लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आजच्या पिढीला ऊर्जास्रोत....भाई कमलेश चांदने*
*सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ प्रतिनिधी फिरोज मन्सुरी शेख लासुर स्टेशन.......*
*लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आजच्या पिढीला ऊर्जास्रोत....भाई कमलेश चांदने*
लासुर स्टेशनला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन.....
आज 15 आगस्टला लासुर स्टेशन येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची स्थापना अज्ञात नागरिकांनी पहाटे केली होती सकाळी महिला,भगिनी,समाजसेवक,राजकीय पदाधिकारी यांनी पुतळ्याला अभिवादन केले.
हि बातमी एम.आय.एम. विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाद्यक्ष ऍड.कुणाल खरात,औरंगाबादचे आरपीआय आठवले गटाचे शहाराद्यक्ष व व्याख्येते कमलेश चांदणे,नितीन पगारे यांना कळताच त्यांनी लासुर स्टेशन येथे येऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करताना कमलेश चांदणे बोलताना म्हणाले की लासुर स्टेशन येथे सर्व महापुरुषांचे पुतळे आहेत मात्र अज्ञात नागरिकांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवला हि अभिमानाची बाब आहे कारण महापुरुषांचे पुतळे व स्मारक हे आजच्या भरकटलेल्या दिशा देण्याचे काम करत असतात त्यामुळे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे स्मारक नक्कीच प्रेरणा देईल असेही चांदणे यांनी उपस्थित समाजबांधवांना मार्गदर्शन करताना सांगितले.
दरम्यान यावेळी सर्वश्री. कमलेश चांदणे, ऍड.कुणाल खरात,नितीन पगारे,विक्रांत जाधव,पवन साळवे,तान्हाजी बनसोडे,अजित जाधव,योगेश साळवे,राहुल पवार,बबलू शेजवळ,सोमेश शर्मा,संदीप आमराव,शिवसेना शहरप्रमुख अमोल शिरसाठ,विजय पवार,बाजार समितीचे संचालक सुनील पाखरे,छोटू पठाण राजेक सय्यद योगेश शेलार,गोविंद शेलार,सदाशिव शेलार,आदींसह सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचयत सदस्य,बाजार समितीचे संचालक यांनीहि पुतळ्याला अभिवादन केले.
