लासुरच्या दहीहंडीवर कोरोनॉचे सावट.....*
*सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ प्रतिनिधी फिरोज मन्सुरी शेख लासुर स्टेशन.....*
*लासुरच्या दहीहंडीवर कोरोनॉचे सावट.....*
यावर्षी कोरोनो व्हायरसच्या संसर्गामुळे बालगोपाळाच्या आनंदात दहीहंडीवर विरजण पडले आहे त्यामुळे लासुर स्टेशन येथे ठिकठिकाणी मोठ्या हर्षेल्हासात साजरी होणारी दहीहंडी मात्र यावर्षी साजरी होत नसल्यामुळे लहानलहान मुलांनी आपापल्या घराच्या अंगणात छोटे मडके बांधून दहीहंडी साजरी केली आहे.
लासुर स्टेशन येथे चिमाजीनगर बाजारतळ,श्रीकृष्ण मंदिर,बसस्टँड,सावंगी व इतर ठिकाणी दरवर्षी औरंगाबाद येथून मोठमोठाले क्रेन बोलून त्यावर दहीहंडी बांधून डीजेच्या तालावर रात्री उशिरापर्यंत पाण्याच्या वर्षावात दहीहंडीच्या उत्सव साजरा होत होता मात्र यावर्षी कोरोनॉमुळे सर्व गोविंदांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
