सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

लढी यांच्या घरी सामाजिक सुरक्षेचे अंतर ठेवत झाला आदर्श विवाह*

*लढी यांच्या  घरी सामाजिक सुरक्षेचे अंतर ठेवत  झाला आदर्श विवाह* 




 *जिल्हा प्रतिनिधी  वर्धा ,
      राहुल दूरतकर 9923937033*
       

हिंगणघाट :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अगदी शासन-प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करीत अवघ्या 10 व्यक्तींच्या उपस्थितीत शास्त्रीवार्ड , हिंगणघाट  येथील लढी व कोरपणा  तालुक्यातील गडचांदुर  येथिल ठाकरे  कुटुंबियांच्या  मुला-मुलीचा विवाह सोहळा आज 14 मे 2020 रोजी अगदी सदया पद्धतीने व  सामाजिक आंतर ठेवत  पार पडला. 
पैशांची उधळण करीत थाटात विवाह सोहळा पार पडण्याची परंपराच रूढ झाली आहे. प्रसंगी विवाह सोहळ्यासाठी वधु पित्या कडून  कर्जांचा डोंगर उचलला जातो. कोरोनाच्या सावटातही काहींनी विवाह सोहळा लांबणीवर टाकला आहे. मात्र, गडचांदुर   येथील मारुती प्रदीप ठाकरे   व  शास्त्रीवार्ड , हिंगणघाट   येथिल अंकिता अरुण लढी यांचा आदर्श  विवाह आज 14 मे 2020रोजी  परिवारातील  अवघ्या पाच सदस्यांच्या उपस्थिती सोशियल डिस्टन्स ठेवून  वधु चे पिता अरुण लढी यांच्या घरी पार पडला, या  विवाह सोहळ्याला कार्यक्रम व्हिजिट अधिकारी श्री .टाकळे  साहेब व श्री .राठोड साहेब , तहसील हिंगणघाट , शास्त्रीवार्ड येथील नगरसेवक श्री .प्रकाश राऊत , शिवसेनाचे हिंगणघाट तालुका विधानसभा संघटक श्री . चंदूभाऊ पंडित   उपस्थिती होती. गडचांदुर  येथून  मुलाकडील अवघे पाच  जण प्रशासनाची परवानगी घेऊन  शास्त्रीवार्ड हिंगणघाट  येथे आले होते. विवाह सोहळा उरकल्यानंतर वर पक्षा कडून विवाहाच्या रक्कमेतून संकटात सापडलेल्या गरजवंतांना धान्य वाटपाचा आदर्शवत निर्णय घेतला. त्यामुळे मारुती  व अंकिता   या नवदाम्पत्यांच्या  कुटुंबियांचा आदर्श, समाजाला आदर्श देणारा ठरला आहे.
===============
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com