सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

*अवकाळी आलेल्या पावसामुळे शेतमालाचे नुकसान*


 *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट 9923937033*

 वड्णेर :- आज अवकाळी झालेल्या पावसामुळे शेतामधील कापूस , तूर , गहू आणि चना या पिकांचे नुकसान झाले आहेत . सतत शेतकऱ्यांवर निर्सग आणि सरकार कोपत असल्यामुळे जगावे कि मारावे हाच प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा असल्याचे दिसून येते . मागील 4 ते 5 वर्षापासून सतत दुष्काळाच्या यातना शेतकऱ्यांना सहन कराव्या लागत आहेत. हाती येते असलेले पिक निर्सगामुळे गमवावे लागत असल्यामुळे शेती करावी का नाही अशीच नाराजी शेतकऱ्यामध्ये आहेत . आणि पिक पिकवून मालाला योग्य भाव मिळत नाही , शेतीत खूप कष्ठ करून केलेल्या मेहनतीचे फळ मिळत नसल्याने मोठया प्रमाणात आत्महत्या वाढत आहेत. म्हणून अश्या होणाऱ्या अवकाळी पावसाची पाहणी स्थानीय लोकप्रतिनिधींनी आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी करून शेतकऱ्यांना शासन दरबारी योग्य न्याय मिळून द्यावा असे मत वडणेर परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहेत .

*राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट 9923937033*
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com