*बीड जिल्ह्यात कोरोनाचा कहर कवडगाव थंडी (ता. माजलगाव ) येथील रुग्णांच्या संपर्कातील १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
**बीड जिल्ह्यात कोरोनाचा कहर कवडगाव थंडी (ता. माजलगाव ) येथील रुग्णांच्या संपर्कातील १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह*
*जिल्ह्यातील रुग्णाचा आकडा वाढला
बीड प्रतिनिधी
*दराडे सिद्धेश्वर*
बीड जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा मोठ्याप्रमाणावर वाढला असून कवडगाव थंडी (ता. माजलगाव ) येथील रुग्णांच्या संपर्कातील १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या आता २९ झाली आहे. यात सुर्डी १, नित्रुड ११ तर कुंडी १ असे रुग्ण असून त्यामुळे आता धारूर तालुक्यातही कोरोनाने प्रवेश केला आहे. तर बीडहून गुरुवारी पाठवलेल्या ३२ नमुन्यांचा अहवाल अद्याप यायचा आहे.
माजलगाव तालुक्यातील कवडगाव थंडी येथे मुंबईहून आलेल्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. सदर कुटुंब शेतात राहायला गेल्याचे सांगितले गेले, मात्र त्यापूर्वी या कुटुंबाच्या संपर्कात अबनेकजण आले होते. त्यांचे स्वाब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.त्यातील १३ अहवाल आज पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात अगोदरच १६ रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरु होते, त्यात आता या १३ ची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात उचार सुरु असलेल्या सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडास २९ तर कोरोनाचा एकत्रित आकडा ३७ झाला आहे. आता माजलगाव तालुक्यात तब्बल १५ रुग्ण असून बीड ५ , केज २, पाटोदा ३, गेवराई २, वडवणी १, धारूर १ असे २९ सक्रिय रुग्ण आहेत. यापूर्वीच आष्टी तालुक्यातील पिंपळ येथील रुग्ण कोरोनमुक्त झाला आहे तर कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला असून ६ रुग्ण पुणे येथे हलवण्यात आलेले आहेत.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्युज
बीड प्रतिनिधी
दराडे सिद्धेश्वर
मो 8888165743
