सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

अर्सेनिक अल्बम 30 हे औषध त्यावर छापील किमतीनुसारच विक्री करणे बंधनकारक*

*अर्सेनिक अल्बम 30 हे औषध त्यावर छापील किमतीनुसारच विक्री करणे बंधनकारक*



प्रतिनिधी शिवप्रसाद येळकर
सौजन्य: जिमाका
बीड, दि. 22 :- कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे जगभरात मोठया प्रमाणावर मनुष्य हानी झालेली असुन लोक बाधीत झालेले आहेत. अर्सेनिक अल्बम 30 या होमीओपॅथिक औषधामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते
अर्सेनिक अल्बम 30  या औषधांचा खप मोठया प्रमाणात वाढलेला आहे. याचा गैरफायदा काही मेडीकल स्टोअर्समधुन ही औषधे अवास्तव किंमत आकारून विकली जात आहे. मेडीकल स्टोअर्स चालक आणि काही होमिओपॅथी डॉक्टर घेत आहेत. ही कृती निश्चितच निदनीय आणि अशोभनीय आहे.
अर्सेनिक अल्बम 30 हे औषध त्यावर छापील किमतीनुसारच विक्री करणे बंधनकारक आहे.
उपरोक्त परिस्थिती पाहता सर्व मेडीकल स्टोअर्स आणि होमिओपॅथीची प्रक्टिस करणारे डॉक्टरर्स   यांनी छापील किमतीपेक्षा जास्त दर आकारु नये असे सूचित करण्यात आले आहे
जे मेडीकल स्टोअर्स चालक व होमिओपॅथी डॉक्टर्स ज्यादा दर आकारणी करतील त्यांचेवर भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि भारतीय दंडविधान संहिता 1860 व औषधे व सौदर्य प्रसाधने कायदा 1940 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल असे सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन,बीड यांनी कळविले आहे.
बातमी व जाहिराती करिता संपर्क 7030704553
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com