांच्याकडे केली      एकीकडे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गोरगरिबांना हक्काची व पक्की घरे बांधून देण्यास कटिबद्ध असले तरी अलीकडील संबंधित अधिकाऱ्यांनी टाळाटाळ करून घरकुल लाभार्थ्यांनाकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे लाभार्थ्यांचे घरे पूर्ण:त्वाकडे जातच नाही ही वस्तुस्थिती लक्ष...

पावसाळा आला तरीही महावितरण... ला येते जाग

Image
*पावसाळा आला तरीही महावितरण.....* प्रतिनिधी-सोयगाव राहुल गायकवाड दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात महावितरण सेवा ठप्प होऊ नये या करता पूर्व नियोजन करने गरजेचं आहे. पावसाळा जवळ आला तरी सुद्धा अजूनही दुर्लक्ष केल्या जातं असल्या च निदर्शनास येत आहे. अनेक ठिकाणी डीपी बॉक्स चे झाकने तूटलेली असून केबल उघड्यावर पडलेल्या आहेत. यंदा लॉकडाऊन मुळे विनाअडथळा कामे करता आली असती परंतु महावितरण ने *"येरे माझ्या मागल्या"* या युक्ती प्रमाणे कामे अर्धवट ठेवल्यामुळे अपघाताचा धोका संभवतो. *करावी लागणारे काम* मान्सून पूर्व कामामध्ये महावितरण ने विद्युत खांबा लगत येणाऱ्या झाडांच्या फांदी कटाई करणे. रोहित्रा चे अर्थिंग तपासने. विजेच्या खांबासह काही ठिकाणी तारा बदलणे किंवा झोल काढणे. तारांचे मजबुती करने. जुन्या फिडर पिलर मध्ये इन्सुलेशन स्प्रे मारणे.फ्युज बदलणे *अजूनही हिच परिस्थिती* अनेक ठिकाणी डीपी चे बॉक्स तुटलेले असून केबल उघड्यावर आहेत या कडे दुर्लक्ष केल्यास मोठा धोका संभवू शकतो. या साठी वेळीच खबरदारी घेऊन महावितरण ने देखभाल दुरुस्तीचे काम वेळेत पुर्ण करावे अशी मागणी नागरिक...

युवा मल्हार सेना तालुका अध्यक्ष पदी शुभम भाऊ चोरमले*

Image
*युवा मल्हार सेना तालुका अध्यक्ष पदी शुभम भाऊ चोरमले* *जाफ्राबाद प्रतिनिधी-विठ्ठल वाघमारे* महाराष्ट्र राज्य युवा मल्हार संघटनेच्या जाफ्राबाद तालुका अध्यक्षपदी भारज बु.येथील शुभम भाऊ चोरमले यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे अध्यक्ष पदाच्या निवडीचे पत्र संस्थापक अध्यक्ष इंजि.विष्णू देवकाते ,जिल्हाध्यक्ष अशोक खरात,युवक जिल्हाध्यक्ष आकाश मंचरे याच्या हस्ते देण्यात आले जिल्हाध्यक्ष अशोक भाऊ खरात म्हणाले की महाराष्ट्र राज्यात युवा मल्हार सेना कार्यरत आहे संघटनेचे महाराष्ट्रात मोठे जाळे आहे जाफ्राबाद तालुका अध्यक्ष शुभम भाऊ चोरमले यांनी संघटना वाढवण्यासाठी युवकाचे संघटन करावे असे या नियुक्ती पत्रकात म्हंटले आहे या नियुक्ती बद्दल सर्व स्तरातून मोठे कौतुक होत आहे....

कोरोना शी लढा द्या जिल्हाधिकाऱ्याच्या वतीने नेम*

Image
आताची बातमी: *कोरोना शी लढा द्या जिल्हाधिकाऱ्याच्या वतीने नेम*  नांदेड नायगाव प्रतिनिधी कानोले साईनाथ मो.9604500201 सलूनसाठी घरूनच टॉवेल आणा! - जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश - सर्व दुकाने सुरू ठेवण्याचे विस्तारित आदेश - शासकीय कार्यालयात शंभर टक्के उपस्थिती बंधनकारक - जिल्ह्याबाहेर प्रवासी वाहतुकीला परवानगी नाही - कापड, चप्पल-बूट, ज्वेलर्स हाताळण्यावर मर्यादा - सोमवार ते रविवार याप्रमाणे आठवड्यातील सातही दिवस सकाळी ९ ते ५ दरम्यान मनाई केलेल्या आस्थापना व्यतिरिक्त सर्वांना दुकाने उघडण्यास मुभा. (त्यामुळे पूर्वी सुरू ठेवण्यास मुभा असलेली दुकानेदेख आता नवीन सुधारित वेळेत सुरू राहतील) * संचारबंदी: - दररोज सायंकाळी ७ ते सकाळी ७ (सूट दिलेले अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती वगळता) - व्यायामशाळा बंद, पण शारीरिक अंतर राखून व्यायामास परवानगी - प्रेक्षक व समूह यांना थांबण्यास मनाई - शीतपेयांची दुकाने, चहा टपरी, पानठेल्यांना हिरव कंदील ( - कापड व रेडिमेड दुकाने, चप्पल बूट, ज्वेलर्स सुरू करण्यास परवानगी; पण दुकानातील मालक व  कामगार वगळता एकापेक्षा अधिक ग्राहकांना साहि...

कोरोणा पादुर्भाव रोखण्यासाठी अंबड व्यापारी महासंघाकडुन मोठी घोषणा

Image
कोरोणा पादुर्भाव रोखण्यासाठी अंबड व्यापारी महासंघाकडुन मोठी घोषणा                                सुपरफास्ट महाराष्ट्रन्युज अंबड प्रतिनिधी गणेश पाटोळे                कोरोणाचा पादुर्भाव रोखण्यासाठी अंबड तालुक्यातील व्यापारी महासंघाकडुन बाजार पेठ बंदची घोषणा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष चंद्रप्रकाश सोडाणी यांनी बैठकीत एका निवेदना द्वारी केली ते यावेळी म्हणाले की कोरोणा हा एक भयंकर आजार असून शासनाने सांगितल्या प्रमाणे आपन पालन करायला पाहिजे असे ही ते ह्या वेळी म्हणाले व सर्वाशी विचार विनमय करून दि, 25,26,27असे तिन दिवस बंदची लेखी सूचना सुध्दा तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, व नगरपालिका यानां लेखी स्वरूपात कळविल्याचे यावेळी त्यांनी सांगितले या बैठकीस व्यापारी महासंघाचे अध्यक्ष, सचिव, व सर्व सदस्य मंडळी उपस्थित होते

पालघर :-डहाणू तालुक्यातील वाणगाव येथे गरजू गोरगरीब कुटुंबाना दिला मदतीचा हात ??

