किशोर लोखंडेने थोडी जरी चूक केली असती तरीही जिवंत असलेला चार वर्षाचा मोहम्मद वाचला नसता !
#महाडइमारत #दुर्घटना
" मी जवा मशीन घेउन गेलो तिथं तवा येकच वाटलं मला की मी ह्या बिल्डिंग मधी गुतलोया . म्हनुन मला योग्य वाटेल तशी काळजी घेउन काम केलं. माणसाला धक्का न लागता माणसं कशी काढता येतील हाच प्रयत्न केला .. पयली येक डेड बॉडी मिळाली आम्हाला ...जवा कवा मला जागा दिसायची मोकळी तवा मी त्यानला सांगायचो की हिथं आधी चेक करा मगच मी उकिरतो .. तर ह्या लहान मुलाचं कसं झालं सर की , जवा बिल्डिंग कोसळली त्याच्या आधी त्यो त्याची आई आनी दोन त्याच्या बहिनी जिन्यावरनं उतरत होत्या असनार , आनी खाली उतरत असतानाच त्यो मुलगा छोटा होता नां ? त्यो, जी पाय ठेवायची जागा असते पायरीची , त्या पायरीच्या मदी गुतला होता त्यो ! म्हणजे त्याला बिल्कूल काही नाहेस झाल्तं. आनी तसाच शाबीत यवस्तीत राह्यला त्यो ! NDRF च्या लोकानी डायरेक त्याला हातामदी घेतलं कारन त्यो जिन्याच्या पायरीच्या खटकीमदीच होता नां ! भायेर आल्यावर त्याला येगळच वातावरन दिसलं . त्यो लय घाबरला . पयल्यांदा त्येनं माझ्याकडं पाह्यलं ! मी म्हनलं की त्येला त्येच्या जवळचं कोनतरी द्या , ह्यो हिकडं तिकडं बगू राह्यला ! मग त्येला घेउन गेले हॉस्पिटल मदे ! मला लय आनंद झाला सर की त्यो जिता भायेर आला ! "
किशोर लोखंडे बीड मधल्या पाटोदा तालुक्यातल्या उखंडा गावचा. उखंडा तलावाच्या बांधकामात त्यांची जमीन गेलीय . जी काही उरलीय त्यात किशोरचे वडिल , सोयाबीन , कापूस तूर , जवारी , बाजरी उडीद अशी हंगामी पिकं घेतात कारण तलावाचं पाणी आहे .किशोर मोठा . त्याला दोन भाउ . मधला भाउ पुण्याला होता कुठल्यातरी कंपनीत . पण लॉकडाउनमुळे तो सध्या घरीच आहे . किशोर महाडला आला फेबृवारीमध्ये. एल ॲंड टी कंपनीने जे हायवे चौपदरीकरणाच काम घेतलय त्या कामावर पोक्लेम मशीन चालवायला . बिल्डिंग कोसळल्याचा फोन आल्यावर त्या दिवशी संध्याकाळी त्याने ओठाला लावलेला चहा अर्धवट टाकला आणि तो मशीन घेउन घटनास्थळी हजर झाला . पहिल्या रात्री त्याने काहीच खाल्लं नाही . दुसऱ्या दिवशी दुपारी त्याला कुणीतरी दोन समोसे दिले . रात्री उशीरा एक राईस दिला आणि तिसऱ्या दिवशी संध्याकाळी आठ वाजेपर्यन्त तर तो उपाशीच होता . सगळा ढिगारा उपसून होईपर्यन्त. 48 तास अविरत मेहनत घेतली त्याने .
" सर मला फोन आल्ते की ! प्रीतमताई मुंडेंचा आला , सुरेश धस सायबांचा आला , माजे सत्कार केले डाक्टर लोकानी हिथं ! मी शाळेत असतानाच मला मिशीन कदी चालवायला मिळेल याची आवड होती . आमच्या चुलत्याकडं मशीन हुती . पन मी चुलत्याकडं न्हाई शिकलो . नगरला गेलो . बारावी पास झाल्तो आनी बीए च्या पयल्या वर्षाला ॲडमिशन घेतल्याली . पन कॉलेज काय करनं आपल्याला झेपलं न्हाय आनी मशीन शिकायला नगरला आलो . पाच वर्ष झाली मी मशीन चाल्वतो सर ! वीस हजार पगार मिळतो तो घरी पाठवतो ! माह्या जिंदगीतला ह्यो पयलाच प्रसंग सर असा की जिथं मीच गुतून ऱ्हायलो ! "
किशोरशी बोलल्यावर मला एक कळालं की, पोक्लेम ऑपरेटर कितीही जरी इतर कामात तरबेज असला तरीही अशा घटनेवेळी खूप मानसिक दडपण असतं. ढिगारा उपसताना , ढिगाऱ्याखाली जिवंत असलेला कुणी आपल्या मशीनच्या बकेटच्या धक्क्याने जीव गमावू नये याची सतत डोळ्यात तेल घालून काळजी घ्यावी लागते. किशोरसाठी तर हा पहिलाच प्रसंग होता . आणि म्हणूनच त्याने बकेट मारताना थोडीशी जरी चूक केली असती तरी ढिगाऱ्याखाली जिवंत असलेला मोहम्मद वाचला नसता !