Posts

Showing posts from August, 2020
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

नारी शक्ती संघटनेच्या वतीने पत्रकारना कोरोना योध्दा सन्मानित

Image
*सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ प्रतिनिधी‌ फिरोज मन्सुरी शेख लासुर स्टेशन.…..* *नारी शक्ती संघटनेच्या वतीने पत्रकारना कोरोना योध्दा  सन्मानित....* गंगापुर तालुक्यातील जोगेश्वरी येथे महिलांच्या वतीने विविध प्रकारच्या मिडीया पत्रकार प्रकाश सातपुते  फिरोज मंसूरी  रमेश नेटके सजय काळे डिपी वाघ राजेक ‌सय्यद यांना कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले, कोरोना महामरीच्या काळामध्ये स्वता चा जीव धोक्यात घालून आपल्या कुंटूबाची पर्वा न करता देशासाठी अहोरात्र कामगिरी केल्याबद्दल नारी शक्ती या संघटनेच्या संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मंदाकीनी वाघमारेआणि महिलांनी लोकडाऊनच्या काळा मध्ये पत्रकारांनी केलेल्या धाडसी कामगिरी बद्दल त्यांना कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले , लोकडाऊनच्या काळामध्ये महिलांवरील होणारे अत्याचार होऊ नये याची दखल घेऊन ही नारी शक्ति संस्था पूर्ण औरंगाबाद जिल्हाभरात कार्यरत आहे. यावेळी नारी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा विविध पदावर नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी  मा बाबांनाथ जाधव मा नरेंद्र गायकवाड मा रमेश जाधव मराठवाड़...

आधी विश्वासात घ्या, नंतरच लॉकडाऊन करा : - खासदार बाळू धानोरकर*

Image
*आधी विश्वासात घ्या, नंतरच लॉकडाऊन  करा : - खासदार बाळू धानोरकर* *जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय व्यापारी व लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना खासदार धानोरकरांच्या सूचना* चंद्रपूर : कोरोना विषाणूने मोठ्या प्रमाणात थैमान मांडले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दुसरीकडे मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्था डबघाईस येत आहे. चंद्रपूर येथे आधी जवळपास चार वेळा लॉकडाऊन करण्यात आले. परंतु आता मात्र व्यापारी वर्ग व इतर क्षेत्रातून लॉकडाऊन कारण्यासंबधी नकाराथता दर्शवित आहेत. आधी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय व्यापारी व  लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन  अनलॉक च्या केंद्र व राज्य सरकारच्या दिशानिर्देशानुसार लॉकडाऊन करण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी  जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना केल्यात.                यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. यावेळी महापौर राखीताई कंचर्लावार, चंद्रपूर शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी, उपमहापौर राहुल पावडे, रा. कॉ. शहर अध्यक्ष राजीव कक्कड, का...

*तब्बल विस वर्षा नंतर विनोद बागुल चे डान्स क्लासेस सुरु .....*.

Image
*सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ प्रतिनिधी‌ फिरोज मन्सुरी शेख लासुर स्टेशन....* *तब्बल विस वर्षा नंतर विनोद बागुल चे डान्स क्लासेस सुरु .....*. आत्महत्या न करता केला स्वतःचा व्यवसाय चालू...... सामान्य व हातावरती पोट असणाऱ्या जनसामान्यांसाठी कोरोनाचे पाच ते सहा महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर तसेच त्यांच्या कुटुंबावर अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण केली त्यातीलच एक वर्ग मध्ये सर्वसाधारण लोक कलावंत यांचीही परिस्थिती अशीच..... स्टेज शो बंद झालेत , घेतलेले कार्यक्रम रद्द झालेत कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवायचा असा गंभीर प्रश्न त्यांना सतावू लागला ..या काळात सुशांत सिंग यासारख्या बॉलिवूड अभिनेत्याने सर्व काही असतांना आत्महत्येचा मार्ग स्वीकारला.. औरंगाबाद जिल्हातील लासुर स्टेशन येथील सर्व सामान्य कुटुंबातील लोककलावंत व विविध मराठी चित्रपट व मालिकांत काम केलेले विनोद बागुल यांच्या मनात काही दिवसांपूर्वी आत्महत्येचा विचार आला होता कारण मायानगरी असणारी मुंबई कोरोनॉमुळे ठप्प झाली होती व आपल्या कुटुबाचा चरितार्थ व मुलांचे शिक्षण कसे करायचे या विवंचनेतून मुंबईत राहून काय करायचे त्या...

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज चे प्रतिनिधी फिरोज मन्सूरी-शेख यांचा सन्मान

Image
वाळुज नगरीत जोगेश्वरी येथे नारी शक्ति कडुन सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ प्रतिनिधी‌ फिरोज मन्सुरी शेख यांना कोरोना योध्दा म्हणुन सम्मानित केले

लासूर स्टेशन येथील स्टेट बॅंकेतील तिन अधिकारी कारोना पाॅझिटीव निघाल्याने बॅक बंद करावी लागली.....*

Image
*सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ प्रतिनिधी‌ फिरोज मन्सुरी शेख लासुर स्टेशन.....* लासूर स्टेशन येथील स्टेट बॅंकेतील तिन अधिकारी कारोना पाॅझिटीव निघाल्याने बॅक बंद करावी  लागली.....*  यामुळे व्यापारी, शेतकर्याचे आर्थिक व्यवहार रखडले आहे यामुळे बॅकेचे अनेक ग्राहक अडचणीत आले आहे, लासूर स्टेशन सह परीसरात सोसल डिंस्टन, मास्क न वापरणे आदी कोरोना-19 नियमाचा फज्जा उडाला आहे लासूर स्टेशन ता गंगापूर येथील स्टेट बॅंकेचे व्यापारी, शेतकरी, शासकीय कर्मचारी आदी सर्व साधारण हजारो ग्राहक आहे मात्र कोरोना-19 तपासणीत तिन अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागाने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवु नये म्हणून स्टेट बॅंक बंद केली लासूर स्टेशन येथील व्यापार्यांचा व्यवहार तर शेतकर्याचा पिक कर्जाचे कामे खोंळबले आहे  लासूर स्टेशन सह परीसरात कोरोना च्या नियमाला केराची टोपली दाखवल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे तरी देखील शासकीय कार्यालये, विविध छोटे मोठे व्यापारी सह ग्राहक याची कोणीच दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे, सोसल डिंस्टन, मास्क,सॅनिटाइजर चा वापर आदी कोणत्याही नियमाचे पालन ...

