आरक्षण फाईलची पूर्तता करा अन्यथा राज्यभर मंत्र्यांना काळे फासण्याचा ईशारा
सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज
औरंगाबाद प्रतिनिधी अनिरुध्द भारद्वाज
मो,9890557747
धोबी समाजाचे काळे निवेदन देत निषेध आंदोलन
राज्यातील धोबी समाजाला पूर्ववत आरक्षण लागू व्हावे म्हणून त्रुटी असलेल्या प्रस्तावाकडे राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने नाहक दहा महिन्यांपासून दुर्लक्ष चालवले आहे.सामाजिक न्याय खात्यात प्रस्ताव धूळखात पडून आहे.हा अचूक प्रस्ताव महिनाभरात केंद्राला पाठवला न गेल्यास राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना व मंत्र्यांना दिसतील तिथे काळे फासण्याचा ईशारा समाजाचे प्रदेशाध्यक्ष विवेक ठाकरे यांनी दिला.
धोबी समाजाला हक्काच्या आरक्षणापासून राज्याचा सामाजिक न्याय विभाग वंचित ठेवत असल्याने आज सोमवार (२४ ऑगस्ट रोजी) महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळाच्या वतीने संपूर्ण राज्यभर काळ्या फिती व काळे मास्क लावून काळेच निवेदन देत राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा निषेध म्हणून आंदोलन करण्यात आले.
राज्यातील धोबी समाजाला गेल्या २५-३० वर्षांपासून राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने हेतूत: चालवलेल्या टाळाटाळीचा व चुकीचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.सामाजिक न्याय विभागाचे विशिष्ट अधिकारी धोबी समाजाचा आरक्षण प्रस्ताव केंद्राला मुद्दाम सदोष
व त्रुटीपूर्ण पाठवत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. त्यामुळे काळे आंदोलन करण्याची वेळ आल्याचे नमूद करत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांना दिलेल्या निषेध निवेदनात महिनाभरात मागणीची दखल घ्या अन्यथा महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना काळे फासून आमच्या समाजावर झालेल्या अन्यायाचा उद्रेक जाहीर करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजीराव शिंदे व प्रदेशाध्यक्ष विवेक ठाकरे यांच्या नेतृत्वात झालेल्या आजच्या आंदोलन महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळाचे युवा जिल्हा अध्यक्ष गणेश मढीकर मराठवाडा विभागीय सचिव साईनाथ हजारे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष कैलास निकम कार्याध्यक्ष आप्पासाहेब ठोंबरे शहराध्यक्ष शिवाजी लिंगायत डेबुजी फोर्स जिल्हाध्यक्ष अरविंद राऊत जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष रामेश्वर इंगळे लॉन्ड्री संघटनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा ढोबळे जिल्हा सचिव नारायण भागवत हे समाजबांधव सहभागी झाले होते.
समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवाजी शेळके व मा जिल्हाधिकारी- - सुनील चव्हाण- यांना काळे निवेदन देन्यात आले