सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

एकनाथ शिंदे यांचा राज ठाकरेंना फोन..


एकनाथ शिंदे यांचा राज ठाकरेंना फोन

सध्या एकनाथ शिंदे यांनी आपला गट कोणत्याही पक्षात विलीन केलेला नाही. अजूनही आम्ही कोणत्या पक्षात सामील झालेलो नाही. आम्ही शिवसेनेतच राहणार, असे बंडखोर आमदारांकडून सांगितले जात आहे. असे असताना शिंदे यांनी राज ठाकरे यांना एकूण दोन वेळा भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला आहे. या फोन कॉलमध्ये काही राजकीय चर्चा झाल्याचेही सांगण्यात येत आहे. तसेच यावेळी एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या प्रकृतीची चौकशी केली. दरम्यान, या सर्व घडामोडी घडत असताना आज अमेय खोपकर नेमकी काय माहिती देणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com