सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

*मानवाधिकार संघटने तर्फे लक्ष्मीकांत धानोरकर यांचा सत्कार* आताराष्ट्रीय मानवाधिकार दिवसाचे औचित्य साधून केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्ली यांच्या मार्फत नागपूर येथे राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.



 या कार्यक्रमात सामाजिक दायित्व निभावणार्या अवलीयांचा सत्कार करण्यात आला . यात दारू व्यसनमुक्ती साठी ग्रामीण भागात अविरत कार्य करणाऱ्या लक्ष्मीकांत धानोरकर यांचा सत्कार या वेळी करण्यात आला धानोरकर हे अंबुजा कंपनीत कार्यरत असून सोबतच दारू व्यसन मुक्ती साठी नेहमी झटत असतात. त्यांनी परिसरातील हजारो युवकांना आतापर्यंत दारू मुक्त केले आहे. या साठी त्यांना अनेक सामाजिक संघटनांकडून पुरस्कार देखील मिळाले असून महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार देखील त्यांना मिळाला आहे. विविध सामाजिक संघटना मध्ये धानोरकर सक्रिय पदाधिकारी असून कित्येक समजउपयोगी उपक्रम त्यांनी राबविले आहेत. व्यसनी लोकांसाठी अनेक शिबीर त्यांनी आयोजित केलेली आहे. जनजागृती सोबतच मार्गदर्शनाचे कार्यक्रम घेऊन एक वेगळा आदर्श समाजा पुढे उभा केला आहे . याचीच दखल घेत दिनांक 10 डिसेंम्बर ला गुरुदेव सेवा मंडळ नागपूर येथे केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्ली तर्फे समाजसेवक लक्ष्मीकांत धानोरकर यांचा सत्कार करण्यात आला.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com