बासर (तेलंगणा) येथे २० वर्षा पूर्वी (ई. स. २००१) ला २ एकर जमिनीत भव्य दिव्य मंदिर स्थापण्याची गोल्ला गोलेवार यादव समाजाच्या वतीने मुहूर्त मेड रोवण्यात आली* सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज
*बासर (तेलंगणा) येथे २० वर्षा पूर्वी (ई. स. २००१) ला २ एकर जमिनीत भव्य दिव्य मंदिर स्थापण्याची गोल्ला गोलेवार यादव समाजाच्या वतीने मुहूर्त मेड रोवण्यात आली*
सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज
नांदेड नायगाव
प्रतिनिधी कानोले साईनाथ
मो 8421958714
बासर (तेलंगणा) येथे २० वर्षा पूर्वी (ई. स. २००१) ला २ एकर जमिनीत भव्य दिव्य मंदिर स्थापण्याची गोल्ला गोलेवार यादव समाजाच्या वतीने मुहूर्त मेड रोवण्यात आली. २००५ ला दानशूर समाज बांधवांनी सढळ हाताने देणगी दिल्यामुळे मंदिर स्थापन करण्यात आले. परंतु काही कारणामुळे काही दिवस जशास तशीच परिस्थिती होती. गेल्या ३ वर्षा पासून समाज बांधवांनकडून पूजा अर्चना नित्य नियमाने चालू आहे. यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त गोपाळ काला दहीहंडीचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित होते. पुढे मंदिराच्या देखभालीसाठी व पूजा अर्चनासाठी भुमानंद महाराज सावरगावकर यांचे योगदान राहणार आहे. त्यांच्या राहण्याची कुटी ( टीन शेड) व प्रांगण साठी मुरूम व इतर दुरुस्तीसाठी लागणारा खर्च उपस्थित समाज बांधवांकडून देणगी रुपात देण्यात आला. सर्व समाज बांधवांना नम्र विनंती आहे. आपले कुलदैवत जगदगुरु भगवान श्रीकृष्णाचे भव्य दिव्य मंदिर व ईतर सुविधा स्थापन करण्यासाठी पुढाकार व सहभाग घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन गोल्ला गोलेवार यादव समाज महाराष्ट्र व तेलंगणाच्या वतीने करण्यात आले. यावेळी समाजाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नामदेवराव आयलवाड, माजी अध्यक्ष मारोतराव बल्लाळकर, पी. पी. बंकलवाड साहेब, जगन्नाथजी येईलवाड, नांदेड जिल्हा अध्यक्ष भूमन्ना आक्केमवाड व दिगंबरराव कडलवार, लालूभैय्या यादव, मंदिर व्यवस्थापक सुभाष जिड्डू, नांदेड जि. कर्मचारी अध्यक्ष रवींद्र बंडेवार, जि. उपाध्यक्ष कृष्णाजी चिंतलवार, जि. सचिव अशोकराव कासराळीकर, जि. कोषाध्यक्ष तुकाराम कैलवाड, किनवट ता. अध्यक्ष तथा इंजी. रमेशजी बद्दीवार, कीनवट ता. शिवसेना प्रमुख प्रकाशराव करेवाड, कीनवट पं. स. उपसभापती कपिल करेवाड, शिवाजी बोटे वाड मा. सरपंच कोसमेट, रमेश बोड्डेवाड, धर्माबाद ता. अध्यक्ष कैलासजी चंदोड, युवा सचिव गोपिकिषण पप्पुलवार, प्रमोद अटकेलवार, प्रमोद जकुलवार, संतोष दासरवाड, अफसल वार नागनाथ, राजू कडलवार, ज्ञानेश्वर नलगोंडे, कत्तावार बालाजी, सुरेश घोसलोड, बासार सरपंच लक्ष्मण राव, झेड पी टी सी सावली रमेश, सिना सायलु यादव, पेदा सायलु यादव, देविदास पाटिल बासर, गोविंद यादव, अखिलेश यादव, म्याकलवार हुनगुंदेकर, म्हैसा अध्यक्ष सुरेश यादव व इतर समाज बांधव उपस्थित होते. अशी माहिती सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज ला दिली

