*माझ्या पुतळ्याला जोडे मारा; पण गरिबांची वाहनं जाळू नका; मोदींचं आवाहन*
वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार
माझ्या पुतळ्याला जोडे मारा. मला हव्या तितक्या शिव्या द्या. पण देशातील गरिबांच्या गाड्या जाळू नका. त्यामधून तुम्हाला काय मिळणार, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन आंदोलन करणाऱ्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन देशात सुरू असलेल्या आंदोलनांवर मोदींनी दिल्लीतील रामलीला मैदानातून भाष्य केलं. नवा कायदा कोणाचं नागरिकत्व रद्द करण्यासाठी नव्हे, तर नागरिकत्व देण्यासाठी आणला गेला आहे, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर शरसंधान साधलं. *सुधारित नागरिकत्व कायद्याच्या माध्यमातून पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील अल्पसंख्यांकांना नवं आयुष्य मिळेल, असं मोदी म्हणाले. सुधारित नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी करून पाकिस्तानला संपूर्ण जगासमोर उघडं पाडण्याची संधी आपल्या हातात होती. त्यांच्या देशात अल्पसंख्यांकावर सुरू असलेले अत्याचार जगासमोर नेण्याची संधी होती. मात्र विरोधकांनी ती वाया घालवली. कारण त्यांना देश नव्हे तर पक्ष महत्त्वाचा वाटतो, अशा शब्दांत मोदींनी विरोधकांना लक्ष्य केलं.* *सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन विरोधक जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशात आंदोलनं सुरू असताना काँग्रेसचे नेते शांततेचं आवाहन करत नाहीत. याचा अर्थ त्यांची आंदोलनातील हिंसेला मूकसंमती आहे. सार्वजनिक मालमत्तांवर होणाऱ्या हल्ल्यांना त्यांचा पाठिंबा आहे, असं म्हणत मोदींना काँग्रेसवर तोफ डागली. आंदोलनातील हिंसाचारातून सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं जात आहे. करदात्यांचा पैसा वाया घालवला जात आहे. पण यातून काय साधलं जाणार, गरिबांची वाहनं जाळून काय मिळणार, असे प्रश्न मोदींनी विचारले. तुम्हाला माझ्यावर राग काढायचा असल्यास माझे पुतळे जाळा, त्याला जोडे मारा, असं मोदी म्हणाले.* *_जाहिरातीसाठी संपर्क - 7620029500_*
