सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

दिशा_प्रतिष्ठान_लातूर_च्या_वतीने_रुग्णसेवा_औषधे_वाटप0

आजच्या #शिववंदना चा मान लातूरच्या दिशा प्रतिष्ठान लातूर  ला.
त्या निमित्ताने.....

#दिशा_प्रतिष्ठान_लातूर_च्या_वतीने_रुग्णसेवा_औषधे_वाटप

            रायगडावरील शिवस्मारक प्रतिकृती असलेले मराठवाड्यातील पहिले शिवस्मारक इसाद येथे उभे करण्यात आले आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व मावळे यांची दर शुक्रवारी शिववंदना, आरती व गारद घेतली जाते. त्यासाठी २०२२ वर्षभराचे नियोजन केले आहे. दर शुक्रवारी प्रतिष्ठित व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती ,संस्था यांना शिववंदनेचा मान दिला आहे. त्यानिमित्त लातूर येथील आरोग्य व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिशा प्रतिष्ठान लातूर यांना आमंत्रित करण्यात आले आहे. रुग्णसेवेचा वसा घेतलेल्या या दिशा प्रतिष्ठानच्या टिमने फिरता दवाखाना घेऊन या महाराजांच्या पावन भूमीत ऋग्नसेवा करण्याचे मिटिंग मध्ये एक मताने  निर्णय घेतला. या शिबिरामध्ये जवळपास ११० रुग्णांनी या शिबीराचा मोफत लाभ घेतला. फिरता दवाखाना उपक्रमाअंतर्गत गरजू रुग्णांच्या रोगाचे निदान करून गरज वाटल्यास त्या रुग्णाला शहरात वैद्यकीय उपचार करण्यासाठी त्या रुग्णावर माफक व मोफत सवलतीच्या दरामध्ये उपचार केले जातात. यामध्ये प्राथमिक तपासण्यांमध्ये बीपी, शुगर इत्यादी तपासण्या केल्या जातात. प्रथमच जिल्ह्याबाहेर दिशा प्रतिष्ठान रुग्णसेवा करत आहे. त्याच बरोबर संपूर्ण महाराष्ट्रभर रुग्ण सेवा करण्याचा दिशा प्रतिष्ठानचा मानस आहे. अवघ्या काही दिवसातच दिशा प्रतिष्ठानचा दवाखाना चालू होत आहे. त्यात गरजू रुग्णांना मोफत व माफक दरात उपचार करण्यात येणार आहेत.

          दिशा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक अभिजीत भैया देशमुख, अध्यक्ष सोनू भैया डगवाले ,डॉ अरविंद भातांब्रे सर, उपाध्यक्ष दिनेश गोजमगुंडे सर ,सचिव जब्बार पठाण सर, कोषाध्यक्ष अजय शाह सर ,प्रकल्प समन्वयक ऍड वैशालीताई लोंढे, फिरता दवाखाना प्रमुख इसरार सगरे सर  चंद्रशेखर माकणे सर, डॉ दिग्विजय शिंदे सर, डॉ चेतन सारडा सर, शुभम आव्हाड सर.या सर्वांचे सहकार्य लाभले.

विशेष उपस्थिती सिनेकलाकार बालाजी सुळ सर यांची राहिली.
दिशा प्रतिष्ठान च्या वतीने अध्यक्ष सोनू भैया यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती केली.

 ग्रामीण भागातील  वैद्यकीय समस्येचा विचार करून फिरता दवाखाना ही संकल्पना सुरू केली या कार्यक्रमाचे आयोजन #हिंदवी_स्वराज्य_प्रतिष्ठान व समस्त गावकरी मंडळी इसाद यांनी केले.

      हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिगंबरराव आबा, बाळू पाटील, बालासाहेब भोसले, श्रीधर सातपुते, नरेंद्र भालेराव, कल्याण भोसले, अतुल भोसले परमेश्वर नेजे, दीपक सातपुते, विठ्ठल सातपुते, नानासाहेब भोसले, सचिन सातपुते, विजय भोसले, श्रवण पांचाळ, रोहित कानडे, वैभव भोसले, राहुल भोसले, राजेश भोसले,सुनील सूर्यवंशी, आणि आर.डी. भोसले आदी सर्व तरुणांनी परिश्रम घेतले.
                                 धन्यवाद..!🙏
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com