सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com
*एका जागृत नागरीकाने सापडलेला मोबाईल सायबर पोलीस स्टेsशनला* वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवा :-

 आणुन देवून मानुसकीचा परिचय दिला. दिनांक १३-१२-२०१९ रोजी श्री अन्नाजी कोठेवार, रा. स्वागत कॉलनी, वर्धा यांचा मोबाईल त्यांचे घराजवळच्याच परिसरात हरविला होता. सदर मोबाईल हा श्री राजेश पिसुड्डे यांना सापडला त्यांनी तो मोबाईल विलंब न करता सायबर पोलीस स्टेशन,


 पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा येथे आणुन दिला व श्री अन्नाजी कोठेवार यांना तो मोबाईल सुपूर्द केला. श्री राजेश पिसुड्डे यांनी मानुसकीचा व दक्ष नागरीकतेचा परिचय दिल्याने त्यांचे मा. पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा श्री निलेश ब्राम्हणे यांचे हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे सर्वांना आवाहन करण्यात येते की, कुणालाही कोणताही हरविलेला मोबाईल सापडल्यास क्षणाचाही विलंब न करता तो सायबर पोलीस स्टेशन आणुन दयावा.

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com