लासुर स्टेशन येथे वाढत्या कोरोनो संसर्गामुळे देवगिरी बँकेकडून आर्षेनिक अलबम गोळ्या वाटप...

Image
*सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ प्रतिनिधी‌ फिरोज मन्सुरी शेख लासुर स्टेशन.....*. *लासुर स्टेशन येथे वाढत्या कोरोनो संसर्गामुळे देवगिरी बँकेकडून आर्षेनिक अलबम गोळ्या वाटप...* लासुर स्टेशन येथे कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या  पार्श्वभूमीवर आपल्या सामाजिक सेवेच्या परंपरेला जागत देवगिरी बँकच्या लासूर स्टेशन शाखेच्या वतीने आज लासूर स्टेशन येथे आरशेनिक आल्बम या होमीयोपॅथीक औषधाचे व गोळ्यांचे वाटप करण्यात आले.             या प्रसंगी शाखाधिकारी जगताप साहेब व बँक कर्मचारी यांच्यासह रा.स्व. संघाचे  संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्याचे जिल्हा बौद्धिकप्रमुख आप्पासाहेबजी पारदे, गंगापूर तालुका सहकार्यवाह राजेशजी चौहान, भाजपा शहर अध्यक्ष संतोष काळे, प्रितेशसेठ छाजेड यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी साहेब लासुर ‌स्टेशन वाढत्या कोरोनोकडे लक्ष द्या साहेब*

Image
*सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ प्रतिनिधी‌ फिरोज मन्सुरी शेख लासुर स्टेशन.....* *जिल्हाधिकारी साहेब लासुर ‌स्टेशन वाढत्या कोरोनोकडे लक्ष द्या  साहेब* प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱयांची व कर्मचार्याची वाणवा...... गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशनची लोकसंख्या जवळपास चाळीस हजाराच्या आसपास असून प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जोडलेल्या खेड्या व्यतिरिक्त बोरसर,देवगाव, या आरोग्य केंद्रातील रुग्णही लासुरच्याच प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येत असतात त्यामुळे ओपीडीला दररोज सातशेच्या पुढे रुग्ण येतात त्यातच महिलांची प्रसूती,गरोदर माता चेकअप,बालकांची तपासणी यामुळे अपुऱ्या कर्मचाऱ्याअभावी रुगणाच्या नातेवाईकांची व वैद्यकीय अधिकारी यांच्यात वारंवार वादावादी होत असते त्यातच लासुर स्टेशन,दायगाव व प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावात कोरोनो व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्यमुळे आरोग्य अधिकारी व कर्मचारी अँटिजेन टेस्टचे कॅम्प दायगाव येथे दोन दिवसांपासून घेत आहे त्यामुळे सर्वच आरोग्य अधिकारी दायगावला गुंतल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारीच उपलब्ध नसतात त्यामुळे लासुर स्टेशन ये...

केदारनाथ मंदिर* *एक न उलगडलेल कोडं !*

Image
*केदारनाथ मंदिर* *एक न उलगडलेल कोडं !* केदारनाथ मंदीराचे निर्माण कोणी केलं याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात.  अगदी पांडवांपासून ते आद्य शंकराचार्य पर्यंत. पण आपल्याला त्यात जायच नाही. केदारनाथ मंदिर हे साधारण ८ व्या शतकात बांधलं गेल असावं असे आजचं विज्ञान सांगत. म्हणजे नाही म्हटलं तरी हे मंदिर कमीतकमी १२०० वर्षांपासून अस्तित्वात आहे. केदारनाथ जिकडे आहे तो भूभाग अत्यंत प्रतिकूल असा आज २१ व्या शतकातही आहे. एका बाजूला २२,००० फूट उंचीचा केदारनाथ डोंगर, दुसऱ्या बाजूला २१,६०० फूट उंचीचा करचकुंड तर तिसऱ्या बाजूला २२,७०० फुटाचा भरतकुंड. अशा तीन पर्वतातून वाहणाऱ्या ५ नद्या मंदाकिनी, मधुगंगा, चीरगंगा, सरस्वती आणि स्वरंदरी.  ह्यातील काही ह्या पुराणात लिहिलेल्या आहेत. ह्या क्षेत्रात फक्त *मंदाकिनी नदीच* राज्य आहे . थंडीच्या दिवसात प्रचंड बर्फ तर पावसाळ्यात प्रचंड वेगाने वाहणार पाणी. अशा प्रचंड प्रतिकूल असणाऱ्या जागेत एक कलाकृती साकारायची म्हणजे किती खोलवर अभ्यास केला गेला असेल. *केदारनाथ मंदिर* ज्या ठिकाणी आज उभे आहे तिकडे आजही आपण वाहनाने जाऊ शकत नाही. अशा ठिकाणी त्याचं नि...

किशोर लोखंडेने थोडी जरी चूक केली असती तरीही जिवंत असलेला चार वर्षाचा मोहम्मद वाचला नसता !

