सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

निवासी असणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या विद्या वेतनात वाढ:-वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

 निवासी असणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या विद्या वेतनात वाढ:-वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख


.                    लातूर:-महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत राज्यातील वैद्यकीय व दंत महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या विद्या वेतनात दरमहा दहा हजार रुपयांची वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांनी या विद्या वेतन वाढीसाठी अनुकूलता दर्शविल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.


या निर्णयामुळे वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि अतिविशेष उपचार अभ्यासक्रमाचे विद्यार्थी यांच्या विद्या वेतनात 1 मे 2020 पासून  दरमहा दहा हजार रुपयांची वाढ होणार आहे.  राज्य शासनावर यामुळे 29 कोटी 67 लाख 60 हजार रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे.


निवासी डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी गेल्या दोन वर्षांपासून करण्यात येत होती. या प्रश्नावर निवासी डॉक्टरांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला होता. आजचा निर्णयामुळे त्यांच्या प्रलंबित मागणीची परिपूर्ती झाली आहे


सध्या कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे गेल्या मार्चपासून राज्यातील निवासी डॉक्टर अग्रभागी राहुन रुग्णांना तत्परतेने सेवा देत आहेत. प्रसंगी स्वतःकडे दुर्लक्ष करून रुग्ण सेवा देणाऱ्या निवासी डॉक्टरांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेऊन हा निर्णय घेतला आहे.सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज लातूर जिल्हा प्रतिनिधी 9766427052

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com