सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

छगन चौगुलेंच्या निधनाने, लोककलेची मोठी हानी-वंचित बहूजन आघाडीचे नेते. मा बाळासाहेब आंबेडकर यांचे उद्ग्गार

छगन चौगुलेंच्या निधनाने, लोककलेची मोठी हानी-वंचित बहूजन आघाडीचे नेते. मा बाळासाहेब आंबेडकर यांचे उद्ग्गार 



** सुपर फास्ट महाराष्ट्र न्युज ** प्रतिनिधीअमरावती.
सुबोध यु मोहोड 9510136946.
अमरावती दीनांक 21/5/20 :अत्यंत दुःखद बातमी. महाराष्ट्रातील एक प्रभावशाली.प्रतिभावंत .लोक कलावंत, सर्व लोककला संस्कृतीची जाण असलेले. उमदे व्यक्तिमत्व छगन चौगुले यांच्या निधनाने आपण एका मोठ्या कलावंताला मुकलो आहोत. अश्या शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकरानी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
         विद्यापीठात असताना त्यांनी त्यांच्या विभागात अविस्वरणीय योगदान दिले व विभागाला एक उंची देण्यास मोलाचे योगदान दिले. प्रशिक्षक म्हणून ते खूप विद्यार्थीप्रिय होते.अत्यंत प्रांजळ व सुस्वभावी छगन चौगुले यांच्या जाण्याने विद्यापीठाची व महाराष्ट्राच्या लोककलेची खूप मोठी हानी झाल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. आतापर्यंत त्यांनी अनेक गाणी गायली आहेत. मात्र त्यांना 'नवरी नटली' या गाण्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेले होते. आज सकाळी सेव्हन हिल्स रुग्णालयात. कोरोनामुळे त्यांचे निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने लोककला क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याचे वंचीत बहूजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले. बूध्द त्यांच्या आत्म्यास शांती देवाे हीच भावपुर्ण श्रेध्दांजली,
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com