सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

महेंद्र घोडके यांना आदर्श प्राचार्य पुरस्कार प्रदान

*महेंद्र घोडके यांना आदर्श प्राचार्य पुरस्कार* 
खुलताबाद (बातमीदर )असिफ वैद्यकीय समीती भगवती बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने महेंद्र घोडके यांना
सोमवार दिनांक 5 सप्टेंबर 2022 रोजी शिक्षक दिनाच्या दिवशी आदर्श प्राचार्य पुरस्कार देण्यात आला. येथील भद्रा मारुती संस्थानच्या भक्त निवासात हा कार्यक्रम डॉक्टर अमोल जाधव यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला•  
महेंद्र घोडके यांनी महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक व समाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांनाआदर्श प्राचार्य  महाराष्ट्र राज्यस्तरीय 2022 या वर्षाचा मानाचा पुरस्कार प्रदान 
करण्यात आलेला आहे.
सोशल सर्व्हिस लीग संस्थेचे अध्यक्ष श्री आनंद माईणकर, मानव सचिव श्री चंद्रकांत खोपडे ,उपाध्यक्ष श्री विजय वर्टी ,खजिनदार श्री मदन देसाई ,सदस्य श्री हेमंत सामंत,सदस्य श्रीमती उमा शेट्ये, आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सत्कार केला, त्याबद्दल महेंद्र घोडके यांनी सर्वांचे आभार  व्यक्त केले आहेत.

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com