Image
पालघर :-डहाणू तालुक्यातील वाणगाव येथे गरजू  गोरगरीब  कुटुंबाना दिला  मदतीचा हात ??  संजय ढोके                                            *सुपर फास्ट महाराष्ट्र न्युज* प्रतिनिधी अमरावती. सुबोध  मोहोड 9510136946. पालघर:-संपूर्ण देशात कोरोना कोविड 19 चा वाढता प्रदुरर्भाव पाहून दि.22/ मार्च  पासून संपूर्ण देश हा लाँकडाऊन झाला असता   या देशातील. हातावर पोट भरणाऱ्या लोकांवर. कोरोना ने नव्हे तर उपासमारीनेच मरण्याची वेळ आलेली आहे. अशी परिस्थिती निर्माण असतांना. महाराष्ट्र राज्यातील. व प्रत्येक जिल्ह्यातील. आमदार व खासदार.यांचे खऱ्या अर्थाने हातावर पोट भरणाऱ्या मजुरांकडे .लक्ष असायला पाहिजे होते.परंतु असे न होता. उलट प्रत्येक जिल्यातील आमदार व खासदारच कोरोनटाईन झाल्याचे चिन्हे ?? दिसुन आले.तेव्हा हातावर पोट भरणाऱ्या मजुरांनी आपली आप-बिती कोणाला सांगावी.हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला.अशा परिस्थितीत वंचित बहुजन आघाडी चे आदिवासी सम...

नांदेड मध्ये उमरी तालुक्यातील नागठणा येथील शिवाचार्य महाराज यांचा अज्ञात वेयक्तीने केला खून एकाच रात्री वेगवेगळ्या ठिकाणी दोन हत्या*

Image
*नांदेड मध्ये उमरी तालुक्यातील नागठणा  येथील शिवाचार्य महाराज यांचा अज्ञात वेयक्तीने केला खून एकाच रात्री वेगवेगळ्या ठिकाणी दोन हत्या* नांदेड नायगाव प्रतिनिधी कानोले साईनाथ मो,9604500201 नांदेड उमरी तालुक्यातील नागठणा  येथे काळीमा फासणारी घटना ,एकाच रात्री वेगवेगळ्या ठिकाणी खून उमरी नागठणा  बु येथील बाल तपस्वी निवार्य रुद्र पशुपतीनाथ महाराजांचा रात्री  एक ते दोन सुमारास खून झाला असून या घटनेने भाविकांच्या मानत खळबळ उडाली आहे गावातील एका माथेफिरू तरुणाने  महाराजांच्याच मठात सिरून त्यांच्याजवळ रखम व सोने लुटला  त्यानंतर गळा दाबून महाराजांची हत्या केली. महाराजांच्या गाडीमध्ये पळून जाण्याचा प्रेतन केला शेजारच्या लोकान मध्ये जाग झाली  म्हणून या आरोपीने पळ काढला. ही घटना शेनीवरी मध्यरात्री नंतर घडली लगेच महाराजांचे प्रेत उमरी च्या ग्रामीण रुग्णालयात  नेण्यात आले असून याठिकाणी गाव कऱ्यांचे  म्हणे असे आहे की त्या आरोपीला कठोर ची शिक्षक झाली पाहिजे, त्या ग्रामीण भागात भाविकांच्या मानत  भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे  या घटनेने न...

खाजगी हॉस्पीटल्सनी नफ्यातोट्याची गणिते बाजूला ठेवावीत / विनातक्रार सहभागी व्हावेच लागेल नाहीतर कारवाई क्रमप्राप्त

Image
#खाजगी हॉस्पीटल्सनी नफ्यातोट्याची गणिते बाजूला ठेवावीत / विनातक्रार सहभागी व्हावेच लागेल नाहीतर कारवाई क्रमप्राप्त आरोग्यमंत्री राजेशटोपे यांच्याशी अतुलकुलकर्णी यांची विशेष बातचित अतुल कुलकर्णी / #मुंबई  : नव्या आदेशानुसार ८०% बेड ठेवावेच लागतील. उपचारांच्या खर्चासह खाजगी हॉस्पिटल मधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तुटीची भरपाई सरकारने देण्याचा प्रश्नच येत नाही, कोरोना रुग्णांच्या उपचाराचा भार सरकारी रुग्णालयांवर आहे. अनेक खासगी रुग्णालये एकीकडे वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता सांगतात आणि दुसरीकडे आमच्या लोकांनी कामे केली तर त्यांच्या वेतनातील तुटीची भरपाई मागतात हा विरोधाभास आहे. अत्यावश्यक सेवा नियंत्रण कायद्यानुसार उपलब्ध खाटांसाठी लागणारा कर्मचारी वर्ग रुग्णालयांनी पुरविणे बंधनकारक आहे. त्यांना माफक दरात ८० टक्के बेड कोविड आणि नॉन कोविड रुग्णांसाठी द्यावेच लागतील, असे स्पष्ट मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले. खाजगी हॉस्पिटल वर नियंत्रण आणण्याचा निर्णय मनमानीपणा आहे असा आरोप असोसिएशन ऑफ हॉस्पिटल या संघटनेने केला आहे त्यावर विचारले असता टोपे म्हणाले, प्रत...

