सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

*तब्बल विस वर्षा नंतर विनोद बागुल चे डान्स क्लासेस सुरु .....*.

*सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ प्रतिनिधी‌ फिरोज मन्सुरी शेख लासुर स्टेशन....*

*तब्बल विस वर्षा नंतर विनोद बागुल चे डान्स क्लासेस सुरु .....*.


आत्महत्या न करता केला स्वतःचा व्यवसाय चालू......


सामान्य व हातावरती पोट असणाऱ्या जनसामान्यांसाठी कोरोनाचे पाच ते सहा महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर तसेच त्यांच्या कुटुंबावर अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण केली त्यातीलच एक वर्ग मध्ये सर्वसाधारण लोक कलावंत यांचीही परिस्थिती अशीच.....
स्टेज शो बंद झालेत , घेतलेले कार्यक्रम रद्द झालेत कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवायचा असा गंभीर प्रश्न त्यांना सतावू लागला ..या काळात सुशांत सिंग यासारख्या बॉलिवूड अभिनेत्याने सर्व काही असतांना आत्महत्येचा मार्ग स्वीकारला..

औरंगाबाद जिल्हातील लासुर स्टेशन येथील सर्व सामान्य कुटुंबातील लोककलावंत व विविध मराठी चित्रपट व मालिकांत काम केलेले विनोद बागुल यांच्या मनात काही दिवसांपूर्वी आत्महत्येचा विचार आला होता कारण मायानगरी असणारी मुंबई कोरोनॉमुळे ठप्प झाली होती व आपल्या कुटुबाचा चरितार्थ व मुलांचे शिक्षण कसे करायचे या विवंचनेतून मुंबईत राहून काय करायचे त्यामुळे आत्महत्याचा विचार मनात घोळू लागला होता मात्र त्यांनी आपल्या कुटुंबाचा विचार करीत आपली जन्मभूमी असणाऱ्या लासुर स्टेशन या गावाला येऊन पुन्हा एकदा नव्या जोमाने आपल्या कामाला "कुमार डान्स अकॅडमी "सुरू करून त्यात नवीन होतकरू तरुणांना डान्स  शिकविण्याचे कार्य सुरू केले आहे.
               दरम्यान  सर्व सामान्य लोककलावंतांनी  बिकट परिस्थितीला खचून न जाता आत्महत्या हा मार्ग स्वीकारू नये  असे आवाहन मराठवाडा साथी दैनिकांच्या माध्यमातून लोककलावंत विनोद बागुल यांनी केले आहे .
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com