सावित्रीबाईं फुले यांचे काम हे आजही दिशादर्शक - अरुणा दिवेगावकर*
*सावित्रीबाईं फुले यांचे काम हे आजही दिशादर्शक - अरुणा दिवेगावकर*
लातूर – भारतीय समाजातील विविध प्रकारचे प्रश्न आणि आव्हानांस सामोरे जातांना ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे सहजीवन आजच्या तरुण पिढीसाठी दिशादर्शक आहे. लग्न संस्थेमध्ये दोन कुटूंबाची वैचारिकता जुळणं अत्यंत महत्वाचं आहे. दुर्दैवानं आपल्या व्यवस्थेत त्याला अधिक न पाहता, भौतिक अपेक्षांची पुर्तता करण्याकडे सर्वांचा कल वाढत आहे. दोन्ही कुटूंबाची वैचारिकता जुळणं आणि आपली कुटुंब , विवाह, नातेसंबंध हे समानतेच्या मूल्यावर उभी करणं हेच खरे सावित्रीबाईंना अभिवादन ठरेल, असे प्रतिपादन नवोदित लेखिका अरुणा दिवेगाकर यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर लातूर मधील सामाजिक शास्त्रे संकुल समाजशास्त्र विभागाच्या वतीने आयोजीत कार्यक्रमात केले. त्या प्रमुख पाहुण्या म्हणून या वेळी बोलत होत्या.
विद्यापीठात आज झालेले 'स्त्री शिक्षणावरील' पोस्टर प्रदर्शन आणि अशा सृजनशील कार्यक्रमाच्या आयोजनातून विदयार्थ्यांनी अधिका अधिक क्रियाशील राहीले पाहीजे, स्त्री पुरुषांच्या समान सहभागातून सहजीवन अधिक समृध्द करता येईल असे प्रतिपादन उपकेंद्राचे संचालक डॉ. राजेश शिंदे यांनी केले.
या वेळी कार्यक्रमासाठी सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. एस.एच कडेकर उपस्थित होते. त्यांनी एकूण स्त्री प्रश्नांचा समकालीन आढावा घेत आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमामध्ये ज्योतिर्मय सावित्री- एक समताधिष्ठित सहजीवन या पुस्तिकेचे वाचन केलेल्या अलका संमुखराव, मीरा गोरे, सोमनाथ कावळे आणि धनश्री सोळंके यांनी आपले पुस्तकावरील विश्लेषण व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. अनिल जायभाये यांनी केले. तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय वैशाली थोरात यांनी दिला, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्नेहा शिंदे हिने केले कार्यक्रमात ओव्यांचे सादरीकरण मोहिनी देशमुख, श्रद्धा शेळकें, प्राजक्ता लोंढाळ, खुदूस शेख, निशा शिंदे तर कार्यक्रमाचे आभार अंकिता शिंदे हिने मानले. संपुर्ण कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. मयुरी सामंत, डॉ. डी. आर. आदमाने, डॉ. बी.बी. आदमाने, विश्ववेध शहापुरकर, रामानंद भिकाने, सचिन भिसे, आशा पठाण, राम सदानंदे, सुशील शिंदे, प्रवीण वाघलगावे, प्रभातकुमार बिराजदार, रेश्मा निर्मळ, अविनाश पवार, महानंदा मलवाड, व्यंकटेश हांगरगे, बळीराम कांबळे, सुजाता कांबळे, विनोद देडे, नरसिंग काटके, कृष्णा कराड आदी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.