*बँक ऑफ इंडिया च्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार .* *ग्राहकांना बँकेच्या कामाकरिता कराव्या लागतात येरजारा .* *राहुल दूरतकर , हिंगणघाट तालुका प्रतिनिधी 9923937033*
* स्थानीय वड्णेर येथील बँक ऑफ इंडिया च्या कर्मचाऱ्यांमुळे बँकेतील खातेदारांना , विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठांना बँक मध्ये आतोनात त्रास सहन करावा लागत आहेत. वारंवार करणे ऐकून कर्मचाऱ्यां बदल चा असंतोष वड्णेर परिसरातील शेतकरी , विद्यार्थी आणि जेष्ठ नागरिकांमध्ये वाढत आहेत . नागरिकांना अरेराव्ही करून एकाच कामाकरीता वारंवार बोलून सुध्दा काम होत नाही त्यामुळे वड्णेर परिसरातील लोकांची येथील बँक कर्मचाऱ्यांच्या बाबत नाराजी दिसून येते . वड्णेर परिसरातील 25 ते 30 गावातील नागरिकांना याच बँक मधून आपलं आर्थिक व्यवहार करावा लागतो . आता शेतकरी व विद्यार्थी वर्गाना नेहमी बँक मध्ये शाळेच्या आणि शेतीच्या कामा करिता रोज बँक मध्ये यावे लागते , परंतु येथील कर्मचारी एकाच व्यक्ती ला एका कामासाठी दहा वेळा चकरा मरायला लावतात . लिंक नाही , कर्मचारी सूट्टी वर आहेत अश्या प्रकारचे रोज कारण सांगून काम टाळतात , या सर्व प्रसंगामुळे नागरिकांना बाहेर गावावरुन सकाळी याव लागते आणि संध्याकाळ पर्यंत काही गावाला जाण्यासाठी बस किंवा इतर वाहन नाही .आणि अश्या दुष्काळी परिस्थितीत शेतीचे सर्व काम सोडून सामन्य जनतेला वांरवार बँक च्या कामाकरिता येन जाण परवडणारे नाही . बँक मध्ये जेष्ठ नागरिकांना वेगळी कुठल्याही रोख काढण्याची व्यवस्था नसल्याने ज्येष्ठांना सुध्दा अतोनात त्रास सहन करावा लागत असल्यामुळे नागरिकांचा बँकेतील कर्मचारी वर्गाबाबत असंतोष आहेत .बँकेतील कर्मचारी वर्गाच्या अरेरावी वगणुकी मुळे नागरिकांना होणाऱ्या त्रास बदल स्थानीय आमदार आणि इतर पदाधिकाऱ्यांनी या कडे लक्ष देऊन नागरिकांना योग्य न्याय द्यावा असे मत नागरिकांकडुन सांगण्यात येत आहेत . *राहुल दूरतकर , हिंगणघाट तालुका प्रतिनिधी 9923937033*