Image
#महाडइमारत #दुर्घटना किशोर लोखंडेने थोडी जरी चूक केली असती तरीही जिवंत असलेला चार वर्षाचा  मोहम्मद वाचला नसता !  " मी जवा मशीन घेउन गेलो तिथं तवा येकच वाटलं मला की मी ह्या बिल्डिंग मधी गुतलोया . म्हनुन मला योग्य वाटेल तशी काळजी घेउन काम केलं. माणसाला धक्का न लागता माणसं कशी काढता येतील हाच प्रयत्न केला .. पयली येक डेड बॉडी मिळाली आम्हाला ...जवा कवा मला जागा दिसायची मोकळी तवा मी त्यानला सांगायचो की हिथं आधी चेक करा मगच मी उकिरतो  .. तर ह्या लहान मुलाचं कसं झालं सर की , जवा बिल्डिंग कोसळली त्याच्या आधी त्यो त्याची आई आनी दोन त्याच्या बहिनी जिन्यावरनं उतरत होत्या असनार , आनी खाली उतरत असतानाच त्यो मुलगा छोटा होता नां ? त्यो, जी पाय ठेवायची जागा असते पायरीची , त्या पायरीच्या मदी गुतला होता त्यो ! म्हणजे त्याला बिल्कूल काही नाहेस झाल्तं. आनी तसाच शाबीत यवस्तीत राह्यला त्यो !  NDRF च्या लोकानी डायरेक त्याला हातामदी घेतलं कारन त्यो जिन्याच्या पायरीच्या खटकीमदीच होता नां ! भायेर आल्यावर त्याला येगळच वातावरन दिसलं . त्यो लय घाबरला . पयल्यांदा त्येनं माझ्याकडं पाह्यलं ...

विद्युत वितरण कंपनीने तीनशे युनिट पर्यंत विज बिल प्रति महिना माफी करावे अन्यथा न्यायालयात कंपनी व सरकारच्या विरोधात न्याय मागु = गजानन पाटील चव्हाण

Image
*विद्युत वितरण कंपनीने तीनशे युनिट पर्यंत विज बिल प्रति महिना माफी करावे  अन्यथा न्यायालयात कंपनी व सरकारच्या विरोधात न्याय मागु = गजानन पाटील चव्हाण* =  ========================= सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज नांदेड नायगाव प्रतिनिधी कानोले साईनाथ मो 8421958713 नायगाव तालुक्यासह खेड्या पाड्यातील मीटर धारकाला  विद्युत वितरण कंपनीने तीनशे युनिट पर्यंत विज बिल दर महिना माफी द्यावे अन्यथा सरकारच्या विरोधात न्यायालयात दाद मागू असा ईशारा सामाजिक कार्यकर्ता गजानन पाटील चव्हाण यानी एका निवेदना द्वारे दिला आहे        संबंध जगामध्ये तसेच आपल्या भारत देशासह महाराष्ट्रामध्ये कोरोना या प्राण घातक भया वया महामारीमुळे या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने तथा महाराष्ट्र शासनाने व जिल्हाधिकारी जिल्हा प्रशासन यांच्या आदेश नियम आटी घालून दिलेल्या लाॅकडाऊन घोषित  केल्यापासून आज पर्यंत सर्व नागरिकानी  काटेकोर पणे पालन  केले आहे            प्रशासनास नागरीकानी सहकार्य  केले तसेच पोटाची खळगी भरण्यासाठी कुटुंब प्रमुखाने ...

शालेय शुल्क माफ करा-शिवश्री सतीश,जिल्हाध्यक्ष,मराठा सेवा संघ,चंद्रपूर

Image
शालेय शुल्क माफ करा-शिवश्री सतीश,जिल्हाध्यक्ष,मराठा सेवा संघ,चंद्रपूर             सद्यस्थितीत संपूर्ण जग वैश्विक महामारी कोरोना विषाणू च्या संकटाला तोंड देत आहे.आपल्या देशातही त्याचा प्रादुर्भाव प्रचंड वाढत आहे.त्याला आळा घालण्यासाठी शासनाने टाळेबंदी केली.या टाळेबंदी मूळे चंद्रपूर शहरातही सर्व व्यवसाय व सामान्य जनजीवनावर  विपरीत परिणाम झाला आहे.परिणामी सर्व सामान्य पालकांवर आर्थिक संकट आले आहे.अशा परिस्थितीत पालकांना शैक्षणिक शुल्क भरणे शक्य नाही,काही व्यवसाय बंद पडले तर काही पालकांच्या रोजगाराच्या समस्या निर्माण झाल्या आहे.यापैकी अनेक पालक अर्ध्या वेतनावर काम करत आहेत,जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्याची धडपड सुरु आहे.           अश्या परिस्थतीत शालेय शुल्क भरणे पालकांना अशक्य  आहे.त्यामुळे पालकांनी शुल्क माफ करण्यासाठी श्री महर्षी विद्यामंदिर,चंद्रपूर येथील प्राचार्याना निवेदन देण्यात आले.यावेळी मराठा सेवा संघ,जिल्हाध्यक्ष सतीश मालेकर,जिल्हासचिव प्रा.अनिल डहाके,जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा वनिता आसुटकर,राजेश पोलेवार...

घोटीच्या सरपंचपदी सचिन गोणके

Image
घोटीच्या सरपंचपदी सचिन गोणके।                              इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे थेट सरपंच निवडणुकीत अपात्र ठरलेले सरपंच प्राध्यापक मनोहर घोडे याच्या रिक्त झालेल्या पदी २५ तारखेला निवडणूक होऊन सत्ताधारी पार्टीला यश येऊन १२ /४ अशी लढत होऊन सचिन गोणके याच्या गळ्यात वर्षभरातच सरपंच पदाची माळ पडली. निवडनूक अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी श्याम बोरसे यांनी काम पाहिले. या प्रसंगी एक सदस्य वगळता सर्व सदस्य उपस्थित होते. इगतपुरी तालुका प्रतिनिधी निवृत्ती मेदडे

केंद्रीय पत्रकार संघाचे जिल्हा जनसंपर्क अधिकारी म्हणून मधुकर दंडगव्हाळ यांची नियुक्ती **

