सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

शेवटी जिल्या अंतर्गत बस सेवा सुरू लाल परी मारणार दिवसाला 12 फेऱ्या*

*शेवटी जिल्या अंतर्गत बस सेवा सुरू लाल परी मारणार दिवसाला 12 फेऱ्या* 

 *बीड जिल्ह्यात लालपरी पुन्हा रस्त्यावर धावणार*

बीड प्रतिनिधी
दराडे सिद्धेश्वर
बीड- राज्य शासनाच्या सुचेनाप्रमाणे बीड जिल्हा नॉन रेड झोनमध्ये येत असल्याने उद्यापासून (दि.२२) जिल्हांतर्गत बस सेवा सुरु करण्यात येणार आहे. यासाठी परिवहन महामंडळाकडून प्रवाशांची योग्य ती खबरदारी घेण्यात येणार असून यासाठी काही नियमावली असणार आहे.विभाग नियंत्रक कालिदास लांडगे  यांनी हि माहिती दिली. 
                       लॉकडाऊनमध्ये उद्यापासून नॉन रेड झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सुविधा देण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती.त्यानुसार बीड जिल्ह्यात लालपरी पुन्हा रस्त्यावर धावणार असून जिल्ह्यात बसच्या प्रत्येकी १२ फेऱ्या होतील.यामध्ये बीड ते परळी,बीड ते अंबाजोगाई,बीड ते माजलगाव,बीड ते धारूर,बीड ते गेवराई,बीड ते पाटोदा,बीड ते आष्टी,बीड ते अंबाजोगाई,परळी ते अंबाजोगाई,धारूर ते अंबाजोगाई,केज ते माजलगाव,माजलगाव ते गेवराई (गढी) पर्यंत बसच्या सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत प्रत्येकी १२ फेऱ्या होणार असून यावेळी बसमध्ये केवळ २२ प्रवाशी एकावेळी प्रवास करू शकणार आहेत. बस क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांनाच यावेळी परवानगी देण्यात आले असून बस आपल्या स्थानकातून निघण्यापूर्वी तिचे निर्जंतुकिकरण केले जाणार आहे. दरम्यान प्रवास करणाऱ्या सर्वांनाच मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे.

सुपर फास्ट महाराष्ट्र न्युज
बीड प्रतिनिधी
दराडे सिद्धेश्वर
मो 8888165743
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com