*स्थानिक गुन्हे शाखा वर्धा*
वर्धा जिल्हा प्रतिनिधी:पवन चंबुलवार :-


मोटरसायकल चोरीत 2 विधि संघर्षित बालका कडून 5 मोटारसायकली जप्त केल्या दी. 13.12.2019 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक वर्धा हिंगणघाट जाम परिसरात मोटर सायकल चोरीचे गुन्हया संबंधाने गस्तीवर असताना गोपनीय प्राप्त माहितीआधारे 2 विधि संघर्षित बालक यांना तब्येत घेऊन त्यांच्याकडील 2 मोटर सायकल बाबत विचारपूस केली असता त्याच्या ताब्यातील 2 ही मोटारसायकल चोरीच्या असल्याची माहिती पंचा समक्ष देऊन विधि संघर्षित बालक यांनी देऊन त्यांच्या सथिदार सह आणखी मोटरसायकल चोरी केल्याचे निवेदन दिले. त्या निवेदनाप्रमाणे पथकाने हिंगणघाट परिसरातून 3 मोटारसायकली जप्ती मेमोरंडम पंचनामा प्रमाणे जप्त करून एकूण जूमला किंमती. 1,20,000/- रुपयाचा माल जप्त केला असून वरील विधि संघर्षित बालक याचेकडून जप्त करण्यात आलेल्या मोटर सायकला बाबत पोलिस स्टेशनला चौकशी केली पोलिस स्टेशन समुद्रपूर येथील 01 एक गुन्हा व पोलीस स्टेशन हिंगणघाट चार गुन्हे दाखल असून असे पाच गुन्हे उघड झालेले आहे. सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली सा. मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रि. निलेश मोरे सा. यांचे मार्गदर्शन पोलीस निरीक्षक श्रि. निलेश ब्राह्मणे सह पोलीस निरीक्षक श्रि. महेंद्र इंगले, पोलीस उपनिरीक्षक श्री. आशिष मोरखडे, पोहवा. गजानन लामसे, नापोशि. राजेंद्र जैसिंगपूरे, पोशि.मनिष काबळे, नवनाथ मुंडे सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली आहे.