Image
*सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ प्रतिनिधी‌ फिरोज मन्सुरी शेख लासुर स्टेशन.....* *केंद्रीय पत्रकार संघाचे जिल्हा जनसंपर्क अधिकारी म्हणून मधुकर दंडगव्हाळ यांची नियुक्ती ** लासूर स्टेशन, दि.27 (प्रतिनिधी): लासूर स्टेशन येथील जेष्ठ पत्रकार मधुकर दंडगव्हाळ यांची केंद्रीय पत्रकार संघाच्या औरंगाबाद जिल्हा जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप कसालकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष कमलेश गायकवाड यांच्या आदेशाने जिल्हा अध्यक्ष सचिन बोंबले यांनी नियुक्तीपत्र देऊन श्री.दंडगव्हाळ यांना पत्रकारांच्या हितासाठी कार्य करावे आशा सूचना केल्या.जिल्हा उपाध्यक्ष सिद्धांत कांबळे यांनी शिफारस केली तर लासूर स्टेशन पत्रकार संघाचे अशोक जैस्वाल, श्रीराम मढीकर, अविनाश संगेकर, मकसूद शेख, विनोद जाधव, संदीप गायकवाड, पोपट ठोकळ, रामेश्वर श्रीखंडे, गुलाब वाघ, तुषार सराफ, सलीम शहा, खलील शहा, विजय क्षीरसागर, प्रकाश सातपुते, रमेश नेटके, फिरोज मन्सुरी आदींनी अभिनंदन केले आहे.

*लासुर स्टेशन येथे स्टेट बँक अधिकाऱ्यांसह चार ग्रामपंचायत कर्मचारी कोरोनो पॉझिटिव्ह...

Image
*सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ प्रतिनिधी‌ फिरोज मन्सुरी शेख गंगापुर .....* *लासुर स्टेशन येथे स्टेट बँक अधिकाऱ्यांसह  चार ग्रामपंचायत कर्मचारी कोरोनो पॉझिटिव्ह.....* लासुरला आज एकूण अठरा कोरोनो पॉझिटिव्ह..... लासुर स्टेशन येथे आज एकूण साठ नागरिकांचे आरोग्य अधिकाऱ्यानी अँटिजेन टेस्ट घेतल्या त्यापैकी लासुर स्टेशन येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचा एक अधिकारी व लासुर स्टेशन ग्रामपंचायतचे चार कर्मचारयासह एकूण आठरा जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याने नागरिकांत पुन्हा खळबळ उडाली आहे.                         कालच जिल्हाधिकारी श्री.सुनील चव्हाण यांनी गंगापूर तहसील कार्यलयात कोरोनॉच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्वांनी हात स्वछ धुणे,सनिटायझर वापरणें तसेच मास्क वापरणे बंधनकारक असल्याचे सांगून प्रशासकीय कर्मचारी व अधिकार्यानी या कामात कुचराई केल्यास कारवाई करण्याचा गंभीर इशारा दिला होता मग आत्ता लासुर स्टेशन येथे दिवसेंदिवस कोरोनो पॉझिटिव्ह रुगणांची संख्या वाढत असून मग जिल्हाधिकारी यांनी सांगितल्याप्...

लासुरला गणपती व मोहरमच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथसंचलन.....

Image
*सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ प्रतिनिधी‌ फिरोज मन्सुरी शेख गंगापुर लासुर स्टेशन.....* *लासुरला गणपती व मोहरमच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथसंचलन......* यक्ष कोरोनो व्हायरसच्या पार्शवभूमीवर शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऐन उत्सवाच्या काळात कुठलाही गैरप्रकार समाजकंटकाकडून घडू नये म्हणून शिल्लेगाव पोलिसांसह दंगा काबू पोलीस दलाकडून पोलीस ठाणे हद्दीतील सर्वात मोठी लोकसंख्या व बाजारपेठ असलेल्या लासुर स्टेशन येथे पथसंचलन करण्यात आले.                   ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील,अप्पर ग्रामीण पोलीस अधीक्षक गणेश गावडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांनी पोलीस ठाणे हद्दीतील 65 गावात शांतता समितीच्या बैठका घेऊन सर्व उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन केले आहे यावेळी पोलीस उपनिरीक्षक सर्वश्री सतीश दिंडे,राम बारहाते,व शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांची उपस्थिती होती.

आरक्षण फाईलची पूर्तता करा अन्यथा राज्यभर मंत्र्यांना काळे फासण्याचा ईशारा

Image
सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज औरंगाबाद प्रतिनिधी अनिरुध्द भारद्वाज मो,9890557747 आरक्षण फाईलची पूर्तता करा अन्यथा राज्यभर मंत्र्यांना काळे फासण्याचा ईशारा धोबी समाजाचे काळे निवेदन देत निषेध आंदोलन राज्यातील धोबी समाजाला पूर्ववत आरक्षण लागू व्हावे म्हणून त्रुटी असलेल्या प्रस्तावाकडे राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने नाहक दहा महिन्यांपासून दुर्लक्ष चालवले आहे.सामाजिक न्याय खात्यात प्रस्ताव धूळखात पडून आहे.हा अचूक प्रस्ताव महिनाभरात केंद्राला पाठवला न गेल्यास राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना व मंत्र्यांना दिसतील तिथे काळे फासण्याचा ईशारा समाजाचे प्रदेशाध्यक्ष विवेक ठाकरे यांनी दिला. धोबी समाजाला हक्काच्या आरक्षणापासून राज्याचा सामाजिक न्याय विभाग वंचित ठेवत असल्याने आज सोमवार (२४ ऑगस्ट रोजी) महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळाच्या वतीने संपूर्ण राज्यभर काळ्या फिती व काळे मास्क लावून काळेच निवेदन देत राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा निषेध म्हणून आंदोलन करण्यात आले. राज्यातील धोबी समाजाला गेल्या २५-३० वर्षांपासून राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने हेतूत: च...

