सार्वजनिक गणेशोत्सवात नियम तोडणारावर गुन्हे दाखल करणार...पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील*
*सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ प्रतिनिधी फिरोज मन्सुरी शेख लासुर स्टेशन......*
*सार्वजनिक गणेशोत्सवात नियम तोडणारावर गुन्हे दाखल करणार...पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील*
कोरोनाचे संकट चालू पुढेही सुरुच राहणार असल्याने कोरोनामुळे शारीरिक एकत्र न येता मनाने एकत्र येऊन गंगापूर तालुका कोरोनामुक्त करायचा आहे आतापर्यंत सर्व सण घरातच साजरे केले सर्व गणपती मंडळांनी साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजरे करावे नियम तोडणाऱ्याची गय केली जाणार नसुन त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी सांगितले.
गंगापूर येथील शिवकृपा मंगल कार्यालयात गणपती, मोहरम निमित्त शांतता समीतीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पाटील बोलत होत्या
ऊपविभागीय पोलीस आधिकारी संदीप गावीत, तहसीलदार अवीनाश शिंगटे,नगराध्यक्षा वंदना प्रदीप पाटील, पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे शिल्लेगांव पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र खांडेकर, पी एस आय अर्जुन चौधर,समादेशक पाटील ,नगरसेवक प्रदीप भैय्या पाटील, यांची प्रमुख उपस्थिती होती
पुढे बोलताना पोलीस अधीक्षक पाटील म्हणाल्या सार्वजनिक गणेश मंडळांनी शक्यतो धातूच्या गणेश मूर्ती बसवावे मंडळांनी चार फुट ऊंचीपर्यंत तर घरातील दोन फुट मुर्तीं बसवण्याचे आवाहन पाटील यांनी केले .
ऊपविभागीय पोलीस आधिकारी संदीप गावीत म्हणाले की सर्व गणेश मंडळांनी कोरोनाच्या महामारीमुळे शासनाच्या आदेशाचे पालन करून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करावे नियम तोडणाऱ्याची गय केली जाणार नाही त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले .
तहसीलदार अवीनाश शिगंटे म्हणाले आतापर्यंतचे सर्व सण साधे पणाने साजरे करुन कोरोनाच्या आजारावर मात केली यापुढेही करायची असुन येणारे गणेशोत्सव, मोहरम सण शासनाच्या आदेशानुसार साजरे करत नियमांचे उल्लंघन होता कामा नये असे शिगंटे यांनी सांगितले
गंगापुरचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे म्हणाले की कोरोनाच्या संसर्ग असल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवात भपकेबाजी न करता आरोग्य विषयक ऊपक्रम राबवून ऊत्सवात महाप्रसाद डीजे, भंडारा, यावर बंदी आहे सर्व गणपतीच्या मुर्ती कायगांव येथील कृत्रिम तलावात विसर्जन करावे स्वच्छेने वर्गणी जमा करावी बळजबरीने वर्गनी जमा केल्यास कायदेशीर व शासनाच्या आदेशाचे पालन करून गणेशउत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.
