सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

लासुरला गणपती व मोहरमच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथसंचलन.....

*सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ प्रतिनिधी‌ फिरोज मन्सुरी शेख गंगापुर लासुर स्टेशन.....*

*लासुरला गणपती व मोहरमच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथसंचलन......*

यक्ष
कोरोनो व्हायरसच्या पार्शवभूमीवर शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऐन उत्सवाच्या काळात कुठलाही गैरप्रकार समाजकंटकाकडून घडू नये म्हणून शिल्लेगाव पोलिसांसह दंगा काबू पोलीस दलाकडून पोलीस ठाणे हद्दीतील सर्वात मोठी लोकसंख्या व बाजारपेठ असलेल्या लासुर स्टेशन येथे पथसंचलन करण्यात आले.
                  ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील,अप्पर ग्रामीण पोलीस अधीक्षक गणेश गावडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांनी पोलीस ठाणे हद्दीतील 65 गावात शांतता समितीच्या बैठका घेऊन सर्व उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन केले आहे यावेळी पोलीस उपनिरीक्षक सर्वश्री सतीश दिंडे,राम बारहाते,व शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांची उपस्थिती होती.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com