नायगाव तालुक्यातील मोजी बरबडा वाडी या रस्त्याची दुर्दशा*

Image
 *नायगाव तालुक्यातील मोजी बरबडा वाडी या रस्त्याची दुर्दशा*    सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज  नांदेड नायगाव  प्रतिनिधी कानोले साईनाथ  मो 8421958713 नायगाव तालुक्यातील मोजी बरबडा वाडी या रस्त्याची दुर्दशा   वाडी हे गाव बरबडा ह्या गाव पासून 3किमी अंतरावर आहे या गावाला गोदावरी नदी आहे या गावचे पुनर्वसन होऊन 40ते 45 वर्ष होत यत आहे तरी या गावाला रोड नाही या गावातील लोक संख्या 300 ते 350 इतकी असून  गावातील सर्व  नागरिक  यांनी रस्त्या साठी खूप प्रेयत्न केला पण कुठल्याही परिस्थितीत या रोडची समशा सुटत नाही  माघील निधी मध्ये गेल्या वेळेस जिल्हा परिषद कडून वीस लाख मंजूर झाले असे जिल्हा सदस्यांनी म्हंटल आहे ज्या ठिकाणी खराब रस्ता आहे त्या ठिकाणी रस्ता झालेला नाही ज्या ठिकाणी मटरेल कमी लागते असा एक किलोमीटर रोड करून दिलेला आहे पण या बोगस करतुवाला वाडी या गावातील सर्व नागरिक वैतागले आहेत  या ठिकाणी सरपंच असो किंवा ग्रामशोक असो जिल्हासदशय असो या आमदार असो ,खाजदार असो किंवा मंत्री असो या गोष्टीसाठी कोणत्याही नेत्यांनी रोड संदरबाद भेट दिली नाही...

मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य* *मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब* एका विनंती

Image
 *🚩जय महाराष्ट्र*🚩 *🙏प्रति* *मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य* *मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब* *आदरणिय शिवसेना पक्ष प्रमुख या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब आपणास सविनय पणे विनंती निवेदन सादर करत आहो की वर्धा जिल्हा महाराष्ट्र मध्ये गांधी जिल्हा म्हणुन ओळखला जातो,हिच ओळख या महाराष्ट्र राज्या मध्ये आहे.पण काही विरोधी पक्षाच्या आमदारांनी जिल्हा  मधिल काही गांवा कडे दुर्लक्ष केले आहे.तसेच हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात मध्ये येत असलेले माझे जन्म गांव बोपापुर या गावाकडे स्थानिक भाजपाचे आमदार कुणावार यांनी पाठफीरवली आहे.बोपापुर आणि हिवरा हे गांव आमदाराचे गांव म्हणुन ओळखल्या जाते पण आता पर्यंत विकासाची कोणतेच कामे केली नाही,या आधी शिवसेनेचे माजी आमदार अशोकजी शिंदे यांनी बोपापुर गांवासाठी रोड करुण दिले त्या नंतर या स्थानिक आमदार कुणावार नी कोणतेच लक्ष दिले नाही,नेमका विषय असा आहे की बोपापुर या गांवा मध्ये  शेतकर्या साठी व शेती मध्ये जाण्या करीता पांदण रस्त्याची निर्मिती केली आहे.त्या रस्त्यावर एक खुप मोठा नाला आहे.त्या नाल्यावर पुल नसल्या मुळे शेतकरी यांना...

कोरोनवर मात करून मा श्री खा, प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे झाले आज नांदेड मध्ये आगमन*

Image
 *कोरोनवर मात करून मा श्री खा, प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे झाले आज नांदेड मध्ये आगमन*          सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज नांदेड नायगाव प्रतिनिधी कानोले साईनाथ मो,8421958713              कोरोनवर मात करून मा श्री प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे झाले आज नांदेड मध्ये आगमन #_नांदेडचे_लोकप्रिय_खासदार    #_मा_श्री_प्रतापराव_पाटील_चिखलीकर_साहेब आज कोरोनावर मात करुन नांदेडला परत आले त्यांचे नांदेड  विमानतळावर यांना सदिच्छा भेट देतांना  #_भारतीय_जनता_पार्टी_चे_जिल्हा_सरचिटणीस_तथा_माजी_शिक्षण_सभापती  #_मा_श्री_शिवराज_पाटील_होटाळकर_  व माजी जिल्हा परिषद सदस्य  #_मा_श्री_बालाजी_बच्चेवार_ व भाजप नांदेड जिल्ह्यातील प्रमुख भूमिका साकारली जाणारी  कारेकर्त्या उपस्तीत होते अशी माहिती सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज ला दिली               नांदेड नायगाव

सार्वजनिक गणेशोत्सवात नियम तोडणारावर गुन्हे दाखल करणार...पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील*

Image
 *सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ प्रतिनिधी‌ फिरोज मन्सुरी शेख लासुर स्टेशन......* *सार्वजनिक गणेशोत्सवात नियम तोडणारावर गुन्हे दाखल करणार...पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील* कोरोनाचे संकट चालू पुढेही सुरुच राहणार असल्याने कोरोनामुळे  शारीरिक एकत्र न येता मनाने एकत्र येऊन गंगापूर तालुका कोरोनामुक्त करायचा आहे आतापर्यंत सर्व सण घरातच साजरे केले सर्व गणपती  मंडळांनी साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजरे करावे नियम तोडणाऱ्याची गय केली जाणार नसुन त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी सांगितले. गंगापूर येथील शिवकृपा मंगल कार्यालयात गणपती, मोहरम निमित्त शांतता समीतीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पाटील बोलत होत्या    ऊपविभागीय पोलीस आधिकारी संदीप गावीत, तहसीलदार अवीनाश शिंगटे,नगराध्यक्षा वंदना प्रदीप पाटील, पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे शिल्लेगांव पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र खांडेकर, पी एस आय अर्जुन चौधर,समादेशक पाटील ,नगरसेवक प्रदीप भैय्या पाटील, यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना पोलीस अधीक्षक पाटील म्...

