सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

*ब्रेकिंग-कोरोना बाधीत आढळलेल्या रिक्षाचालकाची पत्नी, मुलगा आणि मुलीलाही कोरोनाची लागण*

*ब्रेकिंग-कोरोना बाधीत आढळलेल्या रिक्षाचालकाची पत्नी, मुलगा आणि मुलीलाही कोरोनाची लागण*



*राशीन मध्ये मुलीकडे थांबलेल्या मूळच्या मुंबईकर महिलेलाही कोरोना* *आता जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 72 झाली*


कर्जत प्रतिनिधी दत्तात्रय शिपकुले 7020185299, - जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या १७ पैकी १३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर काल  नगर शहरातील जुना मंगळवार बाजार येथील कोरोना बाधीत आढळलेल्या रिक्षाचालकाच्या पत्नी, मुलगा आणि मुलीचा अहवाल पॉझिटिव आला आहे. याशिवाय कर्जत तालुक्यातील तालुक्यातील राशीन येथे मुलीकडे आलेल्या मूळच्या मुंबईकर असलेल्या 75 वर्षीय महिलेचा अहवालही पॉझिटिव आला आहे. यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७२ झाली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.

आज सायंकाळी हे सर्व अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये नगर शहरातील रिक्षा चालकाच्या कुटुंबातीलच तिघेजण बाधित आढळून आले.
मूळच्या मुंबईकर येथील 75 वर्षीय वृद्ध महिला राशीन येथे मुलीकडे आल्या होत्या. त्यांना त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. आज तो अहवाल प्राप्त झाला. त्यात या महिलेस कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com