शेतकऱ्यांचा संपुर्ण कापूस लवकरात लवकर खरेदी करावा*. *वसंत सुगावे पाटील*

Image
*शेतकऱ्यांचा संपुर्ण कापूस लवकरात लवकर खरेदी करावा*.               *वसंत सुगावे पाटील* नांदेड नायगाव प्रतिनिधी कानोले साईनाथ मो.9604500201 नांदेड: नांदेड जिल्ह्यात सी.सी.आय.मार्फत कापूस खरेदी चालू आहे.पण ही खरेदी अत्यंत संथ गतीने चालू आहे ही खरेदी जलदगतीने करून शेतकर्यानचा संपुर्ण कापूस खरेदी करावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी निवेदनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी डाॅ. खल्लाळ यांच्याकडे केली.       देशात कोरोणा या महामारिचे संकट असल्यामूळे कापूस खरेदी उशिरा चालू झाली आहे. सी.सी.आय.मार्फत खरेदी करताना या ठिकानी खरेदिदार मनमानी करत कासवगतीने कापूस खरेदी करत आहेत.त्यामुळे 60% शेतकर्यान्कडे कापूस घरातच आहे.यामध्ये पहिल्या वेचनीचा कापूस तेवढा सी.सी.आय. खरेदी करत आहे दुसर्या व तिसर्या वेचनीचा कापूस सी.सी.आय.खरेदी करत नाहीत.त्यामूळे शेतकरी दुसर्या व तिसर्या वेचनीचा कापूस खाजगी व्यापार्यांकडे अत्यल्प भावात देत आहेत.भाव कमी असल्यामुळे शेतकरी खाजगी व्यापार्यांना आपला कापुस देण्यास इछूक नाही...

अगरबत्ती आणि लाखेपासून बांगड्या बनविण्याचे नियोजन, जिल्ह्यातील महिलांकरीता बांबूपासून रोजगार उपलब्ध करून देणार - पालकमंत्री संजय राठोड.*

Image
*अगरबत्ती आणि लाखेपासून बांगड्या बनविण्याचे नियोजन, जिल्ह्यातील महिलांकरीता बांबूपासून रोजगार उपलब्ध करून देणार - पालकमंत्री संजय राठोड.* प्रतिनिधी शिवप्रसाद रामप्रसाद येळकर सौजन्य : जीमाका यवतमाळ यवतमाळ, दि. 23 : पुजा करतांना देवासमोर लावण्यात येणारी अगरबत्ती निर्मिती हा घरबसल्या व्यवसाय महिलांसाठी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. सोबतच लाखेपासून बांगड्या निर्मितीच्या व्यवसायाबाबतही विचार सुरू आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील 500 महिलांना रोजगार उपलब्ध होईल, असे प्रतिपादन राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. विश्रामगृह येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या अधिका-यांसोबत बांबूपासून रोजगारनिर्मितीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहूल पाटील, वनमंत्र्यांचे खाजगी सचिव रवींद्र पवार, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक डॉ. रंजन वानखेडे आदी उपस्थित होते. बांबूपासून अनेक वस्तुंची निर्मिती करणे शक्य आहे, असे सांगून पा...

जिल्ह्यातील १६ कापुस खरेदी केंद्रांवर ग्रेडर नियुक्तीचे आदेश निर्गमित - जिल्हाधिकारी राहुल रेखावार*

Image
*जिल्ह्यातील १६ कापुस खरेदी केंद्रांवर ग्रेडर  नियुक्तीचे आदेश निर्गमित - जिल्हाधिकारी राहुल रेखावार* प्रतिनिधी शिवप्रसाद रामप्रसाद येळकर सौजन्य : जिमाका बीड बीड, दि. २३ :- जिल्ह्यातील एकुण  १६ कापुस खरेदी केंद्रांवर  प्रशिक्षित कर्मचारी अधिकारी यांची पुढील आदेशापर्यत ग्रेडर म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी विभागीय व्यवस्थापक,महाराष्ट्र राज्य सहकारी कापुस उत्पादक पणन महासंघ मर्या.विभागीय कार्यालय, परळी वै.जि.बीड यांचे नियंत्रणात व सुचनेनुसार ग्रेडींगचे कामकाज दि.२६ मे २०२० पासुन करावे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. बीड जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापुस उत्पादक पणन महासंघ मर्या. मुंबई यांचे मार्फत शासकिय हमी भावाने कापुस खरेदी सुरु असुन ग्रेडरची संख्या कमी असल्यामुळे प्राथमिक नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कापुस खरेदी करण्यात विलंब लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कापुस खरेदी केंद्रावर ग्रेडर म्हणुन कृषि विभागाचे कृषि पदवीधर कर्मचारी, अधिकारी यांना कापुस ग्रेडींगचे प्रशिक्षण देऊन हे कर्मचारी, अधिकारी कापुस खरेदी केंद्रावर ग्रेडर ...

लोकडाऊन मध्ये चिमुकल्याची शाळा घरी

Image
लोकडाऊन मध्ये चिमुकल्याची शाळा घरी , छाया चित्र काढताना कु  . मनवीत रवींद्र बोरकर , वड्णेर                                                         *छायाचित्र संकलन :- राहुल दुरतकर , जिल्हा प्रतिनिधी वर्धा*

चिकमोह गावात येथे कोरोना दक्षता समिती स्थापन करण्याची युवकांनी केली मागणी .*

Image
*चिकमोह गावात येथे कोरोना दक्षता समिती स्थापन करण्याची युवकांनी केली मागणी .*                                 *राहुल दुरतकर , जिल्हा प्रतिनिधी वर्धा*                             हिंगणघाट :- सध्या देशात कोरोना   माहामारी चे संकट असतांना शासनानी प्रत्येक गावामधे कोरोना माहामारी नियंत्रणात आणण्यासाठी ग्राम पंचायत  स्थरावर ग्राम कोरोना दक्षता समितीचे गठन करण्याबाबत आदेश जाहीर करण्यात आले होते . त्याप्रमाणे तालुक्यातील प्रत्येक ग्राम पंचायतने कोरोना दक्षता समिती स्थापन केली . पण चिकमोह या गावात ग्राम पंचायत यांनी आजून पर्यंत कोरोना दक्षता समिती स्थापन केली नाही. या माहामारी च्या काळात ग्राम पंचायत बाहेरून आलेल्या कोणत्याही व्यक्तीची नोंद ठेवत नसल्यामुळे गावात बाहेरून आलेल्या व्यक्ती ला कुठून आले असे युवकांनी आणि स्थानीय पत्रकार यांनी विचारले असता .ग्राम पंचायत उपसरपंच यांनी हे तुमचे काम नसून हे ग्राम पंचायत चे...