साई अमृत गुरुकुल

Image
 Admission Open साई अमृत गुरुकुल (होस्टेल ) सातारा परिसर ,औरंगाबाद 11 वी  Sci/Arts/Com व पाचवी ते दहावी या सर्व विद्यार्थ्यांचे  नाव नोंदणी चालू आहे. आजच आपला प्रवेश निश्चित करा .  मो :- Chavan sir :-  9172583333

मराठवाड्यात पोळा साजरा..

Image
 मराठवाड्यात पोळा साजरा.. प्रतिनिधी Dr अमोल जाधव   मराठवाड्यामध्ये विविध ठिकाणी पोळा सण साजरा झालेला आहे. करोणा मुळे व प्रशासनाच्या काही नियमामुळे  विविध ठिकाणी पोळ्याच्या मिरवणुका झाल्या नाही. शासनाच्या विविध नियमामुळे शेतकऱ्यानाच्या मनावर त्याचा परिणाम झालेला दिसला  .त्यामुळे  शेतकऱ्याने आपल्या बैलांची पूजाही घरीच केल्याच चित्र सर्वत्र दिसत होत.

अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या हेरिंग संपल्या निकाल मात्र अद्यापही बाकी.

Image
 अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या हेरिंग संपल्या निकाल मात्र अद्यापही बाकी. प्रतिनिधी Dr अमोल जाधव   आज झालेल्या तब्बल तीन तास सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी चालली परंतु सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकाल मात्र बाकी  ठेवला आहेत.  सर्व याचिकाकर्त्यांनी आपल्याकडील  सर्व कागदपत्रे सर्वोच्च न्यायालयाने गोळा करायचे सांगितले व त्याना तीन दिवसाचा अवधी कागदपत्र गोळा करायला  दिलेला आहे. या नंतर या केसमध्ये हेरिंग होणार नाही. सर्वोच्च न्यायालय 4-5 दिवसात डायरेक्ट निकाल देण्याची शक्यता आहे.  2लाख 65हजार अंतिम वर्षाच्या विद्यार्थीचे भविष्य निकालावर अवलंबुन आहेत. 800विदयापीठचे पेपर घेणे बाकी आहेत. 

बैल पोळा आप आपल्या घरातून साजरा.

Image
 मौजे पराडा येथील वाढत्या कोरोना मुळे सोशल डिसींग पाळुन बैल पोळा आपण आपल्या घरातून साजरा                  मराठवाडा न्युज प्रतिनिधी अंबड        श्री गणेशराव पाटील पाटोळे पराडेकर                                      वाढत्या कोरोना च्या प्रसंगानुसार व शासनाच्या नियमानुसार जास्त गरदी न करता आप आपल्या घरातच बैल पोळा साजरा करा असे आव्हान जालना जिल्हा आधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले होते त्यांच्या अनुषंगाने मौजे पराडा येथील सरपंच राधाकिसन भाऊ जराड यांच्या आदेशानुसार मौजे पराडा येथील ग्रामस्थांनी सोशल डिसींग पालन करुन बैल पोळा हा सण आप आपल्या घरामध्ये राहनुच साजरा केला

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आजच्या पिढीला ऊर्जास्रोत....भाई कमलेश चांदने*

Image
 *सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ प्रतिनिधी‌ फिरोज मन्सुरी शेख लासुर स्टेशन.......* *लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आजच्या पिढीला ऊर्जास्रोत....भाई कमलेश चांदने* लासुर स्टेशनला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या  पुतळ्याला अभिवादन..... आज 15 आगस्टला लासुर स्टेशन येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची स्थापना अज्ञात नागरिकांनी पहाटे केली होती सकाळी महिला,भगिनी,समाजसेवक,राजकीय पदाधिकारी यांनी पुतळ्याला अभिवादन केले.                      हि बातमी एम.आय.एम. विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाद्यक्ष ऍड.कुणाल खरात,औरंगाबादचे आरपीआय आठवले गटाचे शहाराद्यक्ष व  व्याख्येते कमलेश चांदणे,नितीन पगारे यांना कळताच त्यांनी लासुर स्टेशन येथे येऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करताना कमलेश चांदणे  बोलताना म्हणाले की लासुर स्टेशन येथे सर्व महापुरुषांचे पुतळे आहेत मात्र अज्ञात नागरिकांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवला हि अभिमानाची  बाब आहे कारण महापुरुषांचे पुतळे व स्मारक हे आजच्या भरकटलेल्या दिशा देण्याचे काम करत ...

15ऑगस्ट 74 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने चंद्रपूर शहरातील कोरोना वायरस चा वाढता प्रादुर्भाव

Image
 15ऑगस्ट 74 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने चंद्रपूर शहरातील कोरोना वायरस चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता श्री साई सेवासंकल्प प्रतिष्ठान चंद्रपूर तर्फे समाजात मास्क विषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने गांधी चौक येथे सकाळी 9 वाजता शहरांत विना मास्क वापरता फिरणाऱ्या लोकांना थांबवून मास्क वापरण्या साठी विनंती व जागृत करुन मास्क व बिस्कीट चे वितरण करण्यात आले सोबतच सदैव शहरातील नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असलेले पोलीस बांधवांना गांधी चौक येथील पोलीस स्टेशन येथे जाऊन स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन मास्क व बिस्कीट देऊन गौरव करण्यात आला.  या प्रतिष्ठान च्या सामाजिक उपक्रमाला भरघोस नागरिकांचा प्रतिसाद लाभला.  कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता प्रतिष्ठानची टीम कार्यरत होती. सचिन गाटकिने, प्रमोद वरंभे, विनोद गोवरादीपे, नवीन कपूर, प्रदीप रणदिवे, रुपेश महाडोळे, कुणाल खनके, भागवत खटी,  नितेश खामणकर,  अमोल मोरे,  विशाल रासेकर, रामेश्वरी देवाडे, सुरज गुंडवार यांची उपस्थिती लाभली

