सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

चिकमोह गावात येथे कोरोना दक्षता समिती स्थापन करण्याची युवकांनी केली मागणी .*

*चिकमोह गावात येथे कोरोना दक्षता समिती स्थापन करण्याची युवकांनी केली मागणी .* 




                               *राहुल दुरतकर , जिल्हा प्रतिनिधी वर्धा*                             हिंगणघाट :- सध्या देशात कोरोना   माहामारी चे संकट असतांना शासनानी प्रत्येक गावामधे कोरोना माहामारी नियंत्रणात आणण्यासाठी ग्राम पंचायत  स्थरावर ग्राम कोरोना दक्षता समितीचे गठन करण्याबाबत आदेश जाहीर करण्यात आले होते . त्याप्रमाणे तालुक्यातील प्रत्येक ग्राम पंचायतने कोरोना दक्षता समिती स्थापन केली . पण चिकमोह या गावात ग्राम पंचायत यांनी आजून पर्यंत कोरोना दक्षता समिती स्थापन केली नाही. या माहामारी च्या काळात ग्राम पंचायत बाहेरून आलेल्या कोणत्याही व्यक्तीची नोंद ठेवत नसल्यामुळे गावात बाहेरून आलेल्या व्यक्ती ला कुठून आले असे युवकांनी आणि स्थानीय पत्रकार यांनी विचारले असता .ग्राम पंचायत उपसरपंच यांनी हे तुमचे काम नसून हे ग्राम पंचायत चे आहेत .गावातील नागरिकांना विचारण्याचा कोणताही अधिकार नाही असे शब्द वापरले . यामुळे गावातील युवक ग्राम पंचायत विरुध्द पेटून उठले आणि ग्राम पंचायत उपसरपंच यांच्या कडून वापरलेल्या शब्दासाठी गावातील युवकांची माफी मांगावी आणि गावात लवकरात लवकर कोरोना दक्षता समिती स्थापन करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली .                                              *राहुल दुरतकर , जिल्हा प्रतिनिधी वर्धा*
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com