अर्सेनिक अल्बम 30 हे औषध त्यावर छापील किमतीनुसारच विक्री करणे बंधनकारक*

Image
*अर्सेनिक अल्बम 30 हे औषध त्यावर छापील किमतीनुसारच विक्री करणे बंधनकारक* प्रतिनिधी शिवप्रसाद येळकर सौजन्य: जिमाका बीड, दि. 22 :- कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे जगभरात मोठया प्रमाणावर मनुष्य हानी झालेली असुन लोक बाधीत झालेले आहेत. अर्सेनिक अल्बम 30 या होमीओपॅथिक औषधामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते अर्सेनिक अल्बम 30  या औषधांचा खप मोठया प्रमाणात वाढलेला आहे. याचा गैरफायदा काही मेडीकल स्टोअर्समधुन ही औषधे अवास्तव किंमत आकारून विकली जात आहे. मेडीकल स्टोअर्स चालक आणि काही होमिओपॅथी डॉक्टर घेत आहेत. ही कृती निश्चितच निदनीय आणि अशोभनीय आहे. अर्सेनिक अल्बम 30 हे औषध त्यावर छापील किमतीनुसारच विक्री करणे बंधनकारक आहे. उपरोक्त परिस्थिती पाहता सर्व मेडीकल स्टोअर्स आणि होमिओपॅथीची प्रक्टिस करणारे डॉक्टरर्स   यांनी छापील किमतीपेक्षा जास्त दर आकारु नये असे सूचित करण्यात आले आहे जे मेडीकल स्टोअर्स चालक व होमिओपॅथी डॉक्टर्स ज्यादा दर आकारणी करतील त्यांचेवर भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि भारतीय दंडविधान संहिता 1860 व औषधे व सौदर्य प्रसाधने का...

हर्षवर्धन जाधव यांची अचानकच राजकारणातून निवृत्ती

Image
हर्षवर्धन जाधव यांची अचानकच राजकारणातून निवृत्ती  प्रतिनिधी Dr अमोल जाधव 7218869700 औरंगाबाद मधील कन्नडचे माझी आमदार व मराठा समाजाचे बहुचर्चित नेते म्हणून हर्षवर्धन जाधव यांची ख्याती आहे. परंतु त्यांनी आज दुपारी दोन वाजता अचानक एक व्हिडिओ प्रसारित करून मी राजकारणातून कायमची निवृत्ती घेत आहे. मी माझे छंद जोपासतो आपण उगाच भरकटत जात असतो. अशा प्रकारचा व्हिडीओ  तयार करून आपल्या पेज ला टाकला आहेत. या व्हिडिओ तें म्हणले  आहे की, माझे उत्तराधिकारी म्हणून माझी पत्नी संजना जाधव असेल.  माझे वडील कै. रायभान  जाधव व तिचे वडील रावसाहेब दानवे यांच्या आशीर्वाद तीला  असतील व त्यांतून  समोर त्या प्रगती साधेल व तिला कधीही काही मदत लागल्यास  फोन करा तुम्हाला अवश्य मदत करेल असं तें बोलले.  हर्षवर्धन जाधव यांच्या व्हिडिओ मुळे अनेकांना धक्का बसला आहे कारण त्यांनी औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढून चांगल्या प्रकारचे मत घेतले होते,  परंतु कन्नड विधानसभा लढून त्यांना अपयश आले होते या अपयशातून हा  निर्णय घेतला की,  घरी चालू असलेल्या वादातून असा नि...

तळणी पुर्णा येथील.जि.प.शाळेचे लाँक तोडून एल ई डी. T V.लंपास. पोलीस स्टेशन आसेगावपुर्णा येथे गुन्हा दाखल ??

Image
तळणी पुर्णा येथील.जि.प.शाळेचे लाँक तोडून एल ई डी. T V.लंपास. पोलीस स्टेशन आसेगावपुर्णा येथे गुन्हा दाखल  ?? **सुपर फास्ट महाराष्ट्र न्युज ** प्रतिनिधी अमरावती सुबोध यु मोहोड.9510136946 आसेगाव पोलीस स्टेशन अर्तगत येत असलेल्या तळणी पुर्णा येथे जिल्हा परीषद पुर्व मराठी शाळेमध्ये दि.18/5/2020 च्या मध्यरात्री अज्ञात इसमाने शासकीय शाळेचे लाँक तोडून. एल ई डी.TV चोरून लंपास केली.परंतु त्या.एक ते दोन दिवसाआधी.वादळी पाऊस पडल्याने अनेकांची घरे दारे जमीन दस्त झाली. त्यामध्ये जि.प.शाळेच्या खिडक्या सुंध्दा उघडया झाल्या.दिनांक19/5/2020 रोजी. गावातील ग्रामपंचायत चे मेंबर तथा काही कार्यकर्ते यांनी शाळेचे काही नुकसान आहे का. असी प्रत्यक्ष पहानी केली असता.शाळेच्या मोठ्या हाँल मधून. एल ई डी TV चोरी गेल्याचे लगेच लक्षात आले.तेव्हा त्यांनी ताबडतोब.शाळेचे मुख्याध्यापक.सुभाष घाटोळे.रा.अमरावती.यांना आपल्या दुरध्वनी वरुण संपर्क करून शाळेतील TV दाराचे लाँक तोडून चोरी गेल्याचे सांगितले. तेव्हा शाळेचे मुख्याध्यापक सुभाष घाटोळे.यांनी प्रत्यक्ष जाऊन पहानी केली तेव्हा त्या ठिकाणी गावातील काही कार्यकर्त...

