घरकुल लाभार्थ्यांचा थकित हप्ता तात्काळ खात्यात जमा करण्यात यावे अंन्यथा रस्तावर ऊतरू..... गजानन पा चव्हाण*
*घरकुल लाभार्थ्यांचा थकित हप्ता तात्काळ खात्यात जमा करण्यात यावे अंन्यथा रस्तावर ऊतरू..... गजानन पा चव्हाण*
--------------------------------------------------------------------
नांदेड नायगाव प्रतिनिधी : कानोले साईनाथ
मो,9604500201
नायगाव शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर झालेल्या लाभार्थ्यांचा थकीत अर्धवट व पहिला हप्ता तात्काळ लाभधारकांच्या खात्यातत जमा करण्यात यावी अशी मागणी भाजपाच्या नगरसेविका सौ.पार्वतीबाई शंकराव चव्हाण,नगरसेवक देवेदास पा.बोमनाळे,नगरसेविका सौ.आशाताई कल्याण गजानन शंकरराव पाटील चव्हाण शेख तबस्सुम फातेमा आरिफ व इतर कार्यकर्त्यांनी नायगाव नगरपंचायत चे मुख्याधिकारी यांच्याकडे केली
एकीकडे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गोरगरिबांना हक्काची व पक्की घरे बांधून देण्यास कटिबद्ध असले तरी अलीकडील संबंधित अधिकाऱ्यांनी टाळाटाळ करून घरकुल लाभार्थ्यांनाकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे लाभार्थ्यांचे घरे पूर्ण:त्वाकडे जातच नाही ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन नायगाव नगरपंचायतचे विरोधी नगरसेवक यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर झालेल्या लाभार्थ्यांचा पहिला हप्ता तात्काळ लाभधारकांच्या खात्यात जमा करावी अशी निवेदनाद्वारे मागणी नगरपंचायत चे मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे संबंधित वरिष्ठ अधिकार्याकडे देण्यात आलेल्या निवेदनावर नगरसेविका सौ पार्वतीबाई चव्हाण नगरसेवक देवीदास पा.बोमनाळे, गजानन पाटील चव्हाण भाजपा शहर अध्यक्ष नायगाव, नगरसेविका सौ.आशाताई चव्हाण,नगरसेविका शेख तबस्सुम आरीफ,सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ सोनकांबळे,गंगाधर पाटील कल्याण,हरिश्चंद्र पा.चव्हाण,भाऊराव पाटील चव्हाण,कैलास भालेराव,संजय चव्हाण,शंकर शिंदे,सुर्यकांत चव्हाण,सय्यद एजाज,माधव चव्हाण,अविनाश चव्हाण,राजेंद्र सोनकांबळे,संभाजी पोटफोडे,सय्यद बाबू साहेब यांच्या स्वाक्षर्या आहेत
सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज नांदेड नायगाव
