*वर्धा नगरपालिकेच्या हाकेच्या अंतरावर* वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार दि.१९.१२.२०१९ :- असलेले वर्धा नागपूर अतिरहदारीच्या महामार्गावर केसरीमल कन्या विद्यालयासमोरील शाळेच्या चारही प्रवेशद्वारा समोर वाढत्या अतिक्रमणामुळे
शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवितेला तसेच सर्व सामान्य नागरिकांना व इतर वाहन चालकांना दररोज अपघाताला सामोरे जावे लागत असल्यामुळे शाळेच्या चारही प्रवेशद्वारा समोरील वाढत्या अतिक्रमनावर कायमस्वरूपी कारवाई करावी व न्याय द्यावा तसेच बजाज चौक येथील हॉलिडे रिसॉर्ट चे प्रवेशद्वारासमोर तेथील किरकोळ दुकानदारांनी व हाथठेले चारचाकी बंडी व प्रवासी ऑटो वाहनांनी अतिक्रमण केल्यामुळे दररोज अपघाताच्या घटना घडत आहे वरील प्रमाणे दोन्ही अतिमहत्वाच्या विषयावर नगरसेविका सौ रंजना सुरेश पट्टेवार व सामाजिक कार्यकर्ते सुरेश पट्टेवार यांनी निवेदन दिले व त्वरित अतिक्रमण काढून मार्ग मोकळा करण्यात आला।