महाआघाडी सरकार विरुद्ध भाजपाचे काळया फिती लावून निषेध आंदोलन

Image
पारोळा महाआघाडी सरकार विरुद्ध भाजपाचे काळया फिती लावून निषेध आंदोलन  पारोळा तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाआघाडी सरकार विरुद्ध काळया फिती लावून तालुकाभरात प्रत्येक बुथवर आंदोलन करण्यात आले ." महाआघाडी सरकार जागे व्हा भोंगळ कारभार बंद करा महाराष्ट्र वाचवा महाराष्ट्र वाचवा " या घोषणा देण्यात आल्या .सदर आंदोलनात *जळगाव मतदारसंघातील मा.खासदार ऐ टी नाना पाटील ,माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा तालुका अध्यक्ष अँड अतुल मोरे शहर अध्यक्ष मुंकुंदा चौधरी तसेच  रविंद्र पाटील धिरज महाजन नरेंद्र साळी सचिन गुजराथी उपस्थित होते .
Follow 

मौजे पराडा येथे काळे मास्क बांधुन भाजपा कार्यकर्त्या कडुन महा विकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध

Image
मौजे पराडा येथे काळे मास्क बांधुन भाजपा कार्यकर्त्या कडुन महा विकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध                                सुपरफास्ट महाराष्ट्रन्युज तालुका प्रतिनिधी गणेश पाटोळे अंबड      अंबड तालुक्यातील मौजे पराडा येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांडुन महा विकास आघाडी सरकारचा काळे मास्क बांधुन निषेध करण्यात आला महा विकास आघाडी सरकार महाराष्ट्रा मध्ये कोरोनाचे संकट रोखण्यासाठी पुर्णपणे अपयशी आसल्याचे टिका सुध्दा या वेळी भाजपा कार्य कर्त्या कडून व्यक्त केली गेली या वेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस भाऊसाहेब पाटील आरसुळ , भाजपा तालुका ऊपअध्यक्ष विकास रणदिवे, भाजपा बुथप्रमुक पांडुरंग नाटकर,भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते योगेश गिराम, चञभुज माळोदे, शेख शारेक भाई उपस्थित होते

नांदेड लोहरगल्लीतील वृद्धाचा मुत्यू पत्नीची मुत्यूशी झुंज*

Image
*नांदेड लोहरगल्लीतील वृद्धाचा मुत्यू पत्नीची मुत्यूशी झुंज* नांदेड नायगाव प्रतिनिधी कानोले साईनाथ मो. 9604500201 नांदेड शहरातील लोहरगल्ली भागातील एक वृद्धा दाम्पत्य गेल्या अनेक कालावधी पासून आजारी होते , त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता तसेच ताप व खोकला देखिल वाढत होता, उपचारासाठी शहरातील एक खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल केले परंतु बुधवारी सायंकाळी च्या सुमारास त्या दोघांची प्रकृती बिघडल्याने त्यांना डॉ, शंकरराव चव्हाण शासकीय वैधकीय महाविद्यालयात तातडीने हलविण्यात आले त्या  वृद्ध वेक्ती मध्ये लक्षणे असल्याने बुधवारी रात्री दोघांचाही  टेस्ट अहवाल यण्यापूर्वीच 74 वर्षीय वृद्धा पतीचे गुरुवारी सकाळी निधन झाले त्यांच्या पत्नीची प्रकृती गंभीर असून ती रुग्णालयात मूर्त्युशी झुंजत आहे हे दाम्पत्य कोरोना बाधित कसे झाले , यांची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही   सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज नांदेड नायगाव

*ब्रेकिंग-कोरोना बाधीत आढळलेल्या रिक्षाचालकाची पत्नी, मुलगा आणि मुलीलाही कोरोनाची लागण*

Image
*ब्रेकिंग-कोरोना बाधीत आढळलेल्या रिक्षाचालकाची पत्नी, मुलगा आणि मुलीलाही कोरोनाची लागण* *राशीन मध्ये मुलीकडे थांबलेल्या मूळच्या मुंबईकर महिलेलाही कोरोना* *आता जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 72 झाली* कर्जत प्रतिनिधी दत्तात्रय शिपकुले 7020185299, - जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या १७ पैकी १३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर काल  नगर शहरातील जुना मंगळवार बाजार येथील कोरोना बाधीत आढळलेल्या रिक्षाचालकाच्या पत्नी, मुलगा आणि मुलीचा अहवाल पॉझिटिव आला आहे. याशिवाय कर्जत तालुक्यातील तालुक्यातील राशीन येथे मुलीकडे आलेल्या मूळच्या मुंबईकर असलेल्या 75 वर्षीय महिलेचा अहवालही पॉझिटिव आला आहे. यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७२ झाली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. आज सायंकाळी हे सर्व अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये नगर शहरातील रिक्षा चालकाच्या कुटुंबातीलच तिघेजण बाधित आढळून आले. मूळच्या मुंबईकर येथील 75 वर्षीय वृद्ध महिला राशीन येथे मुलीकडे आल्या होत्या. त्यांना त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात उपच...

साध्या पद्धतीने पार पडला विवाह सोहळा

Image
साध्या पद्धतीने पार पडला विवाह सोहळा  तालुका प्रतिनिधी  निकेश जीवतोडे  समुद्रपूर खापरी(कोरा):ग्रामपंचायत खापरी येते आज श्री.श्रीरंग कवडू चौधरी यांची मुलगी प्रतिभा श्रीरंग चौधरी हिचा विवाह यवतमाळ जिल्ह्यातील कु.प्रशांत नामदेव गुरुनुरे रा.पाहपड ता.मारेगाव जिल्हा यवतमाळ यांच्या सोबत साध्या पद्धतीने आणि परिवारातील सदस्यांच्या उपस्थित तसेच गावचे सरपंच देविदास दोडके व पोलीस पाटील अनिकेत जीवतोडे आणि तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सोसलं डिस्टन्स ला महत्व देत हा विवाह सोहळा पार पाडला.

