बायको आणि चिमुकल्या मुलाची हत्या*
*बायको आणि चिमुकल्या मुलाची हत्या*
नांदेड नायगाव प्रतिनिधी
कानोले साईनाथ मो.9604500201
नांदेड मुखेड तालुक्यातील मंडलापूर येथे पतीने सासरवाडीला येऊन पत्नी व एक वर्षीय मुलाची गळ्यावर चाकूने वार करून क्रूर हत्या केल्याची घटना समोर आली ,
याबाबत सविस्तर वृत्त असे की तानाजी भुताळे वय अंदाजे 30 वर्षे हा येडुर ता, देगलूर जिल्हा, नांदेड येथील असून तो मंडलापूर येथे सासरवाडीला आला होता त्याच्या पत्नीस गावी येण्यासाठी तिच्याकडे तगादा लावला ,
तो दारूच्या नशेत मुखेड ते देगलूर रोडवर आसलेल्या मंडलापूर येथे शिवारात पत्नीच्या राहत्या घरी रागात येऊन पत्नी सह एक वर्षे मुलाचा गळ्यावर चाकूने वार करून क्रूर हत्या केली.
आरोपी पळून जात असताना गावातील नागरिकांनी त्यास पकडून झाडास बांधून ठेवले. व पोलिसांना माहिती दिली,
तातडीने पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब मगर हे घटनास्थळी दाखल झालेले,
सदर घटना कळताच आजूबाजूच्या गावातील गावकऱ्या मध्ये खळबळजनक गर्दी केली ,
मयत वैशाली तानाजी भुताळे वय अंदाजे 24 ते 25 दरम्यान मुलाचे वय 1 वर्षे त्याचे नाव आदेश तानाजी भुताळे असे असून
सदरील तपास चालू आहे
सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज नांदेड नायगाव

