घोटीच्या सरपंचपदी सचिन गोणके
घोटीच्या सरपंचपदी सचिन गोणके।
इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे थेट सरपंच निवडणुकीत अपात्र ठरलेले सरपंच प्राध्यापक मनोहर घोडे याच्या रिक्त झालेल्या पदी २५ तारखेला निवडणूक होऊन सत्ताधारी पार्टीला यश येऊन १२ /४ अशी लढत होऊन सचिन गोणके याच्या गळ्यात वर्षभरातच सरपंच पदाची माळ पडली. निवडनूक अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी श्याम बोरसे यांनी काम पाहिले. या प्रसंगी एक सदस्य वगळता सर्व सदस्य उपस्थित होते. इगतपुरी तालुका प्रतिनिधी निवृत्ती मेदडे
