दिशा_प्रतिष्ठान_लातूर_च्या_वतीने_रुग्णसेवा_औषधे_वाटप0
आजच्या #शिववंदना चा मान लातूरच्या दिशा प्रतिष्ठान लातूर ला. त्या निमित्ताने..... #दिशा_प्रतिष्ठान_लातूर_च्या_वतीने_रुग्णसेवा_औषधे_वाटप रायगडावरील शिवस्मारक प्रतिकृती असलेले मराठवाड्यातील पहिले शिवस्मारक इसाद येथे उभे करण्यात आले आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व मावळे यांची दर शुक्रवारी शिववंदना, आरती व गारद घेतली जाते. त्यासाठी २०२२ वर्षभराचे नियोजन केले आहे. दर शुक्रवारी प्रतिष्ठित व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती ,संस्था यांना शिववंदनेचा मान दिला आहे. त्यानिमित्त लातूर येथील आरोग्य व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिशा प्रतिष्ठान लातूर यांना आमंत्रित करण्यात आले आहे. रुग्णसेवेचा वसा घेतलेल्या या दिशा प्रतिष्ठानच्या टिमने फिरता दवाखाना घेऊन या महाराजांच्या पावन भूमीत ऋग्नसेवा करण्याचे मिटिंग मध्ये एक मताने निर्णय घेतला. या शिबिरामध्ये जवळपास ११० रुग्णांनी या शिबीराचा मोफत लाभ घेतला. फिरता दवाखाना उपक्रमाअंतर्गत गरजू रुग्णांच्या रोगाचे निदान करून गरज वाटल्यास त्या रुग्णाला शहरात वैद्...