छगन चौगुलेंच्या निधनाने, लोककलेची मोठी हानी-वंचित बहूजन आघाडीचे नेते. मा बाळासाहेब आंबेडकर यांचे उद्ग्गार

Image
छगन चौगुलेंच्या निधनाने, लोककलेची मोठी हानी-वंचित बहूजन आघाडीचे नेते. मा बाळासाहेब आंबेडकर यांचे उद्ग्गार  ** सुपर फास्ट महाराष्ट्र न्युज ** प्रतिनिधीअमरावती. सुबोध यु मोहोड 9510136946. अमरावती दीनांक 21/5/20 :अत्यंत दुःखद बातमी. महाराष्ट्रातील एक प्रभावशाली.प्रतिभावंत .लोक कलावंत, सर्व लोककला संस्कृतीची जाण असलेले. उमदे व्यक्तिमत्व छगन चौगुले यांच्या निधनाने आपण एका मोठ्या कलावंताला मुकलो आहोत. अश्या शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकरानी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.          विद्यापीठात असताना त्यांनी त्यांच्या विभागात अविस्वरणीय योगदान दिले व विभागाला एक उंची देण्यास मोलाचे योगदान दिले. प्रशिक्षक म्हणून ते खूप विद्यार्थीप्रिय होते.अत्यंत प्रांजळ व सुस्वभावी छगन चौगुले यांच्या जाण्याने विद्यापीठाची व महाराष्ट्राच्या लोककलेची खूप मोठी हानी झाल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. आतापर्यंत त्यांनी अनेक गाणी गायली आहेत. मात्र त्यांना 'नवरी नटली' या गाण्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेले होते. आज सकाळी सेव्हन हिल्स रुग्णालयात. कोरोनामुळे ...

पी डी फाऊंडेशनचा* *राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) यांच्याकडून सत्कार*

Image
*पी डी फाऊंडेशनचा* *राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) यांच्याकडून सत्कार*  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक हिंदुत्ववादी सामाजिक आणि कौटुंबिक संघटना आहे. सामाजिक व सांस्कृतिक संस्था या स्वरूपात ही संघटना काम करीत आहे. इ.स. 1990 च्या दशकापर्यंत या संस्थेने राष्ट्रभक्ती व संस्कृती च्या प्रसार व संवर्धनासाठी अनेक शाळा आणि समाजोपयोगी निस्वार्थ सेवाभावी कार्य स्थापन केले आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळातील मदतकार्यासाठी आणि पुनर्वसनातील भूमिकेसाठी या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक अत्यंत समर्पित होऊन मदत करत असतात.. असेच काम या जगावर आलेल्या कोरोना संकटात स्वतचा जीव धोक्यात घेऊन गेली 60 दिवस न थांबता ,न घाबरता , रोज 300 ते 400 लोकाना जेवन देण्याचे काम  पी डी फाऊंडेशन संस्थेने केले आहे याबद्दल *राष्ट्रीय स्वयंसेवक संघ* यांच्याकडून  *पी डी फाऊंडेशनचे* *संस्थापक अध्यक्ष औदुंबर कळसाईत* यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी डॉ. गिरीश आफळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पिंपरी-चिंचवड जिल्हा संचालक. व पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारणी सदस्य *हेमंत हरेर व शार्दूल पेंडा...

त्या महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह*,👍 [ अफवांना बळी पडू नका ]

Image
*त्या महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह*,👍 [ अफ वांना बळी पडू नका ]  : पुसद येथील मृत महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. य संजीवनी धुलधुले असे या महिलेचे नाव असून त्यांचे नमुने तपासणीकरीता पाठविण्यात आले होते. त्यांचा रिपोर्ट आताच प्राप्त झाला असून तो निगेटिव्ह असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे.     या बाबत पुसद सह जिल्ह्यात अफवांचे पेव फुटले होते. अफवांना बळी पडू नका, अफवा पसरवू नका. सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज राळेगाव तालुका प्रतिनिधी वृषभ दरोडे 9011356141

लोकसहभागातून जलसंधारणाची कामे, आकोली झाली टंचाईमुक्त*

Image
*लोकसहभागातून जलसंधारणाची कामे, आकोली झाली टंचाईमुक्त* (महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाने घडविली आकोली गावात जलक्रांती)  जानेवारीपासूनच पाण्यासाठी अधिग्रहण केलेल्या बोअरवेलची मदत घेणाऱ्या उमरखेड तालुक्यातील आकोली गावात महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (एमव्हीएसटीएफ) च्यामाध्यामातून 2017 पासून लोकसहभागातून करण्यात आलेल्या विविध प्रकारच्या जलसंधारणाच्या कामांमुळे परिस्थिती बदलली असून, हे गाव आता टंचाईमुक्त झाले आहे. 2017 ते 2020 या तीन वर्षात झालेल्या कामांमुळे पडणारा पाऊस शिवारात थांबू लागला आणि भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे यावर्षी मे महिन्यातही गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत मुबलक पाणी असल्याने पाणी पुरवठा सुरळीत राहून बोअरवेल अधिग्रहणाची गरज पडली नाही. काही वर्षांपूर्वी शिवारात पडणारे पावसाचे पाणी ओढ्या नाल्या द्वारे वाहून जात असे. जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी आणि उपसा अधिक यामुळे गावात पाणीटंचाईच्या समस्येने अधिक उग्र रूप धारण केले होते, ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत जल...

जिल्ह्यात आता खतांसाठी तीन रॅक पॉईंट होणार  राज्यस्तरीय खरीप आढावा बैठकीत पालकमंत्र्यांची मागणी मान्य*

Image
*जिल्ह्यात आता खतांसाठी तीन रॅक पॉईंट होणार  राज्यस्तरीय खरीप आढावा बैठकीत पालकमंत्र्यांची मागणी मान्य*  यवतमाळ, दि.21 : खरीप हंगामासाठी जिल्ह्यात खतांची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. सद्यस्थितीत खतांचा रॅक पॉईंट हा अमरावती जिल्ह्यातील धामणगाव (रेल्वे) येथे आहे. मात्र या ठिकाणवरून संपूर्ण जिल्ह्यात खत पोहचविणे अडचणीचे जाते. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील इतर तालुक्यांना खतांचा पुरवठा करण्यासाठी चंद्रपूर आणि नांदेड येथे खतांचा रॅक पॉईंट द्यावा, अशी मागणी पालकमंत्री संजय राठोड यांनी राज्यस्तरीय खरीप आढावा बैठकीत मांडली. ही मागणी मान्य करण्यात आल्याने जिल्ह्यात आता खतांसाठी तीन रॅक पॉईंट होणार आहे.  भौगोलिकदृष्ट्या यवतमाळ जिल्हा हा मोठ्या प्रमाणात विस्तारलेला आहे. जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषी क्षेत्रावर अवलंबून असून खरीप हंगामाला लगेच सुरूवात होणार आहे. संपूर्ण जिल्ह्यात खतांचा पुरवठा हा अमरावती जिल्ह्यातील धामणगाव (रेल्वे) येथील रॅक पॉईंटवरून करावा लागतो. धामणगाव येथून वणी व उमरखेडचे अंतर हे दीडशे किमीच्या वर आहे. वणी हा तालुका चंद्रपूर जिल्ह्याला तर उमरखेड...

