आमदार व उपसभापती यांच्या गावात अंगणवाडीला गळती,शालेय पोषण आहार भिजतोय......*
*सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ प्रतिनिधी फिरोज मन्सुरी शेख लासुर स्टेशन......*
*आमदार व उपसभापती यांच्या गावात अंगणवाडीला गळती,शालेय पोषण आहार भिजतोय......*
गंगापूर/खुलताबाद तालुक्याचे राजकीय सत्ताकेंद्र असलेल्या लासुर स्टेशन येथे मात्र अंगणवाडीचा शालेय पोषण आहार पत्रे गळतीमुळे भिजत असून अंगणवाडी सेविका व कार्यकर्ती यानां हा पोषण आहार संभाळताना मात्र तारेवरची कसरत करावी लागत आहे.
याबाबतची विस्तृत माहिती अशी की लासुर स्टेशन शहरातील वार्ड क्रमांक पाच मध्ये अंगणवाडी क्रमांक 2 या अंगणवाडीच्या छतावरील सर्व पत्रे गळत असून सध्या कोरोनो व्हायरसमुळे लहान बालके अंगणवाडीत येत नाही मात्र हि समस्या अंगणवाडी चालू असल्यापासूनच आहे सध्या या लहान मुलांचा व गरोदर मातांचा पोषण आहार डाळ,तेल,गहू,विविध मसाले, हे मात्र पावसाच्या पाण्यात भिजत आहेत हि परिस्थिती मात्र फक्त कोरोनो काळातील नसून कित्येक दिवसापासून छतावरील पत्रे गळके असून अंगणवाडीसमोरही पाण्याचे तळे कायम साचते व आजही पाणी साचलेले आहे त्यामुळे संपूर्ण अंगणवाडी हि पाण्यात कायम भिजत असते व शाळा चालू असताना पाऊस आला तर विद्यार्थ्यांना घरी सोडून द्यावे लागत याबाबत अंगणवाडी सेविका यांनी वारंवार लेखी पत्र संबंधीत विभागाला दिले असले तरी हे काम लालफितीत अडकले आहे मग एखादी दुर्घटना घडल्यावर प्रशासन जागे होणार का? असा प्रश्न पालक विचारत आहे विशेष म्हणजे आमदार प्रशांत बंब व उपसभापती संपत छाजेड यांच्या गावातील हि अंगणवाडी असल्याने पालक आश्चर्य व्यक्त करत आहे.
