गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून पार पडला वृक्षारोपनाचा कार्यक्रम*
*गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून पार पडला वृक्षारोपनाचा कार्यक्रम*
किल्लारी - धरती मातेचे आपल्यावर अनेक ऋण आहेत. ते ऋण फेडण्यासाठी माणसाने नेहमी तत्पर असले पाहिजे. वृक्ष लावल्याने हे पुण्य कर्म करता येते. कारण वृक्ष लावणे म्हणजे धरतीला कन्यादान केल्यासारखं आहे.
आज हुतात्मा स्मारक च्या आवारात तरुणांनी एकत्रित येऊन सुरू केलेल्या चळवळीला गुरुपौर्णिमेच निमित्त साधून गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ.शैलाताई लोहार तसेच ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित व्यापारी बांधव,पोलीस निरीक्षक, डॉक्टर्स ,इतर क्षेत्रातील अधिकारी, बचत गटाच्या महिला,विद्यार्थी या सर्वांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. सकाळी 7 पासून श्रमदान सुरू होते,हळूहळू लोक एकत्रित यवून आजपर्यंतच्या पूर्ण कामाचा आढावा घेत होते. ठिक 10 वाजता गुरुपौर्णिमेनिमित्य साई बाबांच्या प्रतिमेचे व वृक्षांचे पूजन करून ,वृक्षारोपणा आधी वृक्ष संवर्धनासाठी एक प्रार्थना घेण्यात आली. त्यांनंतर वृक्षारोपण करण्यात आले व आलेल्या सर्व मान्यवरांना मसाला दूधाचे वाटप करण्यात आले.
आजच्या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या प्रत्येकांनी कामाची प्रशंसा तर केली पण प्रत्येकांनी गावचे नागरिक या नात्याने या कार्यास कुण्या न कुण्या माध्यमातून सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली. येणाऱ्या काळात या हुतात्मा स्मारक ला एक चांगले उद्यान बनवण्यासाठी प्रत्येकजण प्रामाणिक पणे प्रयत्न करत राहू. यापुढे हे आपल गाव या नात्याने सर्वांनी थोड लक्ष राहू द्या, हीच विनंती...!
*माझ गाव माझी जिम्मेदारी*🙏🏼🌳😊
- *ईश्वर वाघे - औसा तालुका प्रतिनिधी -9970508094*