हिंगणघाट तालुक्यातील चिकमोह येथे

Image
* हिंगणघाट तालुक्यातील चिकमोह येथे                                               हिंगणघाट  :-   चिकमोह येथे आज दुपारी 12 च्या दरम्यात चिकमोह येथे यवतमाळ जिल्ह्यातील जावई चिकमोह येथे आले व त्याची महिती कोणाला नव्हती आणि जेव्हा ते गावाकडे जायला लिघाले त्यावेळी ही माहिती मिळाली  आशावर्कर, सरपंच,अंगणवाडी सेविका यांनी त्यांना व पूर्ण परिवाराला कोरोन्टीन करून घर सील करण्यात आले आहे . परंतु कोणतेही दंड आकारण्यात आलेले नाही त्यांना फक्त कोरोन्टीन करण्यात आले.                    *संदिप सुपटकर  , तालुका प्रतिनिधी  हिंगणघाट/  वर्धा* 9890917742

शेवटी जिल्या अंतर्गत बस सेवा सुरू लाल परी मारणार दिवसाला 12 फेऱ्या*

Image
*शेवटी जिल्या अंतर्गत बस सेवा सुरू लाल परी मारणार दिवसाला 12 फेऱ्या*   *बीड जिल्ह्यात लालपरी पुन्हा रस्त्यावर धावणार* बीड प्रतिनिधी दराडे सिद्धेश्वर बीड- राज्य शासनाच्या सुचेनाप्रमाणे बीड जिल्हा नॉन रेड झोनमध्ये येत असल्याने उद्यापासून (दि.२२) जिल्हांतर्गत बस सेवा सुरु करण्यात येणार आहे. यासाठी परिवहन महामंडळाकडून प्रवाशांची योग्य ती खबरदारी घेण्यात येणार असून यासाठी काही नियमावली असणार आहे.विभाग नियंत्रक कालिदास लांडगे  यांनी हि माहिती दिली.                         लॉकडाऊनमध्ये उद्यापासून नॉन रेड झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सुविधा देण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती.त्यानुसार बीड जिल्ह्यात लालपरी पुन्हा रस्त्यावर धावणार असून जिल्ह्यात बसच्या प्रत्येकी १२ फेऱ्या होतील.यामध्ये बीड ते परळी,बीड ते अंबाजोगाई,बीड ते माजलगाव,बीड ते धारूर,बीड ते गेवराई,बीड ते पाटोदा,बीड ते आष्टी,बीड ते अंबाजोगाई,परळी ते अंबाजोगाई,धारूर ते अंबाजोगाई,केज ते माजलगाव,माजलगाव ते गेव...

*बीड जिल्ह्यात कोरोनाचा कहर कवडगाव थंडी (ता. माजलगाव ) येथील रुग्णांच्या संपर्कातील १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

Image
**बीड जिल्ह्यात कोरोनाचा कहर कवडगाव थंडी (ता. माजलगाव ) येथील रुग्णांच्या संपर्कातील १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह*  * जिल्ह्यातील रुग्णाचा आकडा वाढला बीड प्रतिनिधी  *दराडे सिद्धेश्वर* बीड जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा मोठ्याप्रमाणावर वाढला असून कवडगाव थंडी (ता. माजलगाव ) येथील रुग्णांच्या संपर्कातील १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात उपचार सुरु  असलेल्या रुग्णांची संख्या आता २९ झाली आहे. यात सुर्डी १, नित्रुड ११ तर कुंडी १ असे रुग्ण असून त्यामुळे आता धारूर तालुक्यातही कोरोनाने प्रवेश केला आहे.  तर बीडहून गुरुवारी पाठवलेल्या ३२ नमुन्यांचा अहवाल अद्याप यायचा आहे. माजलगाव तालुक्यातील कवडगाव थंडी येथे मुंबईहून आलेल्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. सदर कुटुंब शेतात राहायला गेल्याचे सांगितले गेले, मात्र त्यापूर्वी या कुटुंबाच्या संपर्कात अबनेकजण आले होते. त्यांचे स्वाब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.त्यातील १३ अहवाल आज पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात अगोदरच १६ रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरु होते, त्यात आता या १३ ची भर पडली आहे. त्यामु...

राणेंच्या वक्तव्याचा जाहीर निषेध..! आम्ही तृतीयपंथी समूहाच्या बाजूने आहोत-प्रकाश आंबेडनिलेशकर*

Image
* राणेंच्या वक्तव्याचा जाहीर निषेध..! आम्ही तृतीयपंथी समूहाच्या बाजूने आहोत-प्रकाश आंबेडनिलेशकर* *प्रतिनिधी उल्हासनगर*      *संदेश कांबळे* सध्या देश कोरोनासारख्या महामारीत जगत आहे. सरकार राज्यातील संकट कश्या प्रकारे लवकर नष्ट होईल याचा प्रयत्न करत आहे. पण राजकारण काही थांबत नाही हा नेता त्या नेत्यावर आरोप पत्यारोप करणे काही सोडत नाही अश्याच निलेश राणे यांनी एकदा टीका करतांना हिजडे या भाषेत उत्तर दिले होते. याचा निषेध वंचित बहूजन आघाडी चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे तसेच निलेश राणे यांनी माफी मागावी असेही त्यांची म्हटले आहे काय म्हणाले प्रकाश आंबेडकर..? “गुंडगिरी प्रवृत्तीचे लोकं जेव्हा राजकारणात येतात तेव्हा त्यांना सामाजिक भान राहत नाही. कोणालाही शारिरिक व्यंगावरून हिनवण्याचा अधिकार नाहीये. तृतीयपंथीदेखील माणूस आहेत,त्यांना स्वीकारले पाहिजे. हे भान राजकारण्यांना असावे. ऐरवी निलेश राणेची दखल घेण्याची गरज नाही. पण,त्यांनी जो शब्द वापरला आहे तो मागे घ्यावा आणि समस्त समाजाची माफी मागावी.”

