सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

पावसाळा आला तरीही महावितरण... ला येते जाग


*पावसाळा आला तरीही महावितरण.....*




प्रतिनिधी-सोयगाव राहुल गायकवाड

दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात महावितरण सेवा ठप्प होऊ नये या करता पूर्व नियोजन करने गरजेचं आहे. पावसाळा जवळ आला तरी सुद्धा अजूनही दुर्लक्ष केल्या जातं असल्या च निदर्शनास येत आहे.
अनेक ठिकाणी डीपी बॉक्स चे झाकने तूटलेली असून केबल उघड्यावर पडलेल्या आहेत. यंदा लॉकडाऊन मुळे विनाअडथळा कामे करता आली असती परंतु महावितरण ने *"येरे माझ्या मागल्या"* या युक्ती प्रमाणे कामे अर्धवट ठेवल्यामुळे अपघाताचा धोका संभवतो.

*करावी लागणारे काम*

मान्सून पूर्व कामामध्ये महावितरण ने विद्युत खांबा लगत येणाऱ्या झाडांच्या फांदी कटाई करणे. रोहित्रा चे अर्थिंग तपासने. विजेच्या खांबासह काही ठिकाणी तारा बदलणे किंवा झोल काढणे. तारांचे मजबुती करने. जुन्या फिडर पिलर मध्ये इन्सुलेशन स्प्रे मारणे.फ्युज बदलणे

*अजूनही हिच परिस्थिती*

अनेक ठिकाणी डीपी चे बॉक्स तुटलेले असून केबल उघड्यावर आहेत या कडे दुर्लक्ष केल्यास मोठा धोका संभवू शकतो.
या साठी वेळीच खबरदारी घेऊन महावितरण ने देखभाल दुरुस्तीचे काम वेळेत पुर्ण करावे अशी मागणी नागरिकांन मार्फत होत आहे.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com