इगतपुरी तालुक्यातील सर्वच धरणे ओव्हर फ्लो।

Image
 इगतपुरी तालुक्यातील सर्वच धरणे ओव्हर फ्लो।      इगतपुरी तालुका हा धरणाचा तालुका म्हणून प्रदिद्ध आहे. गेली आठवडा भर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली.त्यामुळे शेतीच्या कामांना वेग येऊन शेतकरी राजा सुखावला असून तालुक्यातील भाम,दारणा ,वाकी,नादुर मध्यमेशोर, मुकणे,आदी धरणे भरली असून आजूबाजूच्या गावाना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र फास्ट न्युज इगतपुरी तालुका प्रतिनिधी निवृत्ती मेदडे ९८२2५०२१५७

सुप्रीम कोर्टाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी दिली 18 ऑगस्ट सुनावणीची तारीख

Image
 सुप्रीम कोर्टाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी दिली 18 ऑगस्ट सुनावणीची तारीख  प्रतिनिधी Dr अमोल जाधव 7218869700 आज सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने सांगितले की 18 ऑगस्ट रोजी अंतिम वर्षातील विद्यार्थीन संदर्भातली तारीख देण्यात आलेले आहे 18ऑगस्टला पूर्ण निकाल ऐकव न्याची शक्यता सुप्रीम कोर्ट आहे. यासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात परीक्षा रद्द होणेबाबत मोठ्या प्रमाणात युक्तिवाद झाला. विद्यार्थ्यांचे येण्या-जाण्यासाठी वाहने नसल्यामुळे विद्यार्थी कसे येतील,  31आगस्ट पर्यंत सर्व बंद असल्यामुळे  विद्यार्थ्यांना  परीक्षादेण्यासाठी  अनेक   समस्या निर्माण होत आहेत. असं विदयार्थ्यांनच्या वकीलने कोर्टात युक्तिवाद केला.   केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने मात्र परीक्षा घेण्यात याव्यात असं सांगितलेले आहे. असे उत्तर सर्वोच्च न्यायालयात दिलेला आहे व या  पुढची तारीख 18 ऑगस्ट दिलेली आहेत.

घरा समोर रस्ता व नाली नसल्याने गाडनाचे { घानीचे } साम्राज्य झाल्यने त्वरीत मुरूम टाकावा .

Image
 सुपर फास्ट प्रतिनिधी : जिज्ञासु चाफले . सरपंच/उप-सरपंच - ग्रामपंचायत जवळ पैसा नसल्याने आम्ही काहीच करू शकत नाही !  मा.        सरपंच / सचिव साहेब ,  { ग्रामपंचायत कार्यालय धानोरा } अर्जदार - सुधिर रामरावजी चाफले { नविन वस्ती } रा.धानोरा त.हिंगणघाट जि.वर्धा महाराष्ट्र  घरा समोर रस्ता व नाली नसल्याने गाडनाचे { घानीचे } साम्राज्य झाल्यने त्वरीत मुरूम टाकावा . ग्रामपंचायत सरपंच , उप-सरपंच व सदस्यांना तोंडी सांगीतले असता - ग्रामपंचायत जवळ पैसा नसल्याने आम्ही काहीच करू शकत नाही असे उत्तर आले  !   तरी वरील सभासदांनी मिळणारा मानधानातून मुरमासाठी पैसा द्यावा व मुरुम टाकावा . हिच खरी समाजसेवा होईल ! असे धानोरा ग्रामवासियांचे बोलने आहे ! बातमी आणि जाहिराती साठी संपर्क  - 7770096996 - 7741864156

बासर (तेलंगणा) येथे २० वर्षा पूर्वी (ई. स. २००१) ला २ एकर जमिनीत भव्य दिव्य मंदिर स्थापण्याची गोल्ला गोलेवार यादव समाजाच्या वतीने मुहूर्त मेड रोवण्यात आली* सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज

Image
 *बासर (तेलंगणा) येथे २० वर्षा पूर्वी (ई. स. २००१) ला २ एकर जमिनीत भव्य दिव्य मंदिर स्थापण्याची गोल्ला गोलेवार यादव समाजाच्या वतीने मुहूर्त मेड रोवण्यात आली* सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज  नांदेड नायगाव  प्रतिनिधी कानोले साईनाथ मो 8421958714 बासर (तेलंगणा) येथे २० वर्षा पूर्वी (ई. स. २००१) ला २ एकर जमिनीत भव्य दिव्य मंदिर स्थापण्याची गोल्ला गोलेवार यादव समाजाच्या वतीने मुहूर्त मेड रोवण्यात आली. २००५ ला दानशूर समाज बांधवांनी सढळ हाताने देणगी दिल्यामुळे मंदिर स्थापन करण्यात आले. परंतु काही कारणामुळे काही दिवस जशास तशीच परिस्थिती होती. गेल्या ३ वर्षा पासून समाज बांधवांनकडून पूजा अर्चना नित्य नियमाने चालू आहे. यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त गोपाळ काला दहीहंडीचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित होते. पुढे मंदिराच्या देखभालीसाठी व पूजा अर्चनासाठी भुमानंद महाराज सावरगावकर यांचे योगदान राहणार आहे. त्यांच्या राहण्याची कुटी ( टीन शेड) व प्रांगण साठी मुरूम व इतर दुरुस्तीसाठी लागणारा खर्च उपस्थित समाज बांधवांकडून देणगी रुपात देण्यात आला. सर्व समाज बांधव...

पद्म" पुरस्कारांच्या शिफारस समितीच्या सदस्यपदी अमित देशमुख यांची निवड.

