सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

शालेय शुल्क माफ करा-शिवश्री सतीश,जिल्हाध्यक्ष,मराठा सेवा संघ,चंद्रपूर

शालेय शुल्क माफ करा-शिवश्री सतीश,जिल्हाध्यक्ष,मराठा सेवा संघ,चंद्रपूर



            सद्यस्थितीत संपूर्ण जग वैश्विक महामारी कोरोना विषाणू च्या संकटाला तोंड देत आहे.आपल्या देशातही त्याचा प्रादुर्भाव प्रचंड वाढत आहे.त्याला आळा घालण्यासाठी शासनाने टाळेबंदी केली.या टाळेबंदी मूळे चंद्रपूर शहरातही सर्व व्यवसाय व सामान्य जनजीवनावर  विपरीत परिणाम झाला आहे.परिणामी सर्व सामान्य पालकांवर आर्थिक संकट आले आहे.अशा परिस्थितीत पालकांना शैक्षणिक शुल्क भरणे शक्य नाही,काही व्यवसाय बंद पडले तर काही पालकांच्या रोजगाराच्या समस्या निर्माण झाल्या आहे.यापैकी अनेक पालक अर्ध्या वेतनावर काम करत आहेत,जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्याची धडपड सुरु आहे.
          अश्या परिस्थतीत शालेय शुल्क भरणे पालकांना अशक्य  आहे.त्यामुळे पालकांनी शुल्क माफ करण्यासाठी श्री महर्षी विद्यामंदिर,चंद्रपूर येथील प्राचार्याना निवेदन देण्यात आले.यावेळी मराठा सेवा संघ,जिल्हाध्यक्ष सतीश मालेकर,जिल्हासचिव प्रा.अनिल डहाके,जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा वनिता आसुटकर,राजेश पोलेवार,वीर भगतसिंग विदयार्थी परिषद चंद्रपूर महानगर अध्यक्ष ओंकार मोहितकर,अरविंद कुळमेथे,पंकज चिमडयालवार,जयश्री झाडे,करिश्मा खाडे, भारती रायपुरे,प्रीती मालेकर व मोठया प्रमाणात पालक उपस्थित होते.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com