Posts

Showing posts from September, 2022
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

दयानंद रेवडकर यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार

Image
दयानंद रेवडकर  यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार बार्शी - श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित जनता विद्यालय येडशीचे क्रीडाशिक्षक दयानंद श्रीरंग रेवडकर यांना ए आय एस एफ वैद्यकीय समिती यांच्या वतीने आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार २०२२ ने ५ सप्टेंबर रोजी खुलताबाद जिल्हा औरंगाबाद येथे राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.  रेवडकर यांनी क्रीडा,शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असल्यामुळे तसेच क्रीडा प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास उत्तम होत असल्याकारणाने समाजाला त्यांच्या कार्यामुळे प्रेरणा, प्रोत्साहन, आत्मविश्वास मिळावा व स्वतःची आणि समाजाची कार्यक्षमता वाढवी यासाठी आपल्याला त्यांना राज्यस्तरीय क्रीडा शिक्षक महाराष्ट्र राज्य २०२२ हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.  वैद्यकीय समितीचे राज्याध्यक्ष डॉ. अमोल जाधव, प्राचार्य ज्ञानप्रकाश भार्गव, डॉ.जगदिश हेडाव यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी रेवडकर सरांची पत्नी सौ.ज्योती रेवडकर , मुलगा अविराज रेवडकर व महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे सहशिक्षक अतुल नलगे उपस्थित...

महेंद्र घोडके यांना आदर्श प्राचार्य पुरस्कार प्रदान

Image
*महेंद्र घोडके यांना आदर्श प्राचार्य पुरस्कार*  खुलताबाद (बातमीदर )असिफ वैद्यकीय समीती भगवती बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने महेंद्र घोडके यांना सोमवार दिनांक 5 सप्टेंबर 2022 रोजी शिक्षक दिनाच्या दिवशी आदर्श प्राचार्य पुरस्कार देण्यात आला. येथील भद्रा मारुती संस्थानच्या भक्त निवासात हा कार्यक्रम डॉक्टर अमोल जाधव यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला•   महेंद्र घोडके यांनी महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक व समाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांनाआदर्श प्राचार्य  महाराष्ट्र राज्यस्तरीय 2022 या वर्षाचा मानाचा पुरस्कार प्रदान  करण्यात आलेला आहे. सोशल सर्व्हिस लीग संस्थेचे अध्यक्ष श्री आनंद माईणकर, मानव सचिव श्री चंद्रकांत खोपडे ,उपाध्यक्ष श्री विजय वर्टी ,खजिनदार श्री मदन देसाई ,सदस्य श्री हेमंत सामंत,सदस्य श्रीमती उमा शेट्ये, आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सत्कार केला, त्याबद्दल महेंद्र घोडके यांनी सर्वांचे आभार  व्यक्त केले आहेत.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com