सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

*राष्ट्रीय ओबीसी महासंघाची विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत बैठक संपन्न* चंद्रपूर (का.प्र.) : राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या विविध मागण्यांना घेवुन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि.20) ला दुपारी 3 वाजता नागपुर येथील विधानभवनात बैठक संपन्न झाली. 


या बैठकीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे, महासचिव सचिन राजुरकर, राष्ट्रीय कर्मचारी-अधिकारी महासंघाचे अध्यक्ष शामभाऊ लेडे, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या अध्यक्षा सुषमा भड, कल्पनाताई मानकर, उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, उपाध्यक्ष शरदराव वानखेडे, रमेश ताजने, ओमदास तुराणकार आदी उपस्थीत होते. या बैठकीत, पुढील महिन्यातील पहील्या आठवड्यात राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक लावून मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे सभापती नाना पटोले यांनी आश्वासन दीले. बैठकीत 2021 मधे होणा-या राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींची जनगणना करावी, राज्याप्रमाणेच केंद्रामधे ओबीसी मंत्रालयाची स्थापणा करण्यात यावी, देशात व राज्यात 27% ओबीसींचे आरक्षण कायम ठेवण्यात यावे, ओबीसी विद्यार्थ्यांकरीता भारतरत्न डॉ. आंबेडकर स्वाधार योजना लागू करावी, ओबीसी आर्थीक विकास महामंडळास निधी वळता करावा, मॅट्रीक पुर्व शिष्यवृत्ती योजना लागू करावी, ओबीसी विद्यार्थाकरीता प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र वाचनालयाची स्थापना करावी, ओबीसी कर्मचा-यांना नौकरीत पदोन्नती द्यावी, ओबीसींचा सरकारी नौकरीमधे बॅकलॉग भरण्यात यावा आदी विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com