*शासकीय औ. प्र. संस्था, राजुरा येथे जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेचे आयोजन !* """""""""""""""""""""""""""""""""'''''''''''''''''''''''''''''''""""""""""'""""""""""
दिनांक 24 डिसेंम्बर 2019 ला शासकीय औधोगिक प्रशिक्षण संस्थेत जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेचे उदघाटन *मा. श्री. अविनाश जाधव, सचिव, आदर्श शिक्षक प्रसारक मंडळ, राजुरा* यांच्या शुभहस्ते करण्यात आले, या प्रसंगी प्रमुख पाहुणे *मा. श्री. एस. एम. वारकड, प्राचार्य, श्री. शिवाजी महाविद्याल, राजुरा* हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष *मा. श्री. वैभव एम. बोनगिरवार, प्राचार्य, शासकीय औ. प्र. संस्था, राजुरा* हे होते. या प्रसंगी बोलताना प्राचार्य बोनगिरवर यांनी खेळाचे महत्व व त्यामध्ये असलेले भविष्य याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रसंगी संस्थेचे गटनिदेशक श्री. आर. एस. देठेकर व ए. के. अर्जुने तसेच सर्व निदेशकवृंद व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. या जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेत क्रिकेट, व्हॅालीबॉल, खो-खो, धावणे 100/400 मी. लांबउडी व उंचउडी हे क्रीडाप्रकार खेळवण्यात येणार आहेत. तसेच या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय औ. प्र. संस्थांचे चमू सहभागी झाले आहेत.