Image
 "पद्म" पुरस्कारांच्या शिफारस समितीच्या सदस्यपदी अमित देशमुख यांची निवड.                  लातूर-महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख  यांची "पद्म" पुरस्कारांच्या शिफारस समितीच्या सदस्यपदी निवड झाली.त्याबद्दल त्याचे लातूर मधून मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस  शुभेच्छा देण्यात आला. सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज लातूर जिल्हा प्रतिनिधी 9766427052.

निवासी असणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या विद्या वेतनात वाढ:-वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

Image
 निवासी असणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या विद्या वेतनात वाढ:-वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख .                    लातूर:-महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत राज्यातील वैद्यकीय व दंत महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या विद्या वेतनात दरमहा दहा हजार रुपयांची वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांनी या विद्या वेतन वाढीसाठी अनुकूलता दर्शविल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि अतिविशेष उपचार अभ्यासक्रमाचे विद्यार्थी यांच्या विद्या वेतनात 1 मे 2020 पासून  दरमहा दहा हजार रुपयांची वाढ होणार आहे.  राज्य शासनावर यामुळे 29 कोटी 67 लाख 60 हजार रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे. निवासी डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी गेल्या दोन वर्षांपासून करण्यात येत होती. या प्रश्नावर निवासी ...

लासुरच्या दहीहंडीवर कोरोनॉचे सावट.....*

Image
 *सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ प्रतिनिधी‌ फिरोज मन्सुरी शेख लासुर स्टेशन.....* *लासुरच्या दहीहंडीवर कोरोनॉचे सावट.....* यावर्षी कोरोनो व्हायरसच्या संसर्गामुळे बालगोपाळाच्या आनंदात दहीहंडीवर  विरजण पडले आहे त्यामुळे लासुर स्टेशन येथे ठिकठिकाणी मोठ्या हर्षेल्हासात साजरी होणारी दहीहंडी मात्र यावर्षी साजरी होत नसल्यामुळे लहानलहान मुलांनी आपापल्या घराच्या अंगणात छोटे मडके बांधून दहीहंडी साजरी केली आहे.                    लासुर स्टेशन येथे चिमाजीनगर बाजारतळ,श्रीकृष्ण मंदिर,बसस्टँड,सावंगी व इतर ठिकाणी दरवर्षी औरंगाबाद येथून मोठमोठाले क्रेन बोलून त्यावर दहीहंडी बांधून डीजेच्या तालावर रात्री उशिरापर्यंत पाण्याच्या वर्षावात दहीहंडीच्या उत्सव साजरा होत होता मात्र यावर्षी कोरोनॉमुळे सर्व गोविंदांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

आमदार व उपसभापती यांच्या गावात अंगणवाडीला गळती,शालेय पोषण आहार भिजतोय......*

Image
 *सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ प्रतिनिधी‌ फिरोज मन्सुरी शेख लासुर स्टेशन......*  *आमदार व उपसभापती यांच्या गावात अंगणवाडीला गळती,शालेय पोषण आहार भिजतोय......* गंगापूर/खुलताबाद तालुक्याचे राजकीय सत्ताकेंद्र असलेल्या लासुर स्टेशन येथे मात्र अंगणवाडीचा शालेय पोषण आहार पत्रे गळतीमुळे भिजत असून अंगणवाडी सेविका व कार्यकर्ती यानां हा पोषण आहार संभाळताना मात्र तारेवरची कसरत करावी लागत आहे.                          याबाबतची विस्तृत माहिती अशी की लासुर स्टेशन शहरातील वार्ड क्रमांक पाच मध्ये अंगणवाडी क्रमांक 2  या अंगणवाडीच्या छतावरील सर्व पत्रे गळत असून सध्या कोरोनो व्हायरसमुळे लहान बालके अंगणवाडीत येत नाही मात्र  हि समस्या अंगणवाडी चालू असल्यापासूनच आहे सध्या या लहान मुलांचा व गरोदर मातांचा पोषण आहार डाळ,तेल,गहू,विविध मसाले, हे मात्र पावसाच्या पाण्यात भिजत आहेत हि परिस्थिती मात्र फक्त कोरोनो काळातील नसून कित्येक दिवसापासून छतावरील पत्रे गळके असून अंगणवाडीसमोरही पाण्याचे तळे कायम साचते व आजही पाणी साचलेले आहे त्य...

शिवसेना युवासेना च्या वतिने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्म शताब्दी दिना निमित्य गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ*💐

Image
 *💐शिवसेना युवासेना च्या वतिने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्म शताब्दी दिना निमित्य  गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ*💐 *🙏आज दि.10/8/2020 रोजी शिवसेना व युवासेना हिंगणघाट तालुका च्या वतिने वर्धा जिल्हा व हिंगणघाट तालुका मध्ये गुणवंत विद्यार्थी यांनी नाव लौकीक केले असे चमकते तारे यांनी आपल्या यशाचे शिखरे गाठली 10 वि मध्ये वर्धा जिल्हा मधुन तिसरा क्रमाक व हिंगणघाट तालुका मध्ये दुसरा क्रमांक यश मिळवले 1) रुद्राक्ष प्रकाशराव अनासने (97.20%) मुली मध्ये 2 रा क्रमांक नी  वैष्णवी सुधिरराव खनंग 10 वी मध्ये यश (95%) गुण मिळवल्या  बद्दल  विनित संजयराव फोटफोडे  (91%) शिवसेना युवासेना च्या वतिने व अण्णाभाऊ साठे यांच्या जन्म शताब्दी   दिना निमित्त गुणवंत विद्यार्थी यांना सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ व मिठाई देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी शिवसेना  उपजिल्हा प्रमुख राजेंद्र खुपसरे, उपसभापती (पं.स.हिं.) अमोल गायकवाड, शिवसेना उपतालुका  प्रमुख प्रकाश अनासने ,युवासेना तालुका प्रमुख निखील वाघ, रामभाऊ डोंगरे, वैष्णवी,आणि विनित, यांना वडील नसुन जिद्दीने अभ्य...
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com