सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

कंत्राटी कर्मचाऱ्या नी रक्त दान करून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.

~

 *राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्या ना शासनाच्या नियमित सेवेतील पदांवर बिनशर्त समायोजन करावे ---






कंत्राटी कामगार  कंत्राटी कर्मचाऱ्या नी रक्त दान करून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.
        राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत १५ वर्षांपासून विविध प्रकारची विविध स्तरावर संपूर्ण महाराष्ट्रात कंत्राटी पदे कार्यरत आहे.  काही वर्षांपासून शासन सेवेत नियमित पदावर नियुक्त्या व्हाव्या या मागणीसाठी गेल्या काही वर्षापासून अधिकृत संघटनेमार्फत विविध पातळीवर विविध प्रकारचे आंदोलन छेडले गेले आहे. त्याचेच यश म्हणून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांच्या समायोजनासाठी राज्य शासनामार्फत कॅबिनेट मंत्र्यांच्या अखत्यारीत त्रिस्तरीय सदस्य समिति गठित करण्यात आलेली होती. पण प्रत्यक्षात त्या समिति तर्फे आजतागायत फक्त बैठका घेऊन कंत्राटी कर्मचाऱ्या च्या पदरी निराशा  आली.  तसेच शासनाने असे आश्वासित केले की जो पर्यन्त तुमचे समायोजन होत नाही तोपर्यंत सरळ सेवे द्वारे कोणतीही नियमित भरती केली जाणार नाही परंतु शासनाने तो शब्द न पाळता मा.आरोग्य मंत्री महोदय यांनी प्रसारमाध्यमाद्वारे दिलेल्या मुलखातीत आरोग्य खात्यातील नियमित शासन सेवेतील पदे कोणत्याही प्रकारची परीक्षा न घेता भरण्यात येणार आहे. असे प्रतिपादन केले आहे. त्यामुळे गेल्या १५ वर्षांपासून कार्यरत असणारे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचारी यांची नियुक्ती वृत्त पत्रात जाहिरात प्रसिद्ध होऊन लेखी/प्रात्यक्षिक परीक्षा घेऊन, मुलाखत घेऊन शासनाच्या निवड समितीमार्फत निवड करण्यात आली आहे. अशा कर्मचाऱ्या वर  नियमित भरतीत अन्याय होत असल्याने कोविड १९ या जागतिक महामारीच्या संकटात मा.मुख्यमंत्री महोदय यांनी केलेल्या आहवानाला प्रतिसाद देऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन न करता शासकीय रक्त पेढीमध्ये रक्तदान करून शासनाचा अनोख्या पद्धतीने निषेध केला.
    तरी मा.मुख्यमंत्री महोदय यांनी या आंदोलनाची दखल घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कार्यरत कर्मचार्यांतना शासन सेवेत स्थायी स्वरुपात सामावून घ्यावे तसे न झाल्यास राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अधिकारी /कर्मचाऱ्यांनी र्तीव्र स्वरुपात आंदोलन करण्यात येईल असे प्रतिपादन संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री.आनंद घुगे व इतर पदाधिकारी यांनी केले. तरी या आंदोलनाला नाशिक जिल्हा परिषद आरोग्य स्थायी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री.बैरागी यांनी पाठीबा दिला आहे.महाराष्ट्र फास्ट न्यूज इगतपुरी तालुका प्रतिनिधी निवृत्ती मेदडे ९८२२५०२१५७
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com