नांदेड मध्ये आणखी 4 रुग्ण पॉझिटिव्ह मुखेड व भोकर येथे कोरोनाचा प्रवेश रुग्णाची संख्या 110 वर*

Image
*नांदेड मध्ये आणखी 4 रुग्ण पॉझिटिव्ह मुखेड व भोकर येथे कोरोनाचा प्रवेश रुग्णाची संख्या 110 वर* नांदेड नायगाव प्रतिनिधी कानोले साईनाथ मो. 9604500201 नांदेड आता प्राप्त झालेल्या एकूण 14 अहवाल पैकी 4 रुग्ण पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ही 110 वर पोहोचली आहे आज 4 पॉझिटिव्ह प्राप्त यापैकी 4 रुग्ण पुरुष असुन अनुक्रमे वय 24 ते 54 55 वर्षे परेत त्यापैकी 1रुग्ण स्नेह नगर पोलीस कॉलनी व 1 रुग्ण भोकर येथील आसून त्यांच्यापैकी 2 रुग्ण शासकीय आयुर्वेद महाविद्यालय येथे 1 रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात मुखेड येथे 1 रुग्ण व ग्रामीण रुग्णालयात भोकर येथे औषध उपचार घेत आहेत सध्या सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे व तसेच नायगाव मध्ये सोसेलडिस्टन्स ची ठगी उडाली आहे सकाळच्या सुमारास आवश्यक  वस्तूची कारणे सांगून तालुक्यातील दुकानाला गर्दी वाढत आहे सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज नांदेड नायगाव

घोटी येथील पोलिसांना लोकमान्य हॉस्पिटल तर्फे फेस शिल्ड चे वाटप

Image
घोटी येथील पोलिसांना लोकमान्य हॉस्पिटल तर्फे फेस शिल्ड चे वाटप              इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे कोरोना मध्ये ढाल बनणाऱ्या पोलीसाना घोटी येथील लोकमान्य हॉस्पिटलच्या आरोग्य दूत डॉक्टरानी येथील पोलिसांना फेस शिल्ड चे वाटप करून एक सामाजिक बंधीलकी जोपासली हा क्षण दोघे लढाव्याना भावनिक आधार देणारा ठरावा या प्रसंगी लोकमान्य हॉस्पिटलचे संचालक डॉ.शरद दधिच,डॉ.किरण काकडे,डॉ.अंतुरलीकर,डॉ.श्याम बैरागी तसेच घोटी पोलीस स्टेशन चे पी आय, पी एस आय, कर्मचारी उपस्थित होते.  महाराष्ट्र फास्ट न्यूज        इगतपुरी प्रतिनिधी निवृत्ती मेदडे

*बीड जिल्यात कोरोनाचा सत्र सुरूच आणखी 4 रुग्णाची भर*

Image
*बीड जिल्यात कोरोनाचा सत्र सुरूच आणखी 4 रुग्णाची भर*   *जिल्यातील आष्टी पाटोदा 'माजलगाव' गेवराई 'पाटोपाट वडवणीत ही कोरोना* बीड प्रतिनिधी  *दराडे सिद्धेश्वर*  बीड जिल्ह्याला कोरोनाचे बसत असलेले धक्के सुरुच असून बुधवारी देखील जिल्ह्यात ४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.यात १ वडवणी, १ पाटोदा आणि २ वालीचिखली येथील आहेत यातील व्यक्तींचा प्रवासाचा इतिहास असुन ते मुंबई मधुन आले होते.आजच्या अहवालातील १३ रिपोर्ट प्रलंबित असुन ६ इनकनक्लुझिव अर्थात नव्याने पाठवावे लागणार आहेत. त्यामुळे आता जिल्हयात असलेल्या कोरोणाच्या सक्रिय रुग्णांची संख्या १६ झाली आहे. बीड जिल्ह्यातून बुधवारी ११२ नमुने तपासणीसाठी लातूरच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.  यात यापुर्वी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या नमुन्यांचा समावेश असल्याने सर्वांच्या नजरा अहवालाकडे होत्या. या ११२ मधुन ४ नमुने पाँझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे सर्व रेडझोन मधुन प्रवास करुन आले आहेत. आता बीड जिल्ह्यात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या १६ झाली असुन जिल्हयाची एकुण रुग्ण संख...

लढी यांच्या घरी सामाजिक सुरक्षेचे अंतर ठेवत झाला आदर्श विवाह*

Image
*लढी यांच्या  घरी सामाजिक सुरक्षेचे अंतर ठेवत  झाला आदर्श विवाह*   *जिल्हा प्रतिनिधी  वर्धा ,       राहुल दूरतकर 9923937033*         हिंगणघाट :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अगदी शासन-प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करीत अवघ्या 10 व्यक्तींच्या उपस्थितीत शास्त्रीवार्ड , हिंगणघाट  येथील लढी व कोरपणा  तालुक्यातील गडचांदुर  येथिल ठाकरे  कुटुंबियांच्या  मुला-मुलीचा विवाह सोहळा आज 14 मे 2020 रोजी अगदी सदया पद्धतीने व  सामाजिक आंतर ठेवत  पार पडला.  पैशांची उधळण करीत थाटात विवाह सोहळा पार पडण्याची परंपराच रूढ झाली आहे. प्रसंगी विवाह सोहळ्यासाठी वधु पित्या कडून  कर्जांचा डोंगर उचलला जातो. कोरोनाच्या सावटातही काहींनी विवाह सोहळा लांबणीवर टाकला आहे. मात्र, गडचांदुर   येथील मारुती प्रदीप ठाकरे   व  शास्त्रीवार्ड , हिंगणघाट   येथिल अंकिता अरुण लढी यांचा आदर्श  विवाह आज 14 मे 2020रोजी  परिवारातील  अवघ्या पाच सदस्या...
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com