सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

नारी शक्ती संघटनेच्या वतीने पत्रकारना कोरोना योध्दा सन्मानित

*सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ प्रतिनिधी‌ फिरोज मन्सुरी शेख लासुर स्टेशन.…..*

*नारी शक्ती संघटनेच्या वतीने पत्रकारना कोरोना योध्दा  सन्मानित....*


गंगापुर तालुक्यातील जोगेश्वरी येथे महिलांच्या वतीने विविध प्रकारच्या मिडीया पत्रकार प्रकाश सातपुते  फिरोज मंसूरी  रमेश नेटके सजय काळे डिपी वाघ राजेक ‌सय्यद यांना कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले,
कोरोना महामरीच्या काळामध्ये स्वता चा जीव धोक्यात घालून आपल्या कुंटूबाची पर्वा न करता देशासाठी अहोरात्र कामगिरी केल्याबद्दल नारी शक्ती या संघटनेच्या संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मंदाकीनी वाघमारेआणि महिलांनी लोकडाऊनच्या काळा मध्ये पत्रकारांनी केलेल्या धाडसी कामगिरी बद्दल त्यांना कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले ,
लोकडाऊनच्या काळामध्ये महिलांवरील होणारे अत्याचार होऊ नये याची दखल घेऊन ही नारी शक्ति संस्था पूर्ण औरंगाबाद जिल्हाभरात कार्यरत आहे. यावेळी नारी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा विविध पदावर नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी  मा बाबांनाथ जाधव मा नरेंद्र गायकवाड मा रमेश जाधव मराठवाड़ा कोबरा संघटना चे अध्यक्ष राजश्री साठे नारी शक्ति चे राष्ट्रीय अध्यक्ष मंदाकिनी वाघमारे मा हरिदास सौ मालता बाई मगरे सिरीन शेख समीरा शेख अश्विनी दिवे वैशाली बागुल आदींची संघटनेच्या विविध पदावर नेमणूक करण्यात आली व यावेळी नारी शक्तीचा महिलांना आपापल्या स्वतःवर आलेले संकट यावर विचार मांडले नारी शक्ति संघटना ने जे पत्रकारांची दखल घेतली कोरोना योद्धा सम्मानित केले बद्दल पत्रकारानी आभार व्